Skip to content

कालचे कपडे पुन्हा घातले तर चालते, पण कालचे तेच विचार आज, उद्या आणि परवाही ठेवल्याने प्रॉब्लेम होतो.

कालचे कपडे पुन्हा घातले तर चालते, पण कालचे तेच विचार आज, उद्या आणि परवाही ठेवल्याने प्रॉब्लेम होतो.


मयुरी महाजन


औद्योगिकीकरण असेल, आधुनिकीकरण असेल, किंवा तंत्रज्ञानात होत जाणारे बदल असतील, या प्रत्येकाचा आपल्या जीवनमानावर परिणाम होतो,हा बदल कमी अधिक प्रमाणात असलेला बघायला मिळतो, आपण बरेचदा म्हणतो, ती व्यक्ती फार जुन्या विचारांची आहे ,म्हणजे जे काही नव्याने येत आहे, ते ती माणसे स्वीकारत नाही, जे जुनं तेच खरं ,असं म्हणणारी मंडळी, नव्या गोष्टींना स्वीकाराला तयार नसतात ,असं पण नाही की नव स्वीकारताना जुनं सर्वच काही टाकून देण्यासारखं असतं, काही जुनं, काही नवं ,या दोघांना सोबत घेऊन चाललो, तर प्रॉब्लेम निर्माण होणार नाही ,कालचे कपडे पुन्हा घातले तर चालते, पण कालचे तेच विचार आज उद्या आणि परवाही ठेवल्याने प्रॉब्लेम होतो ,आणि हा प्रॉब्लेम होऊ द्यायचा नसेल, तर आपण धरून ठेवलेल्या विचारांमध्ये नेमकी गफलत कुठे होते, ते आपण खूप साध्या उदाहरणावरून समजून घेणार आहोत, हे उदाहरण आमच्या शिक्षकांना आम्हाला परंपरागत रीत कशी पडते, हे समजण्यासाठी सांगितले होते,

एका कुटुंबात आजीबाई होत्या, त्यांचा रोजचा नित्यनेम असे, की देवपूजा करण्याच्या आधी ते आपल्या घरातील दूध एका मोठ्या पातेल्याखाली झाकून ठेवायच्या, व त्याच्यानंतरच ते देवपूजा करायला बसायच्या, कारण त्यांनी आपल्या घरात मांजर पाडलेली होती, व त्या मांजरीने दुधाला संपवू नये, त्यासाठी आजी काळजी घ्यायच्या,

परंतु आजी करत असलेली क्रिया ही सुनबाई बघायची, त्याच्या मागचा मतितार्थ लक्षात न घेता ,आजीच्या गेल्यानंतर सुद्धा ती क्रिया तशीच सुरू राहिली, की आधी दुधाला पातेल्याखाली झाकायचे ,नंतर देवपूजा करायला बसायचे, परंतु आता घरात मांजरही राहिली नाही ,आणि आजी सुद्धा राहिल्या नाहीत, परंतु आजींची क्रिया मात्र आजही रोज नित्य नियमाने होत राहते, त्याला कारणीभूत फक्त आपले विचार आहे,

बघा उदाहरण मजेशीर आहे, पण त्याला जर समजून घेण्याचा प्रयत्न केला ,तर त्यामध्ये अर्थ मोठा आहे ,काही विचार ,काही गोष्टी त्या त्या वेळेलाच लागू होतात, नंतर त्यात बदल करणे गरजेचे ठरते ,अन्यथा आधी जसे होते ,तसेच असावे, याचा अट्टाहास आपल्यासाठी प्रॉब्लेम ठरू शकतो,

बदल हा निसर्गाचा नियम आहे, आमच्या वेळेस असं काही नव्हतं, आता कसं सगळंच बदलत जातेय, ही वाक्यं आपण सर्रास पण ऐकतो ,किंवा वापरतो, काही गोष्टी काही काळामध्ये इतक्या जीवनावश्यक नव्हत्या, परंतु आज रोजी त्यांची आवश्यकता म्हणजे जीवनासाठी श्वासाप्रमाणे बनलेली दिसून येत आहे,

काही वर्षांपूर्वी मोबाईल इतका आवश्यक नव्हता, परंतु आज रोजी जर आपण आजच्या युगाचं, आजच्या जगाचं ज्ञान अवगत करत नसणार, तर आपल्याला कुठे ना कुठे अडचणी येणार, हे नक्की ,कारण मोबाइलला फक्त एकमेकांशी संपर्क करायला, चॅटिंग करायला फेसबुक व्हाट्सअप पुरतेच मर्यादित राहिलेले नाही, तंत्रज्ञानाच्या किमयामुळे आपली कितीतरी कामे सहज शक्य झाली आहेत, घरी बसून बँकेचे व्यवहार असतील ,ऑनलाइन कामे असतील ,इलेक्ट्रिसिटीचे बिल असेल, पुस्तक, माहिती, दळणवळणाची साधने ,एखादी गोष्ट खरेदी विक्रीचे व्यवहार ,घर बसल्या सहज सोपे झाले ,इतकेच काय परदेशातील व्यक्ती एका क्लिकवर बोलू शकते ,आयटी क्षेत्रात काम करणारी मंडळी ज्यांना पोटापाण्याचा सर्व व्यापार त्यावर सुरू आहे ,आज तासनतास मोबाईल लॅपटॉप वरती काम चालतात,

‘विचार बदला जग बदलेल ‘हे वाक्य कुठेतरी वाचनात आलं होतं, आणि ते खरं आहे ,आपण जर एकत्र कुटुंब पद्धतीचा अनुभव घेतला असेल, तर वेगवेगळ्या वयाची माणसं जेव्हा एका छताखाली वावरतात, तेव्हा बऱ्याचदा विचारांचा गॅप बघायला मिळतो ,ज्याला आपण जनरेशन गॅप असे म्हणतो ,जो तो त्याच्या जागी बरोबर असतो ,पण एकाचा विचाराला दुसऱ्याला स्वीकारता येत नसल्यामुळे किंवा समजून न घेतल्यामुळे अडचणी उद्भवतात,

म्हणून कालपर्यंत आपण जे विचार करत होतो, तेच विचार आपण आज उद्या आणि परवाही ठेवू शकत नाही, त्या विचारांना आपल्याला फुलांप्रमाणे टवटवीत ठेवायचे असेल, तर त्याला अपडेट करत जावे लागेल, थोडासन मागचं, थोडासं आत्ताचं घेऊन त्याला जोड देऊन पुढे जावं लागेल, कारण काही विचार त्या त्या वेळेस बरोबर वाटत असले, तरी पुढे तेच बरोबर ठरतील, असे नाही, कारण नव्याने येणाऱ्या गोष्टी सुद्धा काहीतरी नाविन्य घेऊनच आलेल्या असतात, त्या नाविन्यतेचाही आपण कधीतरी आस्वाद घ्यायला हवा, नाही का….???


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!