Skip to content

तुम्हाला एखाद्याचा प्रचंड राग आलाय, पण न चिडता काही पटवून द्यायचे आहे तर हा लेख वाचा.

तुम्हाला एखाद्याचा प्रचंड राग आलाय, पण न चिडता काही पटवून द्यायचे आहे तर हा लेख वाचा.


सोनाली जे.


काम , क्रोध , लोभ, मोह , मद , मत्सर, हे षडरिपू आहेत.

मानवी मन विलक्षण तर आहेच पण समजून घेण्यास खूप क्लिष्ट ही आहे. मानवी मन हे बदलणारे आहे आणि व्यक्ती परत्वे ते विविध भावना दाखवते. उदाहरण बघा ..मन सांगते तसे आपले , परके , तो जवळचा तो लांबचा हे भेद मन करत असते. तशा भावना ही. आणि तसे वर्तन ही घडत असते.

हे सहा षडरिपू म्हणजे खरे तर गरजेचे ही आहेत पण त्याचे प्रमाण बिघडले की ते शत्रू किंवा विकार म्हणावे लागते. प्रत्येक गोष्ट मर्यादेत असेल तर माणूस शांत, उत्साही, आणि त्याचे वर्तन ही चांगले असते.कंट्रोल मध्ये सगळ्या गोष्टी असतात.

अर्थात हे सहा रिपु एकमेकांवर अवलंबून आहेत. आज आपण राग याविषयी बघू . राग येण्याची कारणे काय ? राग म्हणजे काय ?

राग :-

राग ही एखाद्या गोष्टीला दिलेली प्रतिक्रिया आहे. अशी गोष्ट जी अपेक्षित नसते. जी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते. किंवा एखाद्याचे वर्तन आपल्या अपेक्षेनुसार घडत नाही. किंवा एखाद्याने विनाकारण आपल्या भावना दुखावल्या.

मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्ती एकमेकात खूप involve असतात. अशावेळी ती व्यक्ती आपल्या सोबत कायम असावी असे वाटत असतें. आणि ती कायम आपली असावी असे वाटते. स्वार्थी म्हणले तरी चालेल. पण ती involvement असते त्यामुळे आपला हक्क , आपला , अधिकार असे वाटत असते. तेव्हा जर त्या आपल्या व्यक्तीचे वागणे चुकले , किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण सोडून दुसऱ्या व्यक्तीचे स्थान महत्वाचे आहे असे जेव्हा समजते तेव्हा साहजिक विचार क्षमता खुंटते , त्याक्षणी सगळ्या भावना , प्रेम , माया , आपुलकी सगळे दूर होवून पहिली प्रतिक्रिया रागाची होते याचे कारण माझी व्यक्ती अशी कशी वागली.

दुसरे मग असे होते काही वेळेस आपल्या आयुष्यात असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या त्या व्यक्तीविषयी उगीचीच द्वेष, मत्सर निर्माण होतो. कारण काय तर आपलं स्थान कुठेच राहिले नाही आपल्या व्यक्तीच्या आयुष्यात ही आपले महत्व नाही राहिले ही insecurity .असुरक्षितता त्रासदायक ठरते. आणि दुसऱ्या व्यक्तीला आपले स्थान मिळाले म्हणून ही द्वेष, मत्सर निर्माण होतो.

तुम्हाला एखाद्याचा प्रचंड राग आलाय, पण न चिडता काही पटवून द्यायचे आहे तर काय कराल ?

१. त्याक्षणी प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देणे टाळा :-

तुम्ही समोरच्या व्यक्तीवर रागावला आहे याचा अर्थ तुम्ही ही रागाची प्रतिक्रिया कोणत्या तरी गोष्टीला दिली आहे. जी तुमच्या मनाविरुद्ध घडली आहे. किंवा तुमची अपेक्षा होती त्या पेक्षा वेगळी घडली आहे.

तुम्हाला एखाद्याचा प्रचंड राग आलाय, पण त्या क्षणी काही ही प्रतिक्रिया देवू नका. शांत रहा. आणि थोड्या वेळाने रागाची तीव्रता कमी झाली की काही पटवून द्यायचे आहे तर ते पटवून द्या. कारण रागाच्या भरात विचार क्षमता , निर्णय क्षमता ही काम करतच नाही. त्याक्षणी केवळ भावनांचे पारडे जड झालेले असते.

तुम्ही रागावलेले असताना काही समजून सांगण्याच्या मनःस्थितीत नसता. आणि त्याक्षणी रागाच्या भरात तुम्ही काही पटवून द्यायला गेलात तर समोरची व्यक्ती ही लगेच react होते. प्रतिक्रिया देते. ती ही रागाची. ती ही व्यक्ती चिडते. त्यातून वातावरण अजून जास्त गरम होते.

कारण तापलेल्या तव्यावर हात ठेवला तर आपला हात भाजणार . तापलेल्या तव्याला त्याने काय फरक पडणार आहे का ? नाही ना !

म्हणून त्याक्षणी प्रतिक्रिया देणे टाळा. थोडा वेळ जावू दे . तेव्हा राग आपोआप शांत होईल. निदान रागाची तीव्रता कमी होईल.

