Skip to content

बायको समजून घेत नाही म्हणून चिडचिड होत असेल तर काय करावे?

बायको समजून घेत नाही म्हणून चिडचिड होत असेल तर काय करावे?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


माझं आपलं माणूस म्हणून मी हिच्याकडून काही अपेक्षा करतो, काही मागण्या करतो पण त्या कधी पूर्ण होतच नाहीत. मी दुसऱ्या कोणाला सांगत नाही, पण हिने तरी मला समजून घ्यायला नको का? आपल्या नवऱ्याच्या काय अपेक्षा आहेत, त्याला नेमक काय हवं आहे हे तिला माहीत पाहिजे.

मी एखादे वेळी काही बोलत नसेन, काही सांगत नसेन याचा अर्थ माझ्या मनात त्यावेळी काहीच नसतं अस नाही. पण मी ते न सांगता तिने समजून घ्यावं अस मला वाटत असत. पण तिला काही केल्या ते समजतच नाही, मग समजून घेऊन त्यानुसार वागणं तर दूरच राहिलं.

बऱ्याच नवर्यांची ही तक्रार असते. आपली बायको आपल्याला समजून घेत नाही, तिला हवं तसच वागते, आपलं ऐकत नाही अश्या अनेक तक्रारी असतात, ज्यातून चिडचिड देखील होते. अपेक्षा हीच असते की आपल्या हक्काच्या माणसाने आपल्याला समजून घ्यावं, त्याला तरी कळाव की आपल्या मनात काय चालू आहे, आपल्याला नेमक काय हवं आहे. अस जेव्हा होत काही तेव्हा चिडचिड होते. वाद, भांडण होतात. बरेचदा बोलण पण कमी होत. ही जी चिडचीड असते किंवा जो राग आलेला असतो त्याचा बाकीच्या गोष्टींवर देखील कमी अधिक प्रमाणात परिणाम होतो.

ही जी चिडचिड, हा राग कमी कसा करायचा ते देखील बऱ्याचदा समजत नाही. याच कारण चिडचिड नेमकी कश्याने होत आहे, त्याच मुळ कारण काय आहे हेच नेमक अजून समजलेले नसत. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी गेलं की अनेक गोष्टी सुटतात. तसच ही जी चिडचिड असते त्याच पण मुळ कारण शोधून काढणं गरजेचं आहे.

बायको समजूत घेत नाही हे एक कारण झालच, कुठेतरी एक ट्रिगर हा असतोच. पण त्याच्याही खोल, आतमध्ये दडलेल्या असतात आपल्या विचार, आपल्या धारणा ज्याला irrational beliefs असं म्हटल जात. आपण अपेक्षा आणि अट्टाहास यामध्ये बऱ्याचदा गल्लत करतो. ज्याला आपण अपेक्षा म्हणतो तो आपला अट्टाहास असतो जो पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला तर होतो.

आपल्याला त्या अपेक्षा वाटत असतात. आणि ह्या ज्या अपेक्षा असतात जो खर तर एक अट्टाहास असतो जो केला जातो तो देखील हक्काच्या जवळच्या माणसांकडूनच. म्हणून तर आपण म्हणतो ना, मी माझ्याच माणसाकडून अपेक्षा केली, कोणा दुसऱ्याकडून नाही. ह्या अपेक्षा तरी का केल्या जातात कारण त्यांना मनापासून आपण आपलं मानत असतो, जवळच मानत असतो.

पण म्हणून आपला प्रत्येक अट्टाहास पूर्ण होईलच अस नाही. आपण अपेक्षा करू शकतो पण जेव्हा त्याच हट्टात रूपांतर होत तेव्हा आपल्याला त्रास होतो. म्हणून जर ही चिडचिड, हा त्रास कमी करायचा असेल तर आधी माझ्या बायकोने मल समजून घेतलं पाहिजे हा हट्ट कमी करा.

आता हा जो हट्ट आहे तो कमी करण्यामागे कारण आहेत. पहिलं म्हणजे यातून आपल्याला त्रास होतो हे आहेच. पण त्या व्यक्तिरिक्त देखील आहेत. जेव्हा आपण अस म्हणतो की मला माझ्या बायकोने समजून घेतलं पाहिजे तेव्हा आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की मी कितपत माझ्या बायकोला समजून घेतो? मला ते किती शक्य होत? प्रत्येक प्रसंगात मला तिला समजून घेणं, तिने न सांगता तिच्या मनातलं समजणं शक्य होतं का? नाही.

मग मी असा आग्रह कसा करू शकतो की तिने मला समजून घ्यावं? कोणतीही गोष्ट असुदे जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडून त्याची अपेक्षा करतो तेव्हा आपण त्या बाबतीत कितपत योगदान देत आहोत हे देखील पाहिलं पाहिजे. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणूस आपल्या कितीही, कितीही जवळचा असला तरी त्याला आपलं मन वाचता येत नाही.

आपल्या दुसऱ्या व्यक्तीचं मन वाचता येत नाही. मग ती कितीही जवळची असुदे, हक्काची असुदे. एका ठराविक काळापासून एकत्र राहिल्याने एकमेकांच्या आवडी निवडी, त्या माणसाचा स्वभाव समजतो आणि त्यानुसार आपण त्याच मन जपून वागण्याचा प्रयत्न करतो ही गोष्ट जरी खरी असली तरी आता त्या माणसाच्या मनात काय चालू आहे हे आपल्याला नाही समजू शकत. त्यामुळे माझ्या बायकोला माझ्या मनातलं समजलं पाहिजे, त्यानुसार तिने वागल पाहिजे अस म्हणणं किंवा तशी अपेक्षा करण बरोबर नाही.

जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत बायकोला काय कोणालाच समजू शकत नाही आपल्या मनात काय चालू आहे. त्यामुळे मुळातच आपल्याला आपल्या बायकोने समजून घ्यावं अशी आपली अपेक्षा असेल तर तिच्याशी बोलण खूप गरजेचं आहे.

अनेकदा अस होत की आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आपल्या पार्टनरने समजून घेणं अपेक्षित असत ती आपण बोलूनच दाखवत नाही. मग त्या माणसाला ते समजणार तरी कसं? एक माणूस म्हणून आपण जे काही अनुभव घेतलेले असतात, आपल्या ज्या काही अपेक्षा असतात, आपले विचार असतात ते समोरच्या माणसाला नाही समजू शकत. त्यासाठी संवाद साधावा लागतो.

एका चांगल्या नात्याचा पाया देखील हाच आहे. त्यामुळे आपल्या बायकोशी, पार्टनरशी मोकळा संवाद साधा. अपेक्षा करण चुकीचं नाहीये, त्या असूच शकतात; पण त्या न बोलता पूर्ण होतील अशी अपेक्षा करू नका. त्या बोलून दाखवा आणि त्याच हट्टात रूपांतर होऊ देऊ नका. केल तर चिडचीड होण्याचं प्रमाण कमी होईल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “बायको समजून घेत नाही म्हणून चिडचिड होत असेल तर काय करावे?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!