प्रसंगांना तोंड देणारी आणि द्यायला लावणाऱ्या माणसांची साथ कधीच सोडू नका.
मयुरी महाजन
आयुष्य म्हटलं की बरे वाईट प्रसंग आलेच, त्याशिवाय आयुष्यालाही पूर्णत्व प्राप्त होत नाही, आयुष्यातील प्रसंग आयुष्याला आकार देत जातात, कधी कधी काही प्रसंग अतिशय जीव घेण्या रुपाची असतात, परंतु अशा प्रसंगाला तोंड देणारी व द्यायला लावणारी माणसे सुद्धा असतात, ही माणसं असतात, म्हणून जीव घेण्या प्रसंगाची सुद्धा वेदना जाणवत नसते, बऱ्याच वेळा आपण दुसऱ्यांना प्रेरणा देतो, एखाद्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी जर मनाचे खच्चीकरण होत असेल, आपल्या क्षमता कमी पडत असतील,
आणि जेव्हा मार्ग दिसत नसेल, सर्व काही संपल असं वाटत असेल, त्यावेळी आपण समोरच्या माणसाला धीर देतो, त्याला तो प्रसंग फेस करण्यासाठी आधार देतो, व तुला हे करावंच लागेल, स्वतःसाठी नाही, तर किमान तुझ्या परिवारासाठी तरी, असं म्हणून, मी आहे ना तुझ्यासोबत, फक्त तू हरू नकोस, अशी दिलेली साथ त्या खचलेल्या व्यक्तीसाठी संजीवनी प्रमाणे ठरते….
परंतु जी व्यक्ती सर्वांना धीर देत असते, त्या व्यक्तीला सुद्धा धीर हवाच असतो ,कारण की हाच प्रसंग जर माझ्यावर असेल, तर माझी काय अवस्था राहील, असा प्रश्न पडतो, व आपल्या जवळच्या व्यक्तीच्या प्रसंगाबद्दल जर आपण इतके अस्वस्थ आहोत, तर आपल्यावर हा प्रसंग आलाच तर आपली अवस्था काय असेल,
माणुस कितीही मोठ्या पदावर असू द्या ,तो पैशाने कितीही श्रीमंत असू द्या, परंतु जेव्हा केव्हा माणसावर एखाद्या बऱ्या वाईट प्रसंगाला तोंड देण्याची वेळ येते, तेव्हा माणसाजवळ माणूसचं असावा लागतो, कारण शेवटी आपण माणस आहोत, आणि माणसाचं काळीज भरायला माणसाजवळ माणूसच असावा लागतो ,
आयुष्यात यशाच्या शिखरापर्यंत माणूस सहज पोहोचत नाही, जेव्हा त्याने सुरुवात केलेली असते, तेव्हा कितीतरी वेळा अपयशाची झळ सुद्धा बसलेली असते, कितीतरीदा धिर खचलेला असतो, आपल्याने होईल की नाही ,इथपर्यंत शंका येत असतात, परंतु अशा प्रसंगातही आपल्याला साथ देणारी व त्या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यायला लावणारी माणसं, आयुष्यात कधीच विसरायची नसतात, अशा माणसांची साथ कधीच सोडू नका…
वाईट वेळ , वाईट प्रसंग आयुष्यात यासाठी सुद्धा येतात, की आपल्याला आपल्या माणसांची ओळख व्हावी, कारण वाईट वेळेत वाईट प्रसंगात माणसाला सल्ले नको असतात, साथ पाहिजे असते, कुणाची तरी, त्या प्रसंगाला व्यक्ती एकटीच पार करू शकते, फक्त साथ देणाऱ्यांचे हात हातात व पाठीशी त्यांचे आशीर्वाद, असायला हवे, बाकी परिस्थिती कितीही बिकट असली, तरी ती पार लागतेच, यात शंका नाही,
आयुष्यातला एखादा प्रसंग , एखादी व्यक्ती आठवा,जी नसती किंवा त्यांनी साथ दिली नसती, तर त्या प्रसंगाला फेस करण्याची हिम्मत झाली नसती, व आज रोजी तो प्रसंग आपण का आठवत आहोत, त्या मागची भावना आपल्याला त्या व्यक्तीने दिलेली साथ, आपण कधीच विसरू शकत नाही, व त्यांची साथ आपण कधीच सोडू नये, कारण आपल्या आयुष्यातले चढउतार या माणसांनी खूप जवळून अनुभवलेले असतात,
कवी कुसुमाग्रजांच्या कवितेच्या काही ओळी आठवतात, की
“मोडून पडला संसार, पण मोडला नाही कणा,
आणि पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा”
या कवितेच्या दोन ओळी आयुष्यातील कितीतरी अर्थ मोकळेपणाने सांगून जातात, शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे, कारण धार असलेली शब्द मन कापतात, व आधार असलेली शब्द मन जिंकतात, चढउतार आहेत, म्हणूनच आयुष्य चाललंय, जर ते एका रेषेत आले तरं आयुष्य संपेल ,अगदी आपल्या हृदयाच्या ठोक्याप्रमाणे….
कितीतरी प्रसंग आयुष्यात येतात, आणि जातात सुद्धा, आठवून बघा, कुठलाही प्रसंग आयुष्यात आला, आणि गेलाच नाही, असे झाले का, नाही ना, फक्त कुठल्याही प्रसंगांमध्ये आपलं आयुष्य गुंतून पडेल, किंवा तो प्रसंग आपल्या आयुष्यात आला म्हणून आयुष्य तिथेचं hold झालं, असं होता कामा नये,
त्यासाठी त्याला सामोरे जाणे महत्त्वाचे आहे, एक गोष्ट आहे की काही प्रसंग व त्याच्या आठवणी आपण आयुष्यभर विसरू शकत नाही, परंतु ते विसरण्याचा प्रयत्न पण करू नका, कारण ते तितकंच आठवत जाणारं, त्यासाठी त्याला जोड म्हणून नवीन काही देता येत असेल ,किंवा अन्य काही गोष्टी नव्याने करता येताय का? हे लक्षात घेऊन ,जर त्या मार्गाने आयुष्याला वळवण्याचा प्रयत्न केला, तर आयुष्यातल्या प्रवासाचा आनंद अजून नव्याने अनुभवता येईल, व बाकीचं कधी उडत गेलं हे, कळणार पण नाही…
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


👍
लेख खूप छान आहे