Skip to content

एक चूक केल्यामुळे नातं बिघडत नाही, तर हरवलेला संवाद आणि रिस्पेक्ट न मिळाल्यामुळे बिघडतं.

एक चूक केल्यामुळे नातं बिघडत नाही, तर हरवलेला संवाद आणि रिस्पेक्ट न मिळाल्यामुळे बिघडतं.


अपर्णा कुलकर्णी


अरे बापरे, आज नेहमीपेक्षा जरा जास्तच उशीर झाला, घडयाळकडे बघत बघत आणि केबिनमध्ये येऊन बॅग तसेच मोबाईल घेत आरव स्वतःशीच पुटपुटत होता. मोबाईल खिशात टाकत असताना त्याने सहज पाहिले तर आईचे बारा फोन येऊन गेले होते. अरे देवा आता मात्र आई, चपलेने मारून स्वागत करणार हे नक्की असे म्हणत तो धावतच घराकडे निघाला. रोज घरी येण्यासाठी लागणारा अर्ध्या तासाचा रस्ता आज त्याने पंधरा मिनिटातच गाठला होता. पायऱ्या चढत असताना, आता आई काय काय आणि किती बोलेल याच्याच विचारात देवाचा धावा करत त्याने बेल वाजवली.

पण आतून आईने दार उघडलेच नाही, बराच वेळा बेल वाजवून काहीच रिस्पॉन्स नाही म्हणल्या्वर, त्याने हाताने दार वाजवले तेंव्हा दार उघडे असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने दार उघडले तर घरात गर्द अंधार, काहीच दिसेना. शेवटी आईला हाका मारल्या पण आईचा प्रतिसाद येईना मग मोबाईलची बॅटरी सुरू करून त्याने लाईट्स ऑन केल्या तर पूर्ण हॉलमध्ये त्याचे लहानपापासूनचे छान छान फोटो लावले होते, हॉल अगदी साजेसा पण नीट नेटका सजवला होता.

प्रत्येक फोटो पाहून आरव भाऊक होत होता. त्याच्या शाळेचा पहिला दिवस आणि आईला घट्ट बिलगून बसलेला आरव, जन्म झाल्या क्षणी लाल चुटुक शांत झोपलेला आरव, पहिल्या वाढदिवसा्पासून ते वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत काढलेला प्रत्येक फोटो, शाळेत डान्स करताना काढलेला, फिरायला गेला असताना काढलेला, आईला घट्ट मिठीत घेतलेला असे एक ना अनेक फोटो पाहून तो भावूक झाला पण त्याने कशाबशा भावना कंट्रोल करत आईला आवाज दिला, तोच त्याच्या आवडीची काजू कतली आणि रसमलाई घेऊन आई हजर झाली.

आईने लगेच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पटकन हातातील मिठाई त्याला भरवली आणि आशिर्वाद घेण्यासाठी आरव वाकला पण त्याच्या आईने त्याच्या खांद्याला धरुन त्याला थांबवले आणि त्याने आईला मिठी मारत कसेतरी रोखून ठेवलेले अश्रू वाहू दिले. आदिती पण त्याला बिलगून खूप खूप रडली. बऱ्याच वेळाने आदितीने स्वतःला सावरत आदित्याकडे पाहिले आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकले. चला आता तुझ्या आवडीचा केक कापून घेऊया म्हणत, ती केक कडे वळणार इतक्यात, आदितिचे आई, बाबा, भाऊ, बहीण, भाऊजी आणि भाची आले. सगळ्यांनी आरवला जवळ घेत त्याला खूप शुभेच्छा दिल्या आणि उत्साहात वाढदिवस साजरा झाला.

आरवने त्याच्या आईकडे पाहिले आणि म्हणाला, तू जगातील सगळ्यात छान आणि गोड आई आहेस आई. आदितीला त्याचे बोलणे ऐकून खूप छान वाटले, आजवर केलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याची जाणीव तिला झाली आणि सगळ्यांना हसुन दोघांनी निरोप दिला.

आदितीने किचन मधली आवराआवर केली आणि रूमकडे वळली तर तिचे लक्ष बाल्कनीत उभ्या असलेल्या आरवकडे गेले. आदितीने त्याच्या केसावर हात फिरवत विचारले, झोपायचे नाही का मनुल्या तुला ?? थकला असशील ना ?? आरव तिच्या मांडीवर डोके टेकत म्हणाला, आई कसे ग सुचते तुला इतके सगळे ?? आज ऑफिस मधून यातला उशीर झाला तेंव्हा तुझे मिसकॉल पाहून वाटले होते आज हमखास तुझ्या शिव्या खाणार.

पण तू तर माझा दिवस अजुनच खास बनवलास. आई मला बाबांचा चेहरा पण आता नीटसा आठवत नाही, इतकी वर्षे झाली त्यांच्या पासून दूर राहून. अगदी सहा सात वर्षांचा असताना तू मला घेऊन आली होतीस त्यांच्याकडून. त्यानंतर आमचा कधीच संबंध आला नाही. पण तू एकटीने आजी आजोबाच्या मदतीने मला वाढवलंस, शिकवलंस, मोठं केलंस. आजवर मी तुला कधी बाबांबद्दल विचारलं नाही कारण त्यांचं नाव जरी काढल तरी तुझ्या चेहऱ्यावरील भाव क्षणात बदलत होते. तू नेहमी माझ्याशी मैत्रिणी सारखी वागलीस, कोणत्याच नात्याची, गोष्टीची कमतरता भासू दिली नाहीस.

पण कधीच बाबांबद्दल का काही सांगितलं नाही ?? काय झाले होते तुमच्या नात्यात ?? काही चुका झाल्या होत्या का ?? आदिती म्हणाली, बाळा प्रत्येक नात्यात चुका होतात तशाच त्या आमच्याही नात्यात झाल्या, पण त्याची मोठ्यातली मोठी चूक मी समजून घ्यावी अशी त्याची अपेक्षा असायची, पण त्याने मात्र माझी लहान चूक पण कधी समजून घेतली नाही. मला प्रेम काय माणुसकी दाखवली नाही, मी त्याचा मार सहन केला पण त्याला उलट उत्तर दिलेले कधी चालले नाही.

तो सांगतो तीच पूर्व दिशा मानून जगणे भाग होते त्याच्याजवळ. काही वर्षे ते ही केले पण त्याच्या चुका वाढत गेल्या तसेच आमच्या नात्यातील एकमेकांबद्दलचा आदर कमी होत गेला आणि त्यामुळेच संवाद पण हरवला.

पण एकमेकांकडून झालेल्या चुकांमुळे नाते बिघडत नाही, एकमेकांनी समजून घेतले तर नाती जपली जातात पण हरवलेला संवाद आणि आदर न मिळाल्याने नाती बिघडतात. तसच काहीसं आमच्याही बाबतीत झाले. आरव मुळातच हुशार होता, काय झालं असेल याची त्याला कल्पना आली आणि आईच्या कुशीत शिरून तो लगेच झोपी गेला.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!