Skip to content

Soft हृदय असणारी माणसं एका क्षणातच hurt होतात.

Soft हृदय असणारी माणसं एका क्षणातच hurt होतात.


मेराज बागवान


हृदय शरीरातील महत्वाचा अवयव.शरीराची संपूर्ण यंत्रणा याच्या हातात असते.हे झाले शारीरिकदृष्ट्या.पण आपण मानसिकतरित्या जेव्हा विचार करतो,तेव्हा कोमल हृदय, कठीण हृदय असणारी माणसे असे काहीसे उल्लेख करतो.हृदय म्हणजे अंतःकरण असते. म्हणून असे अनेकदा म्हटले जाते की, Soft हृदय असणारी माणसं एका क्षणातच hurt होतात.सॉफ्ट हृदय म्हणजेच काय, ज्या व्यक्ती मनातून खूप हळव्या असतात, भावनिक असतात त्या लगेच काही झाले की दुःखी होतात,hurt होतात,त्यांना क्षणात वाईट वाटते.

जितकी कठीण हृदय असणारी माणसे आहेत तितकीच सॉफ्ट हृदय असणारी माणसे देखील जगात अनेक आहेत.अशी माणसे भावनेला अनेकदा महत्व देतात आणि कोणतीही गोष्ट मनाला लगेच लावून घेतात.

‘प्राची’ एक सुंदर मुलगी.आता लग्नाला आलेली.त्यामुळे स्थळ बघणे वगैरे चालू होते.असेच ‘Matromony Site’ वर ती स्थळ शोधत असताना,एक स्थळ तिला खूप आवडले.मुलगा तिला पहिल्या नजरेतच खूप आवडला.आणि तिने घरी ह्या पाहुण्यांना बोलवा असा जणू हट्टच केला.तसे पाहायला गेले तर तिच्या कुटुंबियांना हे स्थळ रुचले नव्हते.कारण त्या मुलावर घराची खूप जास्त जबाबदारी होती,आणि आर्थिक रित्या काहीच स्थिरता नव्हती.पण प्राची आणि तिचे कुटुंब स्थिरस्थावर होते.त्यामुळे तिचे पालक ह्या स्थळाबाबत नकार म्हणत होते.पण शेवटी मुलीसाठी ते तयार झाले.दोघांच्या घरी कधी यायचे वगैरे याचे नियोजन ठरले.प्राची खूप खुश होती.कधी एकदा त्या मुलाला भेटते असे तिला झाले होते.तसे थोडे बोलणे देखील मुलासोबत तिचे झाले होते.

पण नशिबाच्या मनात काही वेगळे होते.काही कारणास्तव त्या मुलाच्या कुटुंबीयांनी कळविले की ,आम्हाला लगेच काही येणे जमणार नाही.आणि मग बघण्याचा कार्यक्रम रद्द झाला.प्राची हिरमुसली.मात्र दुसरीकडे तिच्या कुटुंबीयांनी दुसरी स्थळं पाहायला सुरवात केली.त्यातील काही जण येऊन देखील गेले,पण लग्न काही जुळले नाही.ह्या दरम्यान प्राची त्या पहिल्या मुलाशी अजूनही संपर्कात होती.तो मुलगा देखील तिच्याशी बोलत असे.पण प्राची जेव्हा बोलले तेव्हाच.तसे पाहायला गेले तर त्या मुलासाठी प्राची हा विषय संपला होता.त्याच्या कुटुंबियाने एक प्रकारे नकारच दिला होता.

मात्र प्राची दिवसेंदिवस त्या मुलात गुंतत चालली होती.सारखे काही तरी कारण काढून संपर्क वाढवू पाहत होती.तिला त्याची ओढ लागली होती.आणि त्या भावनेनेच,प्राची ने एकदा त्या मुलाला ‘propose’ केले आणि लग्नाची मागणी घातली.सुरवातीला त्या मुलाने सर्व ऐकून घेतले. पण फारसे काही उत्तर दिले नाही.पण प्राची त्याच्या उत्तराची खूप वाट पाहत होती.त्याच्या होकाराची तिला अपेक्षा होती.

