Skip to content

आपण स्वतः केलेल्या चुकांचे खापर तेव्हाच दुसऱ्यांवर फोडतो, जेव्हा…

आपण स्वतः केलेल्या चुकांचे खापर तेव्हाच दुसऱ्यांवर फोडतो, जेव्हा…


हर्षदा पिंपळे


नेहा हॉस्टेलमध्ये राहणारी एक पंचवीस वर्षाची तरूणी.

शिक्षणासाठी शहरात आलेली.वयाच्या तेविसाव्या वर्षापासून ती हॉस्टेलमध्ये राहत होती.विज्ञान शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलेली नेहा युपीएससी चा अभ्यास करत होती.तसा तिला शिक्षणात फारसा गंध नव्हता.पण तरीही युपीएससी करायचा हट्ट तिने तिच्या घरच्यांसमोर धरला.घरच्यांनी तिला अनेकदा विचार करायला भाग पाडलं.

“तुला खरचं हे जमणार आहे का ? तुला खरचं हे करायची इच्छा आहे का? युपीएससी करायची झाली तर तुला तितकीच मेहनत घ्यावी लागेल. कुठलही काम मेहनतीशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही बाळा.बघ अजूनही विचार कर.

असं तिच्या बाबांनी तिला सांगितलं. यावर नेहाने बाबांना

“हो,मला हेच करायचय. माझं ठरलय. आणि तुम्हाला काय वाटलं मी हे करू शकत नाही का? मला जमतं हं तितकं.उगाच काहीही लेक्चर देत बसू नका.मला जायचय. मला जाऊद्या.”

असं बोलून तिचा निर्णय सांगितला.शेवटी तिच्या बाबांना राहवलं नाही.”आपल्या लेकरावर अविश्वास दाखवण्यापेक्षा थोडासा विश्वास ठेवून पाहूयात.”असा विचार करून त्यांनी तिला परवानगी दिली.तिची शहराच्या ठिकाणी चांगली व्यवस्था केली. खायची प्यायची सगळी तिची व्यवस्थित सोय केली होती.आणि मग काही दिवसातच ती शहरात अभ्यासासाठी गेली.दोन ते तीन महिने तिने चांगला अभ्यासही केला.तिथे तिचे भरपूर मित्रमैत्रिणी झाले होते.घरचेही तिची अधूनमधून विचारपूस करत होते.”सगळं चांगलं मजेत आहे.नीट चालू आहे.”असं ती घरच्यांना सांगायची.

बघता बघता सहा महिने निघून गेले.मात्र आता नेहाची लक्षणं काही ठिक दिसत नव्हती.तिचं अभ्यासातही लक्ष नव्हतं.नुसतच बाहेर भटकणं, खाणं -पिणं , रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर ऑनलाइन राहणं वाढलं होतं.परिक्षा तोंडावर आली होती.पण नेहाचा अभ्यासाचा काही पत्ताच नव्हता.मित्रांसोबत पार्ट्या करण्यातच तिचा वेळ चालला होता.शेवटी काय जे व्हायचं ते झालं.युपीएससी च्या प्रिलीअममध्येच तिने तिचा अभ्यास दाखवला.अशा एका मागोमाग तिन वेळा ती प्रिलीअममध्ये अयशस्वी झाली.शेवटी बाबांनी तिला विनवण्या करायला सुरुवात केली.

“बाळा तुला जमत नसेल तर दुसरं काहीतरी कर.आयुष्यातील अमूल्य वेळ वाया चाललाय बाळा.अजून किती दिवस ?आता बास झालं.

आणि कळालय आम्हाला,तुझं काही अभ्यासात लक्ष नाही.त्यापेक्षा खरचं तुला डान्स आवडतो तर त्यात काहीतरी कर.अजूनही वेळ गेलेली नाही. ऐक आमचं जरा.”

असं तिचे बाबा तिला समजून सांगत होते.

[तिच्यासोबत असणाऱ्या सगळ्यांना चांगली नोकरी लागली होती. सगळ्यांच चांगलं करिअर रूळावर चाललं होतं.पण तिचं मात्र सगळच बिघडलं होतं.]

इतकं सांगूनही नेहाने बाबांच ऐकलं नाही.उलट ती स्वतःचच खरं करत राहिली. कालांतराने तिला बाबांनी पैसे वगैरे देणं बंद केलं.मग पार्ट्या, भटकणं वगैरे तिला अशक्य होऊ लागलं.तिची चिडचिड होऊ लागली.तिला तिने केलेल्या चुका कळायला लागल्या.मात्र या सगळ्या चुकांच खापर तिने तिच्या मित्रांवर, तिच्या बाबांवर फोडलं.स्वतःला युपीएससी जमली नाही म्हणून तिने तिच्या बाबांना बोल लावले.मित्रांमुळेच अभ्यास झाला नाही असं म्हणत म्हणत सगळ्याच चुकांच खापर एक एक करत इतरांवर फोडू लागली.स्वतःच्या चुकांसाठी इतरांना दोषी ठरवू लागली.

अर्थात तिने स्वतः स्वतःच्या चुका मान्य केल्याच नाही.

पहा ,नेहाचं हे वागणं काही योग्य नव्हतं.कितीही समजावून तिने स्वतःला हवं तेच केलं.नंतर मात्र त्याच गोष्टी चुकल्या तेव्हा मात्र तिने त्याचं खापर इतरांवर फोडलं.

मित्रांनो,

आयुष्यात अनेकदा असे अनुभव आपण पाहिले असतील.किंवा स्वतः अनुभवले असतील. अनेकदाआपल्याकडून चुका होतात. आणि त्या चुकांच खापर आपण दुसऱ्यावर फोडून मोकळे होतो. पण हे केव्हा होतं तर, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या अंगाशी येते. तेही आपल्याच चुकीच्या वागण्यामुळे. अनेकदा इतर काही चांगली लोकं व्यवस्थित सांगत असतात पण आपल्याला आपलच म्हणणं खरं करायचं असतं.म्हणून तुम्हाला काही कळत नाही असं म्हणून आपण त्या क्षणी मोकळेही होतो.

परंतु जेव्हा त्याच गोष्टी बिघडतात,मनाविरुद्ध घडतात ,स्वतःच्या चुका मान्य करायच्या नसतात,तेव्हा मात्र आपण त्याचा दोष सरळ सरळ इतरांना देत बसतो.

“याला नं तुच जबाबदार आहे. तुझ्याचमुळे झालं सगळं.तुझं नाही नाही चाललं होतं नं ?” असं आपण कुठलाही विचार न करता समोरच्याला सहजपणे बोलून जातो.

तर मित्रांनो, आपल्या चुकीचं खापर इतरांवर फोडण्यात काहीच अर्थ नसतो.आपण चुका करून इतरांवर त्याचं खापर फोडण्यात काय अर्थ ? त्यापेक्षा स्वतःच्या चुका मान्य करून असेल ती परिस्थिती स्विकारायला शिका.चुक झाली तर होऊद्या.परंतु त्याचं खापर मात्र इतरांवर फोडत बसू नका.

खरं आयुष्य, चुकांना स्विकारून, त्यात सुधारणा करून पुढे जाण्यात आहे. इतरांवर त्याचं खापर फोडण्यात नाही.

काय येतयं नं लक्षात ?


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!