Skip to content

आयुष्यभर आपण या गैरसमजुतीत राहतो की आपण इतरांसाठी खूप महत्वाचे आहोत.

आयुष्यभर आपण या गैरसमजुतीत राहतो की आपण इतरांसाठी खूप महत्वाचे आहोत.


मयुरी महाजन


जीवनाची धारा अशाप्रकारची आहे, की येथे सर्वांना वाटतं मला महत्त्व द्यावं ,किंवा मला महत्त्व असावं, हा कोणाचा एकाचा प्रश्न नाही , हा सर्वांचा प्रश्न आहे, पण त्या महत्त्वाबरोबरच आपण हे जाणून घेणे गरजेचे आहे, किंवा असं म्हणता येईल ,की ते स्वीकारणं खूप महत्त्वाचे आहे ,की प्रत्येकासाठी आपण प्रत्येक वेळी महत्त्वाचे असूचं असे नाही,

प्रत्येकाचे आपले वैयक्तिक आयुष्य असते, आणि त्यामध्ये तो कुणाला महत्त्व देतो, कुणाला नाही, त्याचा सर्वस्वी विचार सुद्धा त्या व्यक्तीचा स्वतःचा वैयक्तिक रित्या असतो, मी सांगतो/ सांगते, म्हणून तू त्यांना महत्त्व द्यायला हवं ,असं म्हणून आपण कुणावर त्यासाठी बंधने लादू शकत नाही,

आपण सर्वप्रथम आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहोत, लोकांच्या नजरेतून स्वतःचे महत्त्व ठरवू नका, वेळ आणि गरज बदलताच, ते महत्त्व सुद्धा बदलत ,कारण की कालपर्यंत त्यांच्यासाठी आपण महत्त्वाचे होतो ,आज त्यांच्या नजरेत ते महत्त्व नसेल, कदाचित म्हणून आपले महत्त्व कमी होत नाही,

प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाच्या प्रायोरिटी ठरलेल्या आहेत ,आणि त्यानुसार त्या प्रायोरिटीनुसार व्यक्ती त्या त्या वेळी त्या त्या गोष्टीला महत्त्व देत असते ,आणि आपण मात्र आयुष्यभर या गैरसमजुतीत राहतो, की आपण इतरांसाठी खूप महत्त्वाचे आहोत,

आपण स्वतःसाठी व स्वतः बद्दल महत्वपूर्ण असलं पाहिजे, दुसरी गोष्ट की ज्यांनी आपल्याला जन्माला घातले ,त्यांच्यासाठी आपण महत्वपूर्ण आहोत, त्यांच्यासाठी आपण महत्त्वाचे आहोत ,पण ते एका ठराविक मर्यादेपर्यंत ,त्याच्यापुढे मात्र तुमचं अस्तित्व तुम्हाला स्वतःला निर्माण करावं लागतं, असं नाही, की त्यांच्यासाठी तुमचं महत्त्व कमी होतं, तुमच्यासाठी ते आणि त्यांच्यासाठी तुम्ही कायम महत्वपूर्ण असतातच, परंतु त्या महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये जीवनाच्या त्या प्रवासात जुळत जाणारी माणसं व बदलत्या जगाच्या विचारांचा टप्पा, कुठेतरी त्यामध्ये येणारी माणसं या सर्वांमध्ये महत्त्वाची होणारी वाटणी व त्याच्यासोबत स्वतःच्या महत्त्वाला दिलेल्या दुजोरा आयुष्यात बरच काही अनुभवायला देतो ,

आपण बरेचदा काही माणसांच्या तोंडून ऐकलं असेलच, काहीही कार्यक्रम असो ,मला प्रत्येक वेळी लोक बोलतातच ,मला अमुक अमुक ठिकाणी मानाचे स्थान आहे ,माझा शब्द कधी कोणी खाली पडू देत नाही, इतकं महत्त्व देतात, मित्रहो जर यदा कदाचित आपल्यात हा अहंकार ,इगो, आला असेल, की लोकांच्या नजरेत मला खूप महत्त्व आहे, मला लोक खूप मानतात ,खूप महत्त्व देतात, त्यावेळी थोडं शांत राहून विचार करा ,व स्वतः त्याचा अनुभव घ्या,

