Skip to content

जी भावना तुम्हाला आनंद देते त्यात जगा, पण तिला तुमच्या कंट्रोल बाहेर जाऊ देऊ नका.

जी भावना तुम्हाला आनंद देते त्यात जगा, पण तिला तुमच्या कंट्रोल बाहेर जाऊ देऊ नका.


मयुरी महाजन


एक भावना हसून जाते, तर दुसरी भावना रडवून जाते, त्या त्या वेळेच्या त्या त्या भावना माणसाला हसायला रडायला,व रागवालाही भाग पाडतात, जर असे झाले, की भावनांचा सर्व कंट्रोल आपल्या जवळ असेल, तर चांगल्या भावनांमध्येच आपण आपले जीवन व्यतीत करणार, नाही का ????

सर्वात आधी तर आपण एक मानव आहोत, हे स्वीकारून आपल्यात सर्व प्रकारच्या भावना असणार ,कमी अधिक प्रमाणात, परंतु त्या भावना आपल्या जगण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, त्या भावनांच्या आधारे आपल्याला जगण्याचा आधार शोधता यायला पाहिजे ,तरच आपल्या भावना आपल्याला सुखावह आयुष्याचा आनंद देऊ शकतात,

आनंदाने जगण्याचे क्षण आनंदाच्या त्या लहरी आनंदाची ती भावना संपूर्ण आयुष्याला इतकी सुखावणारी असते, की त्यातील जगणं जरी आठवलं तरी त्यातील आनंदाने जगण्याच्या आठवणी पुन्हा जिवंत होतात, त्यात पुन्हा पुन्हा जगावेसे वाटते, आणि ते क्षण मुठीत धरून ठेवावेसेही वाटतात,

आनंदाच्या भावनेत जगा, त्याचा खडखडून आनंद घ्या, पण त्या भावनेतून वाहावत जाऊ नका, जी भावना तुम्हाला आनंद देते, त्यात जगा, पण तिला तुमच्या कंट्रोल बाहेर जाऊ देऊ नका, आपण बरेचदा ऐकतो ,सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये असतील तर सर्व काही सुरळीतपणे चालते, पण प्रत्येक गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये असू शकत नाही, पण एक मात्र हेही खर आहे, की आपण आपल्या मनावर, भावनांवर कंट्रोल करू शकतो ,ते एका दिवसात साध्य होणारी गोष्ट नक्कीच नाही, तरी एक दिवस नक्कीच साध्य होणारी साधना आहे,

प्रत्येक व्यक्ती आपल्या भावनांसोबत जगत असते, व त्या भावनांसोबतच आयुष्याचा कितीतरी टप्पा पार करते ,काही व्यक्ती काही भावनांमध्ये अडकून राहतात, त्यातून बाहेर पडण्याचा विचार तर करतात, पण त्यांच्या भावना त्यांना त्यातच अडकवण्याचा प्रयत्नात असतात,

भावना मग ती कुठलीही असेल, जर आयुष्य त्यामध्ये अडकून राहिले, तर भौतिक पद्धतीने तर आपण आयुष्याचा कितीतरी टप्पा पार करतो, पण त्या भावनिक टप्प्याबरोबर मात्र तिथेच अडकून पडतो, जसे की एखादी दुःखाची घटना आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकते, त्याचप्रमाणे ते दुःख ती भावना प्रत्येक वेळेस आठवून दुःख देणारी असेल, परंतु त्यात अडकून आनंदाचे कितीतरी क्षण समोर असले ,तरी त्यातील आनंद अनुभवता येत नाही, हे आपणच आपल्या स्वतःला दिलेली शिक्षा आहे ,

कारण की आपल्या आनंदाची सर्वस्वी जबाबदारी आपली आहे, कुणी येईल,आपल्याला हसवून जाईल, तेव्हा आपण आनंदी होणार ,कोणी टचकन काही बोलले ,तर लगेच आपण दुःखी होणार, हे ठरवणारी माणसे आपल्या आयुष्याचा हिशोब लावतील का ???की आपण आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट ,आपणच आपल्याला खुश ठेवू शकतो, हे आपण कधीच स्विकारणार, व त्या पद्धतीने कधी जगणार,

इतरांकडे जर आपल्या आनंद व दुःखाचा रिमोट कंट्रोल दिला, तर त्यांना पाहिजे तसे ते आपल्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतील, त्यासाठी आपण आपल्या आनंदाच्या भावनेत जगू पण त्याचा कंट्रोल आपण स्वतःच्या परिघाबाहेर जाऊ देणार नाही, हा निश्चय आपण आपल्या स्वतःशीच केल्यानंतर आपल्याला आपल्या आनंदात अजून नव्याने आयुष्याला आकार देणारा ठरेल, या शंका नाही,

जी गोष्ट आनंद देते ,ती जरूर केली पाहिजे, मग त्यात एखादा तुमचा आवडता छंद असू शकतो, आवडीच्या ठिकाणी फिरायला जाणे असू शकते ,वगैरे वगैरे…. भरपूर काही तुम्हाला व तुमच्या जीवनाला आनंदाने प्रफुल्लित करून टाकते , व तो आनंद त्यातील जगणे, तुम्ही कधीही विसरू शकत नाही, इतक्या तुम्ही आनंदाच्या लहरी अनुभवलेल्या असतात ,जगून घ्यावं छान ….कसं ….आनंदाची भावना रोजच घेते, पिंगा ….आपल्या मनाच्या राजपटलावर तसं…..


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “जी भावना तुम्हाला आनंद देते त्यात जगा, पण तिला तुमच्या कंट्रोल बाहेर जाऊ देऊ नका.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!