ज्या गोष्टी आज तुम्हाला वेदना देतात त्याच गोष्टी उद्या तुम्हाला मजबूत बनवतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“Difficulties strengthen the mind as labor does the body.”
ज्या पद्धतीने कष्ट, काम आपल्या शरीराला मजबूत बनवतात त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्या, अडथळे आपल्याला मनाने मजबूत करायचं काम करत असतात. जेव्हा शेतकरी आपल्या शेतात दिवसभर राबतो, मेहनत करतो त्यावेळी लगेच त्याला त्याच फळ मिळत का? नाही. आता केलेल्या श्रमाच, कष्टाचं फळ कुठेतरी नंतर मिळणार असत आणि ते पिकाच्या रूपाने मिळत देखील. पण त्यासाठी आता कुठेतरी मेहनत ही करावीच लागते. अगदी तश्याच पद्धतीने आता आपल्याला जरी कोणत्या गोष्टीने वेदना होत असेल तरी त्यातूनच आपण मजबूत होत असतो.
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांमधून उदाहरणातून आपल्याला हे समजेल. शरीर फीट राहावं म्हणून अनेक जण जिम जॉईन करतात. तिथे केल जाणार वर्कआऊट हे सोपं नसत. नंतर जरी त्याची सवय होत गेली तरी सुरुवातीला त्याचा त्रास हा होतोच कारण शरीराला त्याची सवयच नसते. तरी देखील कित्येक जण तिथे घाम गाळतात. तसच जे सेलेब्रिटी आहेत त्यांच्या आयुष्याचा हा एक अविभाज्य घटक झाला आहे. क्वचित काही जण असतील जे जिम करत नाहीत. बाकी सर्व जिम बाहेर आपल्याला दिसतात. हे इतकं सर्व केल जात कारण त्यातून त्यांचं शरीर मजबूत होत, बॉडी फीट राहते.
जेव्हा dietition एखादा ठराविक diet पाळायला सांगतात तेव्हा देखील अस होत की त्यातून आपले बरेच आवडीचे पदार्थ वगळलेले असतात. खाण्यास मनाई असते. तसच जे काही खायचं असत ते प्रमाणात असत आणि न आवडणार देखील असत. तरीही आपण ते खातो आपण डाएट फॉलो करतो कारण त्यातून आरोग्य चांगल होणार असत, सुधारणार असत. अशी बरीच उदाहरण आहेत.
शैक्षणिक यश मिळवण्यासाठी, नंबर मिळवण्यासाठी दिवसरात्र केलेला अभ्यास, एखादा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी केलेली मेहनत ह्या सर्व गोष्टी त्या त्या वेळी कमी जास्त प्रमाणात त्रासदायक असतात. पण केल्या जातात कारण पुढे जाऊन त्यातून काहीतरी चांगल घडणार असत.
याच पद्धतीने आपल्या आयुष्यात जे अडथळे येतात, समस्या येतात, त्या त्या वेळी त्यांचा आपल्याला त्रास होतो आणि तो होणारच आहे. कारण माणूस म्हटल्यावर आपल्यामध्ये भावना आल्या, जाणीवा आल्या. त्यामुळे काही घडलं तर प्रभाव हा पडतोच. पण ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात होतात त्याला काही ना काही कारणं असतात.
बरेचदा आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये इतके अडकून बसलेलो असतो की आपल्याला बाहेरच्या जगाची, जे खर जग आहे त्याची काही कल्पनाच नसते. आपण आपलं अस वेगळं, छोट, सुरक्षित अस आयुष्य बनवलेलं असत ज्यात आपण सुखी असतो. जेव्हा आपण कोणत्यातरी कारणाने त्यातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला त्याचा त्रास होतो. कारण त्याची सवयच नसते. पण अस स्वतःला एका कोशात बांधून ठेवणं आपल्याला कमकुवत करत असत.
आपण ज्या सुरक्षित वातावरणात राहत असतो तिथे आपल्या अपेक्षेप्रमाणेच गोष्टी होत असतात. आपल्याला माहीत असत की कधी काय होणार आहे. पण आपण आयुष्यभर तर अस राहू शकत नाही. अस करून आपण आपलाच विकास थांबवतो. आपल्याला जर माणूस म्हणून ग्रो व्ह्यायच असेल, नवीन संधी प्राप्त करून घ्यायच्या असतील तर कुठेतरी आपल्या कोषातून बाहेर पडावं लागत.
आणि अस करताना त्रास होतोच. पण यातून आपल्याला फायदे होतात. शिक्षणासाठी, नोकरीसाठी जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी बाहेर पडतात, बाहेर हॉस्टेल मध्ये राहताना, रूम घेऊन राहतात अनेक समस्या येतात, बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो.
सर्व तयारी स्वतःची स्वतः करावी लागते. ज्याची घरी सवय पण नसते. पण हे सर्व त्या मुलीला किंवा मुलाला स्वतंत्र होण्यासाठी मदत करत. जेव्हा आपण कोणाच्या तरी आश्रयात राहत असतो मग ते आई बाबा का असेनात आपण एकप्रकारे परावलंबी असतो.
पण जेव्हा एकट्याने राहायची वेळी येते तेव्हा सर्व गोष्टी एकट्यानेच करायला लागतात, अनेक लोकांशी ओळखी होतात, चार चौघात वागायचं कसं समजत, अनोळखी ठिकाणी कस राहायचं, एकट्याने सर्व कसं मॅनेज करायचं ते समजत. प्रोब्लेम सोलव्हींग क्षमता वाढते. या सर्व गोष्टी केव्हा होतात जेव्हा आपण आपल्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडतो.
याच प्रमाणे जेव्हा नात्यात अपयश येत, कामामध्ये एकंदरीतच आयुष्यामध्ये जेव्हा कधी अपयश येत तेव्हा देखील हे जे अपयश आहे, हे दुःख आपल्याला आतून मजबूत करत. कारण आता आपण नेमके कसे वागलो म्हणून या गोष्टी झाल्या आणि पुढे आपण कसं वागल पाहिजे याची एक दृष्टी आपल्याला मिळते.
मनाने खूप हळवं असण, पटकन कोणावरही विश्वास ठेवणं, खूप जास्त भावनिक असणं अश्या गोष्टी बरेचदा आपल्यासाठी समस्या निर्माण करतात. त्यातून आपण अशी नाती तयार करतो जी आपल्याला त्रासदायक ठरतात.
पण हे ही समजत की आपलं नेमक काय चुकल आणि आपण आपल्यामध्ये यापुढे काय आणि कसे बदल केले पाहिजेत. माणसांना ओळखण्यासाठी क्षमता अजून चांगली होते. फिनिक्स पक्ष्याचा जन्म हा त्याच्याच राखेतून होतो अस म्हणतात तसच जेव्हा आपण एखाद्या वेदनेतून जातो तेव्हा आपला देखील तिथे पुन्हा जन्म होत असतो.
आपलं व्यक्तिमत्त्व नव्याने तयार होत असत आणि आपल्याला या वेळी माहीत असतं की आपल्या जगण्याचं उद्देश काय आहे. त्यामुळे जरी वेदना त्रासदायक असल्या तरी त्या काहीतरी शिकवून जात असतात जे नक्की.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


खूप छान