इतर जण तुम्हाला ,तुमचे महत्त्व आहे, म्हणून महत्त्व देत नाही, जोपर्यंत तुमच्याकडून त्यांचे काम होत आहे , किंवा भविष्यात तुमच्याकडून गरज लागली ,तर त्यांचे काम तुमच्याकडून होऊ शकेल, यासाठी चाललेली ती धडपड आहे, जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, तोपर्यंत जगात तुमचे महत्त्व शाबूत आहे, हे नक्की, ज्या दिवशी तुमच्याकडून फायदा संपला, त्या दिवशी तुम्ही संपलात तरी त्याचे काही ऊणेदुणे नाही ,हे वास्तव आहे ,

इतरांसाठी आपले महत्त्व किती हे शोधत बसू नका ,आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी आपले महत्त्व अगाध आहे, आपल्यासाठी आपले महत्त्व ओळखा ,उगाच कोणी महत्त्व द्यावं, म्हणून कोणाच्या मागे फिरू नका ,आपल्याला घडवणाऱ्या आपल्या आई-वडिलांसाठी आपले महत्त्व खूप आहे, ते जपण्याचा प्रयत्न करूया,

आपल्यामुळे एखाद्याचं काही काम होत असेल ,तर स्वतःला खूप महत्त्वपूर्ण समजू नका, आपल्याला त्या कामासाठी निमित्त मात्र ठेवलं असेलं, ते आपल्याला कुठे ठाऊक आहे, कुणावाचून को

कुणाचे काही अडत नाही ,तुम्ही एखाद्याला मदत केली नाही, म्हणून त्याचे काम होणार नाही, असे नाही, वेळ लागेल ,पण दुसऱ्या कुणाकडून त्याचे काम होणार ,तुम्ही निमित्त मात्र आहात हे विसरू नका,

उगाच हा गैरसमज बाळगू नका, आपण इतरांसाठी खूप महत्त्वाचे आहोत ,कारण जेव्हा आपल्याला खरे चेहरे कळू लागतात ,तेव्हा आपल्याला सर्वात जास्त राग हा स्वतःचा येतो, कारण माहितीय आपण व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त अवास्तव महत्त्व देत राहतो, व आपल्यालाही वाटत राहतं, त्या व्यक्तीसाठी आपण पण तितकेच महत्त्वाचे आहोत, पण जेव्हा या अपेक्षेचा भंग होतो ,तेव्हा त्या व्यक्तीपेक्षा आपण त्या व्यक्तीकडून केलेल्या अपेक्षांचे ओझे जास्त असते ,

म्हणून कोणी कितीही आपल्या जवळचे असले, तरीसुद्धा ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, हे पक्क स्वीकारा, व ती व्यक्ती कुणाला महत्व देते, हे ज्याचे- त्याचे त्यालाच ठरू द्या ,कोणी महत्त्व देते म्हणून स्वतःला खूप काही समजण्याची चुकी व कुणी काहीच समजत नाही म्हणून स्वतःला कमी लेखण्याची चुकी दोन्हीही करू नका, आपल्यासाठी आपले महत्त्व सर्वप्रथम बाळगा, माझे महत्त्व ,मी जाणतो, विषय संपला ,

शेवटी स्वतःवर सुद्धा उदार होऊ नये, कारण आपल्यासारखे कितीक आलेत, आणि गेलेतही जेव्हा निस्वार्थ भावनेतून तुम्ही एखादे कार्य करता त्यावेळी त्याचे महत्त्व निसर्ग सुद्धा जाणतो, ते करण्याचा प्रयत्न करूया….


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आयुष्यभर आपण या गैरसमजुतीत राहतो की आपण इतरांसाठी खूप महत्वाचे आहोत.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!