तुम्ही एखाद्या व्यक्तीमुळे स्ट्रेसमध्ये गेलात हे कसं ओळखाल?
हर्षदा पिंपळे
स्ट्रेस..
“अरे , मला खूप स्ट्रेस आलाय, कळत नाही नक्की काय झालं? ”
“का ईतका स्ट्रेस घेतेस ? स्ट्रेस घेऊन काय होणार आहे ?
त्यापेक्षा चांगल्या गोष्टींवर फोकस कर.”
ही अशी वाक्य प्रत्येकानाचीच अनुभवली असणार यात शंका नाही.
तर मित्रांनो,हा स्ट्रेस शब्द काही आपल्यासाठी आता नवीन राहिलेला नाही.हल्ली या ताणतणावाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी स्ट्रेस हा येतोच.त्यामागे असंख्य कारणं असतात.तर कधी कधी आपणच आपला स्ट्रेस हा वाढवत असतो.कधी कौटुंबिक गोष्टींमुळे स्ट्रेस येतो तर कधी काही आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक कारणं या स्ट्रेसला जबाबदार असतात.
तर अनेकदा आपण स्ट्रेसमध्ये आहोत याची कल्पनाही आपल्याला नसते.आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात आणि जातात.त्यापैकी काहीजणांमुळे आयुष्यात सुखाचा वर्षाव होतो.पण काही अशाही व्यक्ती आयुष्यात येतात ज्या वरवर चांगलं वागून आपल्याच ताणतणावाचं कारण ठरतात.
अशा व्यक्ती ज्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतात.कुठेतरी आपली भावनिक, आर्थिक फसवणूक करतात. आपल्याशी गैरव्यवहार करतात. आपल्याविषयी इतरत्र गैरसमज पसरवतात.आपल्या विरोधात जाऊन आपल्याला त्रासदायक ठरतील अशा अनेक गोष्टी करतात. पण शेवटी या सगळ्याचा आपल्याला प्रचंड त्रास होत असतो.
आपण मात्र अनेकदा “काही नाही झालं.” म्हणून दुर्लक्ष करतो.परंतु खरं तर अशावेळेस आपण आपल्याला ओळखायला हवं.आपणच आपली अवस्था जाणून घ्यायला हवी. एखाद्या व्यक्तीमुळे आपण स्ट्रेसमध्ये गेलोय हे आपण ओळखायला हवं.आणि वेळीच स्वतःला त्यातून बाहेर काढायला हवं. तर आपण स्ट्रेसमध्ये गेलोय हे कसं ओळखायचं ते आपण पाहूयात.—–
◆एखाद्या व्यक्तीबद्दल प्रचंड तर तिरस्कार वाटणे –
एखाद्या व्यक्तीबद्दल तिरस्कार वाटायला लागतो.
तिची कोणतीच गोष्ट आपल्याला पटत नाही.
आपल्याला आवडत नाही.आपलं त्या
व्यक्तीविषयी असलेलं मतं पूर्णतः बदललेलं असतं.
आपल्या मनात तिरस्कार सोडून दुसरं काहीही
उरत नाही.सतत तिरस्कार आणि तिरस्कारच
आपल्या मनात उरलेला असतो.
◆एखाद्या व्यक्तीबद्दल प्रचंड राग येणे –
एखाद्या व्यक्तीचा प्रचंड प्रमाणात राग राग करणे.मुळातच राग आलेला असल्याने वारंवार राग राग करावासा वाटणे.अक्षरशः त्या व्यक्तीच्या वागण्याने मनात संतापाची लाट उसळणे.त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचा राग येणे.
◆त्या व्यक्तीसाठी काहीही करायची इच्छा न होणे.
◆एखाद्या व्यक्तीचा सहवास नकोसा होणे –
माणसाला एक तर चांगल्या गोष्टी हव्याहव्याशा असतात आणि वाईट किंवा त्रासदायक गोष्टी नकोनकोशा असतात. तर असच अचानकपणे एखाद्या व्यक्तीचा सहवाससुद्धा नकोसा वाटणे.अवतीभवती असणारं त्याचं अस्तित्व नकोसं होणे.समोर दिसली की मनात सहजपणे चीड निर्माण होणे.
◆एखाद्या व्यक्तीविषयीचं बोलणं नकोसं होणे –
इतरांकडून त्या व्यक्तीविषयी काहीच ऐकायची तयारी नसणे.त्याचं नाव,त्याच्याविषयी होणारं बोलणं नकोसं होणे.
◆चांगल्या आठवणीही त्रासदायक वाटायला लागणे –
त्या व्यक्तीच्या वाईट आठवणींबरोबर चांगल्या आठवणीसुद्धा त्रासदायक वाटायला लागणे.त्या त्या क्षणांचा राग येणे,त्रास होणे.
◆त्या व्यक्तीमुळे झालेल्या नुकसानाची , त्रासाची ,चुकीच्या वागण्याची सातत्याने जाणीव होत राहणे.
◆माईंड सतत त्या व्यक्तीमुळे अस्थिर होणे.
◆मनात त्या व्यक्तीमुळे अनेक वाईट किंवा त्रासदायक विचार येणे.
—-
तर पहा, अशा अनेक गोष्टी आपल्या बाबतीत घडायला लागतात. पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही.यामुळे काय होतं तर आपला स्ट्रेस हा वाढत जातो.आपलं माईंड त्यामुळे स्टेबल राहत नाही.आणि याचाच आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच वेळीच हा स्ट्रेस ओळखायला शिका.आणि स्वतःची, स्वतःच्या मानसिकतेची काळजी घ्यायला शिका.हलकासा स्ट्रेस येणं साहजिक आहे.हलकासा स्ट्रेस हा थोडासा गरजेचा आहे.कारण हा हलकासा ताण हा अनेकदा अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देणाराच ठरतो.परंतु स्ट्रेस वाढतच असेल तर त्याची तितकीच काळजी घेणं आवश्यक आहे.
तर अशा त्रास देणाऱ्या लोकांपासूनही जरा चार हात लांबच राहण्याचा प्रयत्न करा.थोडा जरी स्ट्रेस जाणवत असेल तर तो घालवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी छोटे छोटे पॉझिटिव्ह प्रयत्न करून पहा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

