Skip to content

मी तुझ्याशी चांगलं वागतोय ना, म्हणून तू सुद्धा वागायलाच हवं??

स्वभावधर्म


डॉ. सोनाली उमेश गायकवाड


काही सांडले की मुंग्या जमा होतात, हे काही नवीन नाही. पण काल अशा मुंग्या बघून पार्थने (माझ्या लहान मुलाने )मुद्दाम आणून काही फराळाचे त्यांच्या समोर ठेवून त्या कशा खातात हे बघू लागला. एखादी मुंगी न खाता पुढे गेली की तो तिच्या पुढे तो दाणा करायचा. असा खेळ बराच वेळ सुरु होता.

नकळत माझ्या कडून सूचना झाली, सांभाळून हा एखादी मुंगी चावेल. त्यावर त्याचा निरागस प्रश्न आला, “मी तर त्यांना खायला देतोय मग त्या मला का चावतील?”त्याचा हा प्रश्न ऐकून मीही संभ्रमात पडली. पण लगेच त्याला कुणीही सांगेन तेच सांगितलं “अरे त्यात काय मुंगीच ती, तिचा स्वभाव आहे.चावू शकते ती.चावेल असेही नाही पण आपण सांभाळून राहावं”. म्हणाला “असं कस, एरवी तर तू म्हणतेस आपण कुणाला त्रास दिला तर कुणी तरी आपल्याला त्रास देत. मग आता तर मी मुंगीला त्रास नाही देत आहे. उलट खायला देतोय. ”

आणि मग माझ्या लक्षात आलं आपण वयाने मोठे झालो खरे. पण लहानच राहिलो. इतके दिवस आपल्या लक्षातच आलं नाही. आपण कुणाशी चांगले किंवा वाईट वागलो म्हणून कुणी आपल्याशी चांगलं किंवा वाईट वागत नसतो. प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. मग ते आपण असो वा इतर.

म्हणून आपण अमुक एक वागलो म्हणून समोरचा तसा वागला असे विश्लेषण करणे चूकच. एखाद्या व्यक्तीच्या कुठल्याही कृतीला व्यक्ती परतवे प्रतिक्रिया वेगवेगळ्या असूच शकतात.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

8 thoughts on “मी तुझ्याशी चांगलं वागतोय ना, म्हणून तू सुद्धा वागायलाच हवं??”

  1. विचारलेल्या प्रश्नच उत्तर – “हो अर्थातच चांगलाच वागायला हवं”
    चांगला वागायची सक्ती हवी पण वाईट वागायला स्वातंत्र्य नको.
    मुंगीने मुंगी धर्म पळाला तर माणसानेहि माणुसकी पाळायला हवी.
    वाईट वागणार्यांना स्वभावाचा पांघरून घालून झाकणे सुद्धा चुकीचा आहे.

    हा सुद्धा बोध आपण यातून घेऊ शकतो. ?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!