सर्वांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधीकधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते.
अपर्णा कुलकर्णी
घड्याळात पाच वाजले तशी स्वप्नीलने सगळी हातातील कामे सोडून ऑफिसमधून पळ काढला कारण आज त्याच्या लाडक्या राधाचा वाढदिवस होता आणि त्यासाठीच सगळ्या कुटुंबासोबत हॉटेलमध्ये डिनरला जायचे होते शिवाय तिच्या आवडीची सुंदर साडी खरेदी करायची होती. तो धावत गेला तसा सगळा स्टाफ त्याच्या मागे हसत सुटला आणि त्याने मागे वळून रागाने बघताच पुन्हा सगळे गप्प झाले. राधा त्याचीच वाट बघत होती, स्वप्नील दारात असतानाच पर्स घेऊन ती दारातच आली आणि गाडीवर बसली सुधा.
आपण दिवसभर काम करून थकून आलोय फ्रेश होऊन चहा घेईपर्यंत पण हिला रहावलं नाही ? इतकच काय आपल्याला चहा द्यावा हे ही तिच्या डोक्यात आले नाही असा विचार क्षणभर स्वप्नीलच्या डोक्यात येऊन गेला पण आज राधाचा वाढदिवस असल्याने तो शांत बसला. रधाच्या मनाप्रमाणे तिचा वाढदिवस साजरा झाला.
स्वप्नील काही दिवसांकरता ऑफिस कामानिमत्त बाहेरगावी गेला होता. त्याचे त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम होते आणि मुळात कोणाला दुखावण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. त्यामुळे प्रत्येकाच्या मनाप्रमाणे तो वागत आला होता. आताही बाहेरगावी येण्याची त्याची इच्छा नव्हती पण बॉसला नाही म्हणता आले नाही त्यामुळे तो आला होता.
आज चार पाच दिवसांनी काम संपवून तो घरी आला होता पण राधाने त्याने आणलेल्या वस्तू बघण्यात जितका रस दाखवला तितका त्याची विचारपूस करण्यात दाखवला नाही. तू इतके दिवस कुठे राहिलास, हॉटेल कसे होते, जेवण नीट मिळत होते का, आम्ही तुला खूप मिस केले असे काहीच न बोलता माझ्यासाठी काय काय घेऊन आला हेच बघण्यात ती गुंग झाली होती.
राधाचे असे वागणे आता स्वप्नीलला टोचत होते पण त्याचा कोणालाही न दुखावण्याचा स्वभाव त्याला बोलू देत नव्हता. राधा कायम स्वतः पुरताच विचार करत आली होती आणि स्वप्निल कायम गप्प रहात होता. सगळ्यांची मने राखत होता, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आला होता.
घरात आई वडीलांनाही त्याने कधीच दुखावले नव्हते पण त्याच्या वडिलांनी पण कधीच त्याच्या भावनांचा आदर केला नव्हता. राधा प्रमाणेच स्वतः पुरता, स्वतःच्या आनंदाचा विचार त्यांनी केला होता. स्वतःच्या आनंदापुढे बाकीच्यांच्या इच्छेचा विचार कधीतरी करावा असा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नव्हता अगदी राधाप्रमाणेच.
एकदा राधाने सिनेमाला जाण्याचा हट्ट केला पण स्वप्नील जरा आजारी असल्याने तो घरी लवकर आला होता पण राधाने तो विचार केला असता तर आश्चर्यच म्हणावे लागले असते. स्वतःच्या स्वार्थी आनंदापुढे तिला कधीच काही दिसले नव्हते.
स्वप्नीलच्या आईने बरेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकले नाही. शेवटी स्वप्नील कधी नव्हे ते चिडला आणि म्हणाला, आजवर माझेच सगळे चुकत आले आहे. प्रत्येकवेळी तुम्हा लोकांचा मी विचार करत आलो, तुमच्या आनंदात स्वतःचा आनंद मानत आलो, कधीच स्वतःचा विचार केला नाही. तेच चुकले माझे, मी सगळ्यांच्या आनंदात आनंद मानत असलो तरीही मलाही माझ्या इच्छा, भावना, स्वतःचा आनंद आहेच की.
पण कोणी त्याचा कशी विचारच नाही केला रादर तुमच्या आनंदात आनंद मानता मानता माझी किंमत शून्य झाली आहे हेच विसरून गेलो होतो मी. आपला नवरा आजारी आहे पण त्याच्या तब्येतीपेक्षा तुला सिनेमा जास्त महत्त्वाचा आहे, तुझा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करता करता आपलीच किंमत शून्य होऊन जाते तसेच माझेही झाले आहे. पण आता नाही, आता मी माझ्या सुखाचा, आनंदाचा विचार करणार आणि त्यासाठीच प्रयत्न करणार.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


लेख आवडला