काहींना इतरांना Respect तर द्यायचा असतो,पण त्यांचा Ego त्यांना ते करू देत नाही.
मेराज बागवान
‘आदर’ आयुष्यातील खूप महत्वाची बाब.’Give Respect Take Recepect’ असे म्हटले आहे.अगदी खरे आहे .आदर म्हणजे Respect देणे,समोरच्या व्यक्तीची किंमत ठेवणे,त्याचा मान ठेवणे,त्याच्या प्रति आपुलकी आणि आपलेपणा असणे. पण अनेकदा होते काय,की,तुम्ही एखाद्याला खूप Respect देत असतात.पण तुम्हाला त्या व्यक्तीकडून ,Respect मिळतोच असे नाही.याला विविध करणे असू शकतील.ह्या लेखात आपण, असे एक कारण पाहणार आहोत,ते कारण म्हणजे Ego ,’अहंकार’.त्यामुळे मी म्हणेन की , ‘काहींना इतरांना Respect तर द्यायचा असतो,पण त्यांचा Ego त्यांना ते करू देत नाही.
असे म्हणतात, अभिमान/गर्व असावा पण अहंकार नसावा.अगदी खरे,जिथे अभिमान असतो तिथे सकारात्मकता असते आणी जिथे अहंकार असतो तिथे फक्त नकारात्मकता असते.तुमच्या आसपास अनेक माणसे असतात,तुमच्या कुटुंबात अनेक जण असतात.खास करून जवळच्या लोकांविषयीच तुम्हाला हा अनुभव येत असेल की , तुम्ही त्यांचा खूप Respect करतात,पण तरी देखील ते तुमचा आदर ठेवत नाहीत.ह्याला एक मुख्य कारण म्हणजे, त्यांचा Ego, त्यांचा हा Ego बाकी कोणत्याही गोष्टींपेक्षा श्रेष्ठ ठरतो आणि हा श्रेष्ठ ठरलेला Ego त्यांना तुमचा Respect करू देत नाहीत.
तुमच्या मित्र-परिवारात देखील असे बरेचदा घडत असते.कधी कधी मित्र आहार,मैत्रीण आहे म्हणून तुम्ही ते दुर्लक्ष करतात.पण काही लोकांची मानसिकता असते ती फक्त त्यांचा Ego जपत बसण्याची. मग ते विचार करीत नाहीत की ही व्यक्ती आपल्याला किती किंमत देत आहे.आणि हे लक्षात जरी येऊ लागले तरी पटकन त्यांचा Ego त्यांना पुन्हा सांगतो ,’की नाही तू याचा Respect नाही करायचा’.
बरेचजण तर Egoistic असतात.अशी माणसे आयुष्यात यशस्वी देखील होतात.पण मानसिक शांती आणि समाधान त्यांच्या ध्यानी-मनी नसते.तुम्ही काही व्यक्तींसाठी खूप काही करतात.प्रत्येक वेळी स्वतःपेक्षा जास्त त्यांची काळजी घेतात.पण ह्या लोकांना वाटत असते की,’केले म्हणून काय झाले,मी अडचणीत आहे,करायलाच पाहिजे’.अशी त्यांची विचारसरणी असते.त्यामुळे ते तुम्हाला नेहमी Dominate करण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यामुळे ते तुम्हाला ‘Thank you’ वगैरे म्हणण्याचा तर विषय च उद्भवत नाही.
Egoistic असणे काही बाबतीत चांगले देखील असते.म्हणजे,कोणावर अवलंबून न राहता स्वतः स्वतःचे स्थान निर्माण करता येते.पण हा अहंकार अति झाला की मग ही व्यक्ती समोरच्याची किंमत ठेवत नाही.अशा लोकांची तुम्ही कधी चूक जरी दाखवली तरी ते मान्य करीत नाहीत.उलट तुमचीच जणू चूक आहे असे सर्वत्र भासवतात. म्हणून अशा प्रकारच्या लोकांना वेळीच ओळखलेले बरे.
काही काळ लोटल्यानंतर अशी माणसे तुमच्याशी संवाद साधू इच्छितात.पण तो संवाद देखील ‘टोमणे’ मारल्यासारखा असतो.कारण चांगले बोलायला देखील त्यांचा Ego मध्ये येतो.मग अशा वेळी काय करायचे? तुम्ही अशा व्यक्तींना अजिबात बदलण्याच्या फंदात पडू नका.तुम्ही जसे जगत आहात तसे जगा. ह्यांना फार महत्व देऊ नका.कारण जितके तुम्ही त्यांना जास्त महत्व द्याल तितकी तुमची किंमत ते झटक्यात कमी करतील.
माणूस माणसाशी तेव्हाच जोडला जातो जेव्हा एकमेकांचा आदर राखला जातो.Ego माणसे तोडतो,दुसऱ्या व्यक्तीचा नेहमी अपमान करतो.’मी पणा’ यामध्ये ठासून भरलेला असतो.पण आयुष्य जगत असताना हा ‘मी पणा’ किमान काही काळ तरी बाजूला ठेवला तर आयुष्य मार्गी लागते.अनेक समस्यांवरचा उपाय सापडतो.आणि मुख्य म्हणजे नाती जपली जातात.
शेवटी काय, It’s better to be Self Respectful than Egoistic!
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
