Skip to content

बायकोला समजून घेणे हे सर्वात कठीण काम का वाटते पुरुषांना?

बायकोला समजून घेणे हे सर्वात कठीण काम का वाटते पुरुषांना?


मेराज बागवान


बायकांना’ समजणे फार अवघड बुवा.असे अनेक पुरुष म्हणत असतात.ह्या बायकांच्या मनात काय चाललेले असते हे त्या देवालाच ठाऊक असेल अशी बरेचदा पुरुषांची मानसिकता होत असते.का बरे त्यांना असे वाटत असेल? बायकोला समजून घेणे म्हणजे सर्वात कठीण काम असे अनेक पुरुषांचे मत असते.काय बरे ह्या मागची कारणे असतील?

बायको नवऱ्याच्या अत्यंत जवळची व्यक्ती असते.बायको,पत्नी म्हणजे अर्धांगिनी असे म्हटले जाते.पण तरी देखील बायको अनेकदा काही गोष्टी मनातच ठेवते. म्हणजे ती वरवर तर खूप बडबड करीत असते,बोलत असते.पण अशा काही गोष्टी ती नवऱ्याला मुळीच सांगत नाही.जसे की, तिचे आजारपण ,आर्थिक परिस्थती कमजोर असताना करू लागणारी जुळवाजुळव. इत्यादी.त्यामुळे पुरुषांना अनेकदा वाटत असते की बायकोला समजणे अवघड आहे बुवा.

कधी नवऱ्याला कामावरून यायला उशीर होणार असेल तर स्वतःहून ती फोन करते.पण जरा रागातच बोलते.जेवण केळवे का विचारते आणि पुढचे उत्तर ऐकायच्या आधीच मला जेवण बनवावं लागतं ,वाया जातं जेवण, माझे कष्ट वाया जातात असे ती पटपट बोलून जाते.पण खरे तर ती हे सर्व काळजी पोटी बोलत असते.पण मग पुरुषांना समजत नाही नक्की तिच्या मनात काय चालले आहे.आणि त्यामुळे पत्नीला समजणे अवघड काम असे पती ला वाटत राहते.

पती अनेकदा ‘रोमँटिक’ असतो.पत्नी देखील असते.पण ती तिच्या त्या प्रकारच्या भावना उघडून बोलत नाही.त्याऐवजी दुसऱ्या काही तरी गोष्टी करत असते.जसे की ,नटणे,सुंदर कपडे घालणे वगैरे.नवऱ्याला वाटते काय ही सारखी नटते-मुरडते.पण खरे कारण तर वेगळे असते.आणि म्हणून अनेकदा पुरुष मंडळी ‘कनफ्यूज’ होतात.

पत्नी मुलांच्या देखील आधी फक्त आणि फक्त पती साठी जगत असते.झिजत असते.प्रथम पती आणि नंतर मुले असेच ती कायम जगत असते.पण पती ला तसे दाखवत नसते.मुलांचे संगोपन ह्यात वेळ व्यतीत करीत असते,पण दुसरीकडे पती साठी देखील अनेक संघर्ष, तडजोड,त्याग करीत असते.त्यामुळे पती ला वाटू शकते की हिला कसे समजून घेऊ.खूप अवघड आहे हे.

कोणतीही परिस्थिती आली तरी बायको आपल्या नवऱ्याची साथ कधीच सोडत नाही.खासकरून जेव्हा नवरा अडचणीत असतो,मोठे आर्थिक संकट आलेले असते किंवा काही आजारपण असते तेव्हा ती नवऱ्याची ढाल बनून राहते.मात्र कधी कधी तिची चिडचिड पण होते. मग पतीला तिची ही चिडचिड दिसते.पण नवरा त्रासात आहे हे तिला बघवत नसते.म्हणून तिचे असे होत असते.मात्र पतीला तिला समजून घेणे अवघड वाटते.

अनेकदा पती सारखी बडबड करत असते,त्रागा करीत असते.पण काही पाहिजे,किंवा फक्त अपेक्षा आहेत पतीकडून म्हणून हे होत नसते.खरे कारण असते,की, पतीने तिला पुरेसा वेळ द्यावा.तिच्यावर इतके प्रेम करावे की कोणीच कोणावर करत नसेल.माझा नवरा माझ्यापासून दूर तर होणार नाही ना ह्या भीतीने ती चिडचिड करीत असते.पण नवऱ्याला हे समजून घेणे अवघड वाटते.

निसर्गाने पुरुष आणि स्त्री ची निर्मिती च अशी केली आहे की ,काही गुण स्त्री ला उपजत दिले आहेत जसे की ,भावनिकता,काळजी इत्यादि आणि पुरुषांना काही उपजत गुण दिले आहेत जसे की , व्यावहारिकता, धीटपणा इत्यादी.आणि निसर्गाच्या ह्या नियमाप्रमाणेच स्त्री-पुरुष आपोआप जगत असतात.पण लग्नाचे नाते हे एक स्त्री आणि एक पुरुष यांचे असते.दोघांनी एकमेकांचे वेगळेपण स्वीकारणे आणि त्याचा सन्मान करणे अपेक्षित असते.आणि हे जर जमले तर मग समजून घेणे कठीण काम वाटणार नाही.

पुरुष देखील भावनिक असतो.पण त्या भावना तो थोड्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त करीत असतो.स्त्री जे काही असेल ते सरळ मार्गाने व्यक्त करीत असते.त्यामुळे जुळवून घेणे अवघड होते.पण थोडा शांतपणे दोघांनी देखील विचार केला,स्वतःचे अहंकार बाजूला ठेवले तर नाते रुळावर येते.आणि असे होत गेले ना,तर मग कोणत्याच पुरुषाला बायकोला समजून घेणे अवघड काम वाटणार नाही.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

3 thoughts on “बायकोला समजून घेणे हे सर्वात कठीण काम का वाटते पुरुषांना?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!