Skip to content

चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न होण्यापेक्षा उशिरा झालेले लग्न केव्हाही चांगले.

चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न होण्यापेक्षा उशिरा झालेले लग्न केव्हाही चांगले.


हर्षदा पिंपळे


रमाचा कालच वाढदिवस झाला.रमा जवळजवळ सत्तावीस वर्षाची झाली होती.तिला अठ्ठावीसावं लागलं होतं.आणि ही गोष्ट पूर्ण सोसायटीमध्ये माहीत होती.कारण रमाला न ओळखणारं असं कुणीचं त्या सोसायटीत नव्हतं.अगदी लहान बाळापासून ते आजीआजोबांपर्यंत सगळेच रमाला ओळखत होते.

रमा मुलगीच अशी होती जी सर्वांना हवीहवीशी वाटायची.

सोसायटीतील छाया आणि माया सोडल्या तर पूर्ण सोसायटीची रमा फेवरीट होती.छायाच्या मुलाशी लग्न न केल्यामुळे छायाचा रमावर जरा राग होता.त्यामुळे त्या रमाला लग्नावरून बोलायची एकही संधी सोडायच्या नाहीत.

तिच्या वाढदिवसानंतर साधारणपणे दोन तीन दिवसांनी रमाच्या आईला बाजारात छाया भेटली.आपण बाजारात आहोत याचं भान छाया विसरून गेली होती.त्यांनी बाजारातच सगळ्यांसमोर मोठमोठ्याने रमाच्या आईला विचारायला सुरुवात केली.

“काय हो रमाची आई,परवा रमाचा वाढदिवस झाला नं.आता अठ्ठावीसावं लागलं म्हणे.मग,कधी करताय लग्न ? वय निघून गेल्यावर का ? आमच्या मुलाला तर दिली नाही तुमची रमा.आता या वयात कोण देईल तिला मुलगा.एकतर तुमची रमा आधीच शरिराने जाडजूड आहे. करून टाका आता लग्न.”

असं म्हणून छायाने रमाच्या आईला कळत नकळतपणे दुःखावलं होतं.कधी न बोलणारी

रमाची आई त्यादिवशी मात्र परखडपणे बोलली.

“अहो,छाया वहिनी, माझी मुलगी आहे. मी बघून घेईन.माझ्या मुलीची चिंता करायला अजून मी जिवंत आहे.आणि तुमच्या मुलाचं काय सांगता,बरं झालं तुमच्या मुलाला मी माझी मुलगी दिली नाही.सगळ्या चाळीत माहीत आहे तुमचा मुलगा काय आहे ते.

अशा मुलांशी लग्न लावून देण्यापेक्षा लग्न न केलेलं बरं.लवकर लग्न लावून द्यायच्या नादात स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला असता आम्ही. वाचलोच म्हणायचो आम्ही.आणि अजून दोन वर्षांनी करू नाहीतर चार वर्षांनी करू आम्ही लग्न …तुम्ही तुमचं बघा.” रमाची आई असं म्हणून तिथून निघून गेली.

पण शेवटी छायाचं बोलणं रमाच्या आईला लागलं.घरी आल्यावर आईने रमाला राहून राहून विचारलच.”काय गं रमे कधी लग्न करतेस.आता तिशीत आहेस.कर लग्न लवकर. इतके दिवस मी काही बोलले नाही.पण आता सांगते बघ,विचार कर.आणि काय तो निर्णय घे एकदाचा.”

यावर रमाने फक्त मान डोलावली.

आणि पुढे मग काही महिन्यातच रमाचं लग्न ठरलं.एका चांगल्या मुलाशी तिचं लग्न झालं.इतकच नाही तर तिचं सगळं सुरळीतपणे चालू राहिलं.ती सुखात होती.उशिरा का होईना चांगलं झालं म्हणून तिची आईसुद्धा खूप आनंदात होती.

तर पहा,मुलं मोठी झाली की त्यांच्यामागे लगेचच लग्नाचा तगादा लावला जातो. आता वय झालं लग्नाचं असं म्हणून त्याला लग्नासाठी सारखं विचारलं जातं.”कधी करणार आहे लग्न?”

असं सारखं विचारलं जातं.वेगवेगळी स्थळं दाखवली जातात.आमच्या शेजारच्या काकूंचा मुलगा आहे, आमच्या मावशीची मुलगी आहे.आमच्या सरांची मुलगी आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची स्थळं दाखवायला सुरुवात होते.”अरे नको करू आत्ता, बघायला काय हरकत आहे. बघून तर घे.आवडली तर करून टाक.

“असं करून हैराण केलं जातं.आणि कधी कधी काय होतं.खूप घाई होते.याच घाईघाईत अनेकदा निर्णय चुकतो.आणि नंतर पश्चात्ताप करण्यापलीकडे काहीही उरत नाही.नंतर मग “थोडं थांबलो असतो तर चांगली मुलगी मिळाली असती./मुलगा मिळाला असता.” असा विचार करण्याची वेळ कित्येकांवर येते.अनेकदा अयोग्य व्यक्तीशी लग्न होतं.नंतर मात्र त्याचा त्रास सगळ्यांना होत राहतो.लग्न ही गोष्ट काही घाईघाईने करायची गोष्ट नाही. खूप श्रीमंत आहे, पैसेवाला आहे तर लगेच त्या संपत्तीवर भाळू नका.त्यापेक्षा त्याची बॅकग्राउंड कशी आहे ते जाणून घ्या.चांगलं असेल तर चांगलच आहे.परंतु केवळ पैशाकडे पाहून हुरळून एखाद्या चुकीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय कधीच घेऊ नका.

नीट सगळा विचार करूनच लग्नाचा निर्णय घेणं आवश्यक असतं.नाहीतर पुढे जाऊन त्रास आणि त्रासच होतो.त्यामुळे असं घाईघाईत लग्नाचा विचार कधीही करू नये.वेळ घ्या.विचार करा.आणि नंतरच लग्नाचा विचार करा.काय आहे, चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न होण्यापेक्षा (योग्य व्यक्तीशी )उशिरा लग्न झालेलं केव्हाही चांगलं.

त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्यायला विसरू नका.लग्न म्हणजे सगळं काही असं समजून त्यासाठी घाईघाईत कधीच निर्णय घेऊ नका.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न होण्यापेक्षा उशिरा झालेले लग्न केव्हाही चांगले.”

  1. खूप छान आहे अगोदर समजलं असत तर खूपचं बर झाल असत

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!