एखाद्या प्रसंगी जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू शकत नसाल तर किमान त्यावेळी शांत रहा.
मेराज बागवान
स्प्रेड पॉझिटिव्हिटी’ असं प्रत्येकजण बोलत असतो,सांगत असतो.पण आयुष्यात एका क्षणाला माणूस पॉझिटिव्ह विचार करू शकत नाही.मग कितीही मनाला समजावले तरी ते शक्य होत नाही.अशी मानसिकता होणे स्वाभाविक असते.कारण आयुष्यात काही प्रसंगच असे घडतात की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू शकत नाही.पण जरी असे होत असले तरी देखील एक गोष्ट तुम्ही कायम केली पाहिजे ती म्हणजे ‘शांत राहा’.
सोनाली एक खूप चाणाक्ष,हुशार पण जमिनीवर पाय ठेवून जगणारी तरुणी होती.छानशी अशी नोकरी करीत होती.सर्व जण तिचा ऑफिस मध्ये खूप मान ठेवत असत.तिचे बॉस तर तिला खूप जपत असत आणि सतत पाठिंबा देत असत.यामुळे सोनाली खूप आनंदित असे.तिच्या हेड ऑफिस पर्यंत तिच्या कार्याची महती पोहचली होती.पण सोनाली खूप शांत होती.ह्या सर्व कौतुकामुळे ती तिचे काम आणखीन सुंदर रित्या करीत होती.आणि यशाच्या एक एक पायऱ्या चढत होती.
पण एकदा काय झाले ,तिच्या सोबत काही तिचे सहकारी होते.तिचे ज्युनिअर होते.पण हळूहळू ते तिच्याशी थोडे विचित्र वागू लागले.म्हणजे तिचा मान ठेवणे त्यांनी बंद केले, तिच्याशी बोलणे टाळू लागले.आणि ती त्यांची सिनिअर असूनही तिला पाण्यात पाहू लागले.त्यामुळे ती एकटी पडत गेली.तिचे आधीचे बॉस देखील बदली होऊन दुसऱ्या ठिकाणी रुजू झाले.त्यामुळे तिला पाठिंबा देणारे तसे कोणी उरलेच नाही.
हा सगळा प्रकार तिच्या लक्षात आला.तिचा स्वभाव सरळमार्गी होता.ती खरे बोलायला घाबरत नसे.बाहेर एक आणि मनात एक असे तिला जमत नसे.ती तिच्या डिपार्टमेंट ची हेड होती.आणि त्याच हक्काने ती त्यांना बोलू लागली.
“काय चालू आहे तुमचं.किती दिवस पाहत आहे मी.मी तुम्हाला समजून घेत आहे प्रत्येकवेळी तर तुम्ही मला गृहीत च धरत आहात. माणूस म्हणून नाही तर किमान सिनिअर म्हणून तरी रिस्पेक्ट करा.मी काय तुम्हाला कोणी बालिश मुलगी वाटले की काय.प्रत्येक गोष्टीची मी तुम्हाला आठवण करून देते.तुमची जबाबदारी असूनही मी त्यात स्वतः involve होते.पण तुम्हाला कोणतीच किंमत नाही.तुमच्या मनानेच सर्व कारभार सुरू आहे तुमचा”.
असे म्हणून सोनाली ने तिचे मन मोकळे केले.ती जे काही बोलली होती ते सर्व खरे होते.ती प्रत्येकवेळ सर्व गोष्टींची जबाबदारी घेत होती.ऑफिस ची काळजी होती.टीम चा performance खराब होऊ नये म्हणून इतरांची देखील जबाबदारी ती घेत होती.आणि इथेच ती चुकली होती.जे काही सध्या तिच्या बाबतीत होत होते,त्याला ती देखील जबाबदार होती.तिने सर्व कामे स्वतःच्याच डोक्यावर घेतली होती.आणि नशीबाचा खेळ असा की ,तिच्या सहकाऱ्यांनी तिला यामुळे गृहीत धरले होते.म्हणजे ,”काहीही झालं तरी ही मुलगी कोणतंही काम पेंडिंग राहू देणार नाही मग ते तिला स्वतःला करावं लागलं तरी देखील.
हा सर्व प्रसंग झाल्यानंतर तिचे सहकारी काही बोलले नाहीत.पण थोड्या दिवसांनी पुन्हा त्यांनी पूर्वीसारखेच वागायला सुरवात केली.त्यामुळे सोनाली खूप नैराश्यात गेली.तिचे कामात आणि घरी आल्यानंतर देखील कशातच मन रमत नसे.ती खूप स्वतःला Lonely समजत होती.कोणताच सकारात्मक विचार तिच्या मनात येत नव्हता.ती जणू नैराश्यात गेली होती.तिने ही गोष्ट तिच्या आई कडे आणि एका मैत्रिणीकडे बोलून दाखवली.त्यांनी देखील तिला खूप छान मार्गदर्शन केले.आणि त्या दोघींच्या मार्गदर्शनामुळे ती ह्या समस्येतून हळूहळू बाहेर पडली.
तिने काय केले, फक्त शांतपणे प्रत्येक गोष्टीचा विचार केला.विचार केल्यानंतर तिला ती कुठे चुकते आहे हे समजले.आणि हा सर्व विचार केल्यानंतर तिने स्वतःला बदलायचे ठरविले.मग ती ऑफिस मध्ये आणखीन जास्त confidence ने वावरू लागली.ती फक्त तिची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडू लागली.इतरांच्या जबाबदाऱ्या ह्या माझ्या नाहीत हे सर्व प्रथम तिने स्वीकारले.स्वतःच्या अंगावर सर्व गोष्टी ओढवून न घेता ती फक्त तिची जबाबदारी पार पाडू लागली.ह्यामुळे हळूहळू का होईना इतर सहकारी त्यांची त्यांची कामे चोखपणे करु लागले.त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली.
त्यातील एक जण सोनाली ला म्हणाला ,”मॅडम खरेच तुम्ही ग्रेट आहात.तुमच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे.तुम्ही अनेकांसाठी एक आयडॉल आहात. तुम्ही इतरसर्व जणांपेक्षा खूप वेगळ्या आणि खरेच अप्रतीम आहात.Hatts Off to you”.सोनाली ने यावर स्मितहास्य केले आणि आपल्या कामात व्यस्त झाली.
कोणतीच व्यक्ती कायम फक्त सकारात्मक नाही राहू शकत.काही प्रसंग माणसाला निराश करतात.पण अशा वेळी डोके थोडे शांत ठेवले की ,शांतपणे विचार केला की सर्व काही सुरळीत होते.योग्य तो मार्ग सापडतो.हे आपल्याला सोनाली च्या उदाहरणावरून म्हणता येईल.
कधी कधी कोणीच जवळ नसते.असूनही कोणी नाही अशी परिस्थिती येते.अशा वेळी संयम ठेवणे आवश्यक बनते.असा संयम ठेवल्याने म्हणजेच शांत राहिल्याने धूसर वाट हळूहळू स्पष्ट होते.ते म्हणतात ना ,’सबर का फल मीठा होता है’.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