त्यानंतर प्रतिसाद द्या. प्रतिसाद म्हणजे काय ? तर एखाद्या गोष्टीवर पर्याय शोधणे , तोडगा काढणे.

त्यानंतर रागाचे कारण समजून सांगा. तुमचा राग निघाला म्हणजे समोरच्याची नक्की काय आणि कुठे चूक झाली याचे स्पष्टीकरण द्या.

दुसरे जर त्या व्यक्तीला समजले नाही की तिचे काय चुकले तर अशावेळी त्या व्यक्तीला विश्वासात घ्या . बोला . तिला मोकळे होवू दे. तुमची चूक असेल तर ती स्वीकारा , नसेल तर तुम्ही कसे बरोबर आहात हे शांतपणे पटवून सांगा.

एकदा नाही पटले तर परत परत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पटवून द्या.

२. अपेक्षा आणि वस्तुस्थिती यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा :-

समोरच्या व्यक्तीची काही स्वप्ने असतात. त्या व्यक्तीची काही तरी अपेक्षा असते मग ती तुमच्याकडून असते. पण प्रत्येक वेळी परिस्थिती ही बदलत राहणारी असते ती पूर्ण झाली नाही की तो परिस्थितीजन्य राग तुमच्यावर निघतो. तुमच्यावर राग निघाला की तुमची ही चिडचिड होते. राग येतो. अशावेळी परत एकच त्याक्षणी शांत राहायचे.

समोरच्या व्यक्तीचा पारा खाली आला की त्या व्यक्तीची अपेक्षा आणि वस्तुस्थिती याची जाणीव करून द्यायची. त्या अपेक्षा आणि वस्तुस्थिती यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करायचा. त्यावर मार्ग शोधायचे. त्या समोरच्या व्यक्तीच्या मदतीनेच.

३. शांत राहणे :-

तुम्हाला एखाद्याचा प्रचंड राग आलाय, पण न चिडता काही पटवून द्यायचे आहे तर पहिले प्रथम शांत रहा. त्या क्षणी काहीच घडले नाही एवढे नॉर्मल रहा.

समोरच्याला बरेचदा समजत ही नाही की तुम्ही रागावला आहात. कारण तो बोलून रिकामा होतो.

अशावेळी तुम्ही तेवढेच cool राहून समोरच्यावर न चिडता शांतपणे त्याचे कुठे , कसे चुकले हे पटवून द्यायचे. योग्य काय आणि अयोग्य काय यातला ही फरक दाखवून द्यायचा.

४. संधी द्यावी :

रागावले आहोत हे चिडून react न होता समजावून सांगून काय चुकते आहे. काय अपेक्षित आहे याची जाणीव करून ..पटवून देवून ते सुधारण्यासाठी संधी द्यावी.

५. मौन :

एखाद्याचा राग आला आहे पण न चिडता त्याला पटवून देताना सरळ मौन पाळायचे आणि सुशिक्षित , वयाने मोठी असेल व्यक्ती , आदर असेल , दुखवायचे नाही हा हेतू असेल तर लिखित स्वरूपात राग प्रकट करावा . आणि तशी कृती करावी. म्हणजे न चिडता ही आपल्या रागाचे कारण समजू शकते त्यांना.

६. त्याक्षणी विषय बदलायचा :

तुम्हाला एखाद्याचा राग आला तर त्याक्षणी विषय बदलायचा. चिडून न दाखवता त्याक्षणी एक ते शंभर स्वतः मोजा. समोरच्याला ही मोजायला लावा. दीर्घ श्वास घ्या. समोरच्याला ही घ्यायला सांगा.

तर थोडे बाहेर जावून या. फिरून या. काही मनोरंजनाचे कार्यक्रम बघा. दोघेही वेगळ्या मूड मध्ये असतील की सगळे विसरायला होते. रागाची तीव्रता कमी होते.

आणि मग समजून सांगणे ही सोपे जाते. पटवून देण्याची क्षमता वाढते. वेगळ्या विषयातून मूळ मुद्दा पटवून देत गेले की ते सहज पटते.

तुम्हाला एखाद्याचा प्रचंड राग आलाय, पण न चिडता काही पटवून द्यायचे आहे हे खरे तर खूप अवघड असते. त्याकरिता स्वतः वर संयम ठेवणे खूप गरजेचे असते. आणि स्वतः ची एक विचारांची पक्की बैठक तयार असणे गरजेचे असते. अर्थात अनुभव ही गरजेचां असतो. आणि आपला राग कंट्रोल मध्ये ठेवून समोरच्यावर न चिडता त्याला पटवून सांगणे म्हणजे की एक कलाच आहे. त्या साठी अथक परिश्रम घेवून त्यात प्रावीण्य मिळवावे लागते.

स्वतः वर , रागावर , षडरिपूनच्या वर कंट्रोल ठेवणे सगळ्यात गरजेचे आहे. त्यासाठी दीर्घ श्वास घ्या. योगा, meditation, exercise करा. मोकळ्या हवेत फिरायला जा. आणि आपल्या विचारांना कंट्रोल मध्ये ठेवा. आपल्या विचारांना योग्य दिशा द्या.

All the best 👍🏻


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “तुम्हाला एखाद्याचा प्रचंड राग आलाय, पण न चिडता काही पटवून द्यायचे आहे तर हा लेख वाचा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!