खूपच कंटाळलेले असाल तर हे १० चित्रपट तुमच्या जगण्याचा आशावाद वाढवतील.
टीम आपलं मानसशास्त्र
बरेचवेळा आपल्याला असे होते की आपण रोजच्या त्याच त्याच कामातून खूप कंटाळतो. घरकाम असेल, ऑफिस काम असेल खूप ताण पडतो. स्ट्रेस वाढतो. कधी परीक्षेत अपयश आल्याने निराशा , तर कधी relationship, प्रेमात झालेला breakup यातून आलेली निराशा , उदासीनता, निरुत्साह , कधी काहीच करण्याची इच्छा होत नाही. कधी तरी आपल्याला कोणी तरी उत्साही करण्याची गरज असते. Motivate , प्रेरित करण्याची गरज असते.
तर कधी पूर्णपणे निराशावादी झालो असतो कारण काय तर घरगुती तेच वातावरण , ऑफिस मध्ये तेच, आर्थिक समस्या , तब्येतीच्या समस्या यातून पूर्णपणे निराशावादी झालो असतो. कंटाळलेले असतो. अशावेळी नेहमीच्या कामातून थोडा बदल आवडतो, कधी पिकनिक, बाहेर जाणे, मित्र मैत्रीणीना भेटणे , तर एव्हढे कंटाळलेले असतो. थकलेले असतो की घरात बसून मस्त आराम करावा. एखादे आवडते पुस्तक वाचावे, निराशा जाईल , उत्साह , आशावाद वाढेल , हास्य निर्माण करणारे असे काही करमणुकीचे कार्यक्रम बघावे असे वाटतात.
तर असे काही चित्रपट आहेत जे आपल्याला उत्साही बनवतात, आपल्यात आशावाद निर्माण करतात.
खूपच कंटाळलेले असाल तर हे १० चित्रपट तुमच्या जगण्याचा आशावाद वाढवतील.
भारतासारख्या ठिकाणी विचार केला तर विविध भाषा बोलल्या , लिहिल्या जातात. तसेच चित्रपट ही अनेक भाषेत निर्मिती केली जाते. तर काही हिंदी भाषेत डब केले जातात.
पण प्रत्येक चित्रपटाची काही तरी वेगळी खासियत असते.
१ आनंद
संपूर्ण चित्रपट आनंद वर आहे. आणि हाच आनंद किती आशावादी , आनंदी , उत्साही आहे अगदी शेवटपर्यंत..
बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहीये लंबी नही ”
केवढा मोठा हो जगण्याकरिता चा मूलमंत्र हा😊👌👍
आपल्या आयुष्यात कमी वेळात ही जे खुप आनंदी क्षण जगता येतात ते बघा , कायमस्वरूपी कोणतीच गोष्ट नाही , व्यक्ती , वस्तू , पैसा , काहीच नाही हो , मग कमी वेळात या सगळ्याचा आनंद घ्या आणि दुसऱ्यांच्या कायम लक्षात राहील असा द्या , कायम त्या व्यक्तीने , वस्तूने , आपल्या सोबत राहण्याचा अट्टाहास सोडा, आपल्या सोबतचे क्षण मात्र आयुष्यातले चांगले असणारे , लक्षात राहनारे ठेवा , जमवा , काही वेळेस दुःखाचे प्रसंग , नाती ही येतात , वस्तू हरवतात , पण निराश होऊ नका त्या व्यक्ती आणि वस्तू नि ठेवलेल्या चांगल्या आठवणी कायम ताज्या ठेवा , कमी वेळात खुप गोष्टी करा उसके लिये जिंदगी लंबी नही होनी चाहीये😊
आनंद : मौत के डरसे अगर जिना छोड दिया तो मौत किस कहते है ? पता है जब तक जिंदा हूं तब तक मरा नही और जब मर गया तब तो मै ही नहीं , जिंदा हूं तो डर किस बात का? जिंदगी कम है इसलीये जलदी जलदी जिना पडता है ।
यात ही बघा हूं पुढे काय होईल म्हणून आपण आताच क्षण ही जगत नाही वाया घालवतो , कोणत्या गोष्टी ची भीती आणि कशाला , व्यवसाय , घर , कर्ज , वस्तू याची तरी धाकधूक कशाला? उद्याच्या चिंतेत आज का वाया ?सगळ्यात महत्वाचे जिवंत आहे ना तर तेवढी धमक आहे काही पण करू शकेन. हा आशावाद कंटाळलेल्या आपल्या ही जीवनात आपल्याला आशावादी बनवतो.
या चित्रपटातील खूप छोटे छोटे किस्से ही उत्साही बनवतात. गाणी ही प्रसन्न करून जीवनाकडे आशावादी दृष्टीकोनाने बघण्याची संधी देतात.
खूप लहान असताना बघितलेला हा सिनेमा आजही तेव्हढाच भावून जातो , कितीही निराश , उदास असलो तर केवळ आनंद सिनेममधल्या राजेश खन्ना यांनी साक्षात जिवंत केलेला हा आनंद आपल्याला जगण्याची नवी उमेद देऊन जातो ,
जगात आपले कोणी नाही , आपला मित्र नाही तरी रस्त्यावरून चालणारा, जाणारा असेल तर त्याच्या पर्यंत आपले vibes पोहचवून त्याच्याशी आपण बोलून मोकळे होणारा , आणि असेच खरेच एकदा समोरून ही ,मुरालीलाल कडून कुतुब मिनार वर भेटलेल्या आठवणी , मैत्रीचे vibes मिळूनही जातात.
अनेक प्रसंग असे आहेत की जे जीवनात आशावादी बनवितात.
२. ३ idiots :
३ idiots मधील कॉलेज जीवन असेल किंवा त्यानंतर चे जीवन..करियर असेल कधीच निराश होवू नका. प्रयत्न करा. केवळ नशिबावर भरोसा न ठेवता, स्वतः वर ठेवा.
यातले कायम लक्षात राहणारे वