इतरांना हसवण्याची क्षमता तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा, कारण ती सहजासहजी कोणाकडे नसते.
मेराज बागवान
Laughter is the Best Medicine’ असे म्हटले आहे.अगदी खरे आहे ते.हास्य माणसाला उत्साह देते, मूड फ्रेश करते.त्यामुळे हसणे हे आरोग्यदायी आहे.आणि त्यात तुमच्याकडे हसवण्याची क्षमता असेल तर ‘क्या बात है’.कारण सहजासहजी कोणाकडे ही क्षमता नसते.म्हणून तुमच्याकडे ती असेल तर ती नक्की वापरा.
‘she has very good sense of humor’ असे इंग्रजीत म्हटले जाते.म्हणजेच तिच्याकडे विनोदबुद्धी आहे,ज्यामुळे इतरजण हसतात.खरेच हसवण्याची क्षमता खूप मोठी आहे.दुःख तर प्रत्येकाकडे असते.अनेकजण तर भेटले की एकमेकांच्या तक्रारी संगण्यातच वेळ निघून जातो.आणि हसणे बाजूला राहते.
एखाद्या ग्रुप मध्ये कोणीतरी एक अशी व्यक्ती असते ती नेहमी स्वतः हसमतमुख असतेच पण इतरांना देखील कोणत्याही माध्यमातून हसवत असते.मग काही विनोद सांगणे असो किंवा काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने सांगणे असो.ती काहीही करून वातावरण हलकेफुलके करीत असते.काही जणांना हे जरा विचित्र वाटते.पण हे हसवणे खरेच दिलासा देणारे,ताण कमी करणारे असते.हसण्यामुकळे माणूस प्रफुल्लित होतो.आनंदी ,खुश होतो.मरगळलेल्या मनाला उभारी मिळते.म्हणूनच जर का तुमच्याकडे ही कला असेल तर ती नक्की वापरा स्वतःसाठी आणि इतरांसाठी देखील.
कधी कधी तुमची एखादी जवळची व्यक्ती काही अडचणीत असते किंवा निराश असते.त्यावेळी तिला उपदेश देण्याऐवजी काही हलक्याफुलक्या गोष्टी सांगितल्या आणि त्यातून विनोद निर्मिती होत असेल तर ती व्यक्ती थोडी ‘रिलॅक्स’ होते.समस्या जरी हसण्यामुळे संपून जात नसेल तरी देखील मार्ग तरी दिसण्यास मदत होते.त्यामुळे तुम्ही जर असे असाल तर इतरांना उभारी देण्यासाठी ही हसवण्याची कला नक्की वापरा.
कोणाचे दुःख आपण प्रत्येकवेळी कमी नाही करू शकत.पण हसवण्यामुळे ती व्यक्ती थोडा काळ का होईना आपले दुःख नक्की विसरू शकते आणि आनंदाचे काही क्षण नक्कीच अनुभवू शकते.त्यामुळे तुमच्याकडे असणारी हसवण्याची कला तुम्ही नक्की वापरा.यामुळे तुम्हाला देखील एक प्रकारचे आत्मिक समाधान लाभेल.
जी व्यक्ती नेहमी इतरांना हसवत असते.तिला काही दुःख नसतात,समस्या नसतात असे नसते.पण त्या व्यक्तीचा स्वभावच हसवण्याचा असतो.आपल्या आजूबाजू अशी बरीच माणसे असतातच.ज्यांच्या सहवासामुळे माणूस आनंदी होतो.आणि अशी माणसे सर्वांना हवीहवीशी वाटतात.त्यामुळे तुम्ही जर का असे असाल तर कायम असेच राहा.कोणी काय म्हणते याकडे लक्ष देऊ नका.कारण इतरांना हसवण्यासारखे पुण्य खूप मोठे आहे.
अनेकांना जवळ हसवण्याची कला सहजासहजी नसते.कोणीही दुसऱ्या व्यक्तीला पटकन दुखावतो.नको ते बोलतो.त्यांच्या डोळ्यात पाणी आणतो. पण ‘हसवण्याची’ कला मात्र सगळ्यांनाच जमते असे नाही.’हसवणे’ ही खूप ‘दुर्मिळ’ कला आहे.आणि जर तुम्ही तसे असाल तर नक्की ही कला वापरा. ह्याने फायदा जरी कोणाला नाहीच झाला तरी तोटा मात्र नक्कीच होणार नाही.
एखाद्याच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हास्य असणे ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही इतरांना मनापासून म्हणजे न दुखावता हसवता तेव्हा समोरची व्यक्ती तुमच्यावर हळूहळू विश्वास ठेवू लागते.नकळत तुम्हाला आपले मानू लागते.तुमचा सहवास तिला हवाहवासा वाटू लागतो.कारण आपल्याला जी व्यक्ती हसवते ती कुठे ना कुठे आपलं दुःख,त्रास,अडचणी कमी करू पाहत असते.त्यामुळे तुम्ही जर हसवणारे असाल तर नक्की ही कला वापरा.
ते म्हणतात ना, दुसऱ्यावर हसणं सोपं असतं पण दुसर्याला हासवणं खूप कठीण…
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.