Skip to content

एखादी गोष्ट असह्य झाली की तिला विरोध करण्याचं बळ आपोआपच येते.

एखादी गोष्ट असह्य झाली की तिला विरोध करण्याचं बळ आपोआपच येते.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


सहनशीलतेला मनाची मोठी ताकत मानलं जातं. याच कारण आपली सहनशीलता जितकी चांगली असेल जितकं आपण एखादी गोष्ट सहन करू शकतो तितका आपला त्रास कमी होतो, आपल्यासाठी गोष्टी सुसह्य होतात. बरेचदा आपल्या गोष्टी पुढे ढकलण्याच कारण, न करण्याचं कारण आपली सहनशीलता कमी असण हेच असत. मनात खूप गोष्टी ठरवून देखील त्या तश्या आपल्याकडून होत नाहीत, पुढे पुढे ढकलल्या जातात याच कारण ती ठराविक गोष्ट केल्यावर जो काही त्रास होत असतो तो कुठेतरी सहन होणार नाही अस वाटत असत. रोजच्याच उदाहरणातून हे लक्षात येईल.

लवकर उठायचं अस मनात ठरवलेलं असत. अलार्म लावला जातो, आपण लवकर झोपतो देखील. पण सकाळी जेव्हा उठयाची वेळ येते तेव्हा मात्र अलार्म बंद करून आपण परत झोपतो, किंवा मग अलार्म snooze वर ठेवला जातो. याच कारण विचारल्यावर सांगितल की झोप पूर्ण झालेली नसते.

झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. ती नाही झाली तर काय होईल? असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा दिवसभर आळस आल्यासारखं होईल, थकवा जाणवेल अशी उत्तर येतात, लक्ष लागणार नाही अस वाटत. आणि हे सर्व जे होईल ते सहन होणार नाही अस वाटून आपण पुन्हा झोपतो. हे सर्व सहन करायची तयारी आपण जर दाखवली तर आपण वेळेवर उठू शकतो. पण त्यावेळी तस होत नाही.

म्हणून आपण विरोध दाखवतो ती गोष्ट करायला नकार देतो.

पण मग इथे प्रश्न पडतो की आपण सर्वच सहन करायचं का? अश्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या त्रास देणाऱ्या असतात, ज्यातून आपल्याला खरच त्रास होत असतो अश्या गोष्टी पण आपण सहन करायच्या का? तर याच उत्तर आहे नाही. सहनशीलता जरी महत्त्वाची असली, गरजेची असली तरी त्याबद्दल अजून थोड माहीत करून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे सहनशीलता ही मनाची नसून शरारीची असते. म्हणून तर आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी होऊन सुध्दा आपण त्या त्या वेळी त्या सहन करत असतो कारण आपलं शरीर अजून आपल्याला साथ देत असत.

आपलं शरीरच जर नसेल, आपण जर जिवंतच राहिलो नाही तर आपण काही सहन करू शकतो का? तर नाही. त्या व्यक्तिरिक्त आपल्याला जे वाटत असतं की आपण सहन करू शकत नाही ते फक्त आपल्या मनाला वाटत असत. जा खरच तशी वेळ आली तर आपण नक्कीच ती गोष्ट सहन करू शकत असतो. कल्पना करा की एखादा दहशदवादी आपल्या घरात घुसला आणि आपल्याला म्हणाला की अलार्म वाजल्यावर लगेच उठायच नाहीतर गोळी मारली जाईल. आपण काय करू? आपण लगेच उठणार. म्हणजे आपण अर्धवट झोप सहन करू शकतो की नाही? तर नक्कीच करू शकतो कारण त्यातून आपला जीव वाचणार आहे.

अगदी तश्याच पद्धतीनं काही चांगल घडण्यासाठी आपण जर काही प्रमाणात त्रास सहन करत असू तर तो आपल्याला फायदाच करून देणार आहे. आपल्याला फक्त हे समजून घेणं गरजेचं आहे की कोणती गोष्ट सहन केली पाहिजे आणि कोणती नाही. घरात छळ होत असताना, त्रास भोगायला लागत असताना जर मी कुठे बाहेर सांगितल तर नाचक्की होईल अस समजून तो त्रास सहन करत बसल तर ते बरोबर आहे का? इथे नाचक्की सहन करण योग्य आहे की तो त्रास? लोक काहीतरी बोलतील म्हणून अन्याय सहन करण हे अयोग्यच आहे.

सहन करायची तर कोणती गोष्ट करायची आणि असह्य झाली तर कोणती गोष्टीला विरोध करायचा हे आपल्याला माहीत पाहिजे. आपण जी गोष्ट सहन करत आहोत, किंवा आपल्याला जी गोष्ट आता असह्य होत आहे त्यातून पुढे जाऊन काय निष्पन्न होणार आहे यावर जर आपण एकदा विचार केला तर आपल्याला समजत की याला विरोध करायचा की नाही.

आपलं शरीर जिवंत असेपर्यंत सर्व सहन करतच असत. पण काय सहन करायचं आणि काय नाही हे आपल्याला माहीत पाहिजे. कारण लोक त्यानुसारच आपल्याला वागवतात. योग्य ठिकाणी आपल्याला विरोध करण्याचं बळ मिळालं तरच त्याचा फायदा होतो.

Be careful what you tolerate. You are teaching people how to treat you..


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!