Skip to content

एकटे पडू या भीतीमुळे आपण अनेकदा चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो.,

एकटे पडू या भीतीमुळे आपण अनेकदा चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो.


हर्षदा पिंपळे


आयुष्य खूप मोठं आहे.त्याचा पसारा सातत्याने वाढतच असतो.आपणच आपल्या बाजूला कधी एकटे नसतो.आपल्याच घरात अनेक माणसं असतात.थोडक्यात सांगायचे झाले तर,आपल्या आयुष्यात माणसांचा वावर हा कायमस्वरूपी असतो.पण तरीही सगळं असूनही आपल्याला कधी कधी एकटं वाटत असतं.सगळं असूनही सातत्याने आपल्याला एकटेपणाची भीती वाटत असते.

आपण एकटे पडलो तर?? अशी भीती सतत मनाला खात असते.आणि त्यामुळे अनेकदा चुकीच्या गोष्टींना आपण सपोर्ट करतो.

मित्रांच्या घोळक्यात असताना आपल्याला कशाचीही कमी जाणवत नाही. सगळं कसं मोकळं वाटत असतं.जिथे जाऊ तिथे मित्र सोबत असतात.मित्रांसोबत असताना आपण अगदी सहजपणे वावरत असतो.कशाचीही भीती आपल्याला वाटत नसते.पण अनेकदा काय होतं,कधी कधी हे मित्र अनेकदा चुकीच्या गोष्टी करायला जातात.तेव्हा मात्र आपली गोची होते.आपल्याला कळत नाही काय करावं ?

आपण मित्रांना अडवलं तर कदाचित ते आपल्याशी बोलणार नाही, नीट वागणार नाही असं आपल्याला वाटत राहतं.इतके दिवसांची सोबत तुटेल आणि आपण एकटे पडू अशी भीती वाटत राहते.आणि मग याच भीतीपोटी आपण मित्रांच्या चुकीच्या गोष्टींना मागचा पुढचा विचार न करता सपोर्ट करत राहतो. (सगळेच असं करत नाहीत.याला थोडेफार अपवादही आहेत.)

कुटुंबात असताना देखील आपण अनेकदा चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करत राहतो.एखाद्या व्यक्तीच्या हो ला हो करत राहतो.अनेकदा एका घरात कमावती व्यक्ती असते आणि ती म्हणेल तीच पूर्वदिशा असते.मग ते चुकीचं असो वा बरोबर असो.एखादी गोष्ट योग्य असेल तर काहीच वाटत नाही.

पण तीच गोष्ट चुकीची असते आणि आपण त्या गोष्टीला सपोर्ट करत राहतो.कारण,कमावत्या व्यक्तीपुढे आपलं सहसा काहीच चालत नाही.आपले हात कायम दगडाखाली असतात.त्यामुळे अनेकदा अशा सिच्युएशनला आपण सपोर्ट करत राहतो.

पण मित्रांनो, आयुष्यात मग अशी परिस्थिती अनेकदा उद्भवते.खूप चुकीच्या गोष्टी आजुबाजुला घडत असतात.

“मी सांगतोय ते कर,नाहीतर एकटा मर ” असं बोलणारेही आयुष्यात कमी नसतात.मग काय, यामध्ये आपण एकटेपणाला घाबरून सातत्याने चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करत राहतो.

तर असं सातत्याने एकटेपणाला घाबरून कसं बरं चालेल ?

सातत्याने असा चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करून कसं बरं चालेल ?

आपण चुकीच्या गोष्टींंना सपोर्ट करणं मुळातच चुकीचं

आहे.एकटं पडण्याची भीती वाटत असली म्हणून

चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करणं कितपत योग्य आहे ?

एकटं पडण्याची भीती आपल्याला वाटते.

म्हणून आपण अशा गोष्टींना सपोर्ट करतो.

तर, खरचं आपण एकटे असतो का ?

आपल्या सोबत सगळं असताना आपल्याला एकटं पडण्याची भीती का वाटते ? याचा विचार करून पहा.

खरचं, आपल्याला चुकीच्या गोष्टींना सपोर्ट

करण्याची गरज आहे का ? याचाही विचार करून पहा.

चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करणं किती महागात पडू

शकतं याचा आपण सहसा अंदाजही बांधू शकत नाही.त्यामुळे चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करण्यापेक्षा

चांगल्या गोष्टींना सपोर्ट करा.आपण एकटे पडू अशी भीती मनातून काढून टाका.कारण,आपण कधीच एकटे नसतो.

आपल्या सोबत कुणी नसलं तरी आपण मात्र कायम सोबत असतो.त्यामुळे एकटे पडू या भीतीने चुकीच्या गोष्टींना बिलकुल सपोर्ट करू नका.त्यापेक्षाही कितीतरी चांगल्या गोष्टी आजूबाजूला असतात त्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा.

आणि एकटेपणा किती काळ वाटणार ? आज वाटेल,उद्या वाटेल, नंतर पुन्हा आपलं आयुष्य नेहमीप्रमाणे सुरळीत होत असतं.आयुष्यात आज माणसं सोडून गेली की पुन्हा एखादं नवीन माणूस आपल्या आयुष्यात येत असतं.त्यामुळे सोबत कुणीच नाही असं वाटून घ्यायचं काहीच कारण नाही.

सो,एकटेपणाच्या भीतीमुळे किंवा कोणत्याही लालसेपोटीही चुकीच्या गोष्टींना कधीच सपोर्ट करू नका.त्याने आयुष्य चुकीच्या मार्गावर जाऊ शकतं.

म्हणून कोणत्या गोष्टींना सपोर्ट करायचा आणि कोणत्या नाही याचा अवश्य विचार करा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!