Skip to content

खूपच पझेसिव्ह राहाल तर लोक तुम्हाला वैतागतीलच, हा साधा नियम आहे.

खूपच पझेसिव्ह राहाल तर लोक तुम्हाला वैतागतीलच, हा साधा नियम आहे.


मेराज बागवान


‘पझेसिव्ह’ या शब्दाचा अर्थ जो तो आपल्या सोयीनुसार घेतो.जसे की ,पझेसिव्ह असणे म्हणजे भावनिक असणे,काळजीपूर्वक काही गोष्टी करणे वगैरे वगैरे.पण ‘पझेसिव्ह’ असणे ही एक मानसिकता आहे आणि ही मानसिकता वाढीस लागली की काही व्यक्तीचा स्वभाव च पझेसिव्ह बनून जातो.मग नक्की हे पझेसिव्ह असणे म्हणजे काय ? पसेसिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीशी,वस्तूशी किंवा व्यक्तीशी खूप कनेक्टेड असणे,किंवा त्यावर स्वतःचा हक्क नेहमी दाखविणे.जणू काही एखाद्या गोष्टीवर आपला मालकी हक्क आहे असे वागणे.काही बाबतीत पसेसिव्ह असणे चांगले असते.पण खूपच पझेसिव्ह जर तुम्ही असाल तर लोक तुम्हाला वैतागतीलच.कसे ते पाहुयात.

मुग्धा एका ऑफिस मध्ये नोकरीस होती.अगदी नवीन ऑफिस सुरू झाले त्याच्या पहिल्या दिवसापासून ती तिथे होती.त्यामुळे सगळ्या गोष्टी तिला माहीत होत्या.अगदी घरासारखे ती ऑफिस ला जपत होती.थोड्या दिवसांनी एक-दोन जण नवीन रुजू झाले.मग ते काम करीत असताना ऑफिस मधील काही गोष्टी,काही कामे थोड्या वेगळ्या पद्धतीने करीत होते.यामुळे मुग्धा ला ते नको वाटत होते.पूर्वीपासून मी ऑफिस जसे सांभाळत आहे तसेच पुढेही चालले पहिजे असे तिला नेहमी वाटत असे.त्यामुळे इतरांनी कितीही छान कामे केली तरी तू पुन्हा पुन्हा तपासून पाहत होती.त्यामुळे ऑफिस मधील सर्व जण तिला खूप वैतागायचे.ती काम तर उत्कृष्ट करीत होती.पण ऑफिस च्या बाबतीत ती खूप ‘पझेसिव्ह’ होती आणि त्यामुळे ती अशी वागत होती.

अमोल ला एक प्रेयसी होती.ऋचा तिचे नाव.ती खूप ‘मॉड’ होती.केशभूषा-वेशभूषा अगदी पाशात्य पद्धतीची करीत असे.दिसायला देखील खूप सुंदर.पण अमोल नेहमी तिला कोणाशी बोलू देत नसे.तिने फक्त माझ्याशीच बोलले पाहिजे. फक्त माझ्याशीच सर्व काही गोष्टी शेअर केल्या पाहिजेत असे त्याला वाटत असे.सुरवातीला ऋचा ने हे दुर्लक्ष केले.तिने वाटले की प्रेम आहे म्हणून अमोल असे वागत आहे.पण दिवसेंदिवस अमोल जरा जास्तच ऋचा च्या बाबतीत ‘पझेसिव्ह’ होत चालला होता.आणि यामुळे ऋचा चा श्वास गुदमरल्यासारखा होत होता.हळूहळू ती अमोल शी बोलनाशी झाली.अमोल ला समजत नव्हते की नक्की त्याचे काय चुकले आहे.

त्या दोघांची एक मैत्रीण होती,भूमी.अमोल निराश दिसला म्हणून भूमी ने त्याने त्याविषयी विचारले.तर अमोल ने तिला सर्व काही सांगितले. भूमी अमोल आणि ऋचा ला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती.अमोल ला ती समाजवून सांगू लागली.”अमोल ,ऋचा चे फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे आणि ती लग्न देखील तुझ्याशिच करणार आहे.ती तुझीच आहे.पण तू तिला तिचा तिचा वेळ दे, स्पेस दे.तिला तिचं आयुष्य तिच्या मर्जीने जगू दे.तिला मोकळीक दे.ऋचा चा स्वभाव खूप मोकळा आहे. पण ती तुझ्याशी ‘कमिटेड’ आहे.सो प्लिज तू पण तिला आहे तशीच स्वीकार.आय थिंक यु आर गेटिंग मी..?”

अमोल ने देखील शांतपणे विचार केला आणि भूमी चे बोलणे त्याला पटले.कालांतराने मग त्यांचे नाते देखील सुरळीत झाले.आणि आज दोघेही छान संसार करीत आहेत.

वरील उदाहरणे पाहिली तर मुग्धा आणि अमोल दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट होती ती म्हणजे,’पसेसिव्ह’ असणे.मुग्धा ऑफिस च्या बाबतीत आणि अमोल ऋचा च्या बाबतीत.दोघांचा उद्देश चांगला होता.पण पद्धत थोडी चुकत होती.दोघेही ‘अति’ पझेसिव्ह होते.आणि त्यामुळे लोक त्यांच्यावर वैतागलेले होते,ते चांगले असूनही.

असेच तुमच्या बाबतीत देखील घडत असेल.कोणी स्वतःच्या घराविषयी,कोणी बायकोविषयी,कोणी एखाद्या मित्राविषयी खूपच पझेसिव्ह असतो.पण यामुळे होते काय की नाती हळूहळू दुरावू लागतात.इतरांना तुमच्याशी नाते ठेवणे ओझे वाटू लागते.मग तुमचा उद्देश कितीही चांगला असेल तरी देखील.त्यामुळे ‘डीट्याच’ व्हायला शिका.एखाद्या व्यक्तीशी,जागेशी,गोष्टीशी,वस्तूशी इतकेही ‘अटयाच’ राहू नका की त्यातून कधी बाहेरच पडू शकणार नाही.

प्रत्येक व्यक्तीचे आपले असे एक आयुष्य असते.तुम्ही म्हणाल तसेच कधी होत नसते.काही गोष्टी आयुष्यात मिळाल्या नाही की माणूस हट्टी बनतो.पण याने काहीच साध्य होत नाही.सर्वजण तुमच्या दूर जाऊ लागतात.म्हणून ‘अति पझेसिव्ह’ असणे टाळा.

काही पालक देखील मुलांवर आपल्या अपेक्षा लादतात.जे आम्ही करू शकलो नाही ते तू कर असे ते म्हणतात.अगदी लग्नाचा निर्णय देखील काही ठिकाणी आई-वडीलच घेतात.का तर ही माझी मुलगी आहे / मुलगा आहे. आणि तिच्या आयुष्याचे निर्णय मीच घेणार.पण इतकं पझेसिव्ह असणं मुलांना खूप दुखावत.आणि ते हळूहळू पालकांपासून दूर होऊ लागतात.अबोल राहतात.

असे हे पझेसिव्ह असणे होय.पझेसिव्ह राहा पण इतकं ही नाही की लोक तुम्हाला वैतागतील.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “खूपच पझेसिव्ह राहाल तर लोक तुम्हाला वैतागतीलच, हा साधा नियम आहे.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!