पण एका क्षणात त्या मुलाने सांगून टाकले की , “तुमची आमची बरोबरी नाही होऊ शकत.तुझे पालक देखील सधन घर च पाहत आहेत.त्यामुळे च त्यांनी देखील पुन्हा काही संपर्क साधला नाही आमच्याशी. त्यामुळे मला नाही वाटत यातून काही साध्य होईल म्हणून,आणि आपण सफल होऊ म्हणून.त्यामुळे इथंच थांबलेले बरे”.

हे ऐकून प्राची खूप दुःखी झाली.खरे पाहायला गेले तर प्राची देखील हे सत्य जाणत होती.पण त्या मुलाने खूप कठीण आणि स्पष्ट शब्दात वास्तव सांगितल्यामुळे ती खूप hurt झाली होती.तो मुलगा त्याच्या जागी बरोबर देखील असेल पण प्राची मात्र खूप Soft हृदय असणारी मुलगी होती.त्यामुळे तिला ह्या सगळ्यामुळे खूप वाईट वाटले.

मग काही दिवस गेल्यानंतर प्राची ने पुन्हा त्या मुलाकडे लग्नाचा विषय काढला.पण आता तो मुलगा प्राची ला टाळू पाहत होता.एवढे सांगूनही ही मुलगी हा बोलत आहे,माझ्या मागे ला लागली आहे अशी भावना आता त्याची होत होती.पण अनेकदा बोलत असताना ,तो मुलगा प्राची शी पूर्णपणे संवाद साधत नसे,तुटक बोलत असे.यामुळे प्राची आणखीनच hurt करून घेत होती स्वतःला.

असेच बरेचदा होत गेले.प्राची अनेकदा रडली.पण शेवटी तिला जे वाटत होते ते कधीच शक्य होऊ शकले नाही.आणि हळूहळू मग प्राची ला काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या, ” अरे मी तर खूप वेगळा विचार करत होते.हे सगळं एकतर्फी होतं. आम्ही कधी समक्ष भेटलो देखील नाही तरी देखील मी कितीतरी गोष्टी उगाच मनाला लावून घेतल्या.माझं प्रेम जडलं होत त्याच्यावर.आजही आहेच की प्रेम मनात.पण त्याच्या मनात असे काहीच नव्हते. त्याने माझा विषय खुप पूर्वीच बंद केला होता. पण मीच गैरसमज करून घेतला आणि त्याच्याशी बोलत राहिले.मला वाटले त्याच्यावर जबाबदाऱ्या आहेत म्हणून तो असा वागत आहे.पण हे कारण तर होतेच.पण त्याच्या मनात मी कधीच नव्हते हे देखील तितकेच खरे होते.त्याला ते स्पष्ट सांगता नाही आले.पण मला वेळीच समजायला हवे होते.”

 

आणि अशा प्रकारे प्राची ला आपली मानसिक अवस्था लक्षात आली.अशी अनेक माणसे अस्तात जी प्राची सारखी soft हृदयाची असतात.जी प्रत्येक गोष्ट खूप मनाला लावून घेतात आणि क्षणात hurt होतात.Soft. हृदय असणं देखील एक प्रकारची मानसिकता आहे. अशी माणसे नेहमी इतरांची काळजी घेतात,प्रेम करतात, आपुलकी असते त्यांना इतरांबद्दल आणि खूप जास्त संवेदनशीलता असते अशा व्यक्तींमध्ये. पण ह्या स्वभावाचे तोटे म्हणजे,कोणी काही बोलले, काही नकारात्मक घटना घडली की अशा व्यक्ती क्षणात दुखावतात आणि स्वतःला त्रास करून घेतात.

त्यामुळे soft हृदय असणाऱ्यांनी इतरांची काळजी घेता घेता स्वतःची काळजी घेणे देखील शिकले पाहिजे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “Soft हृदय असणारी माणसं एका क्षणातच hurt होतात.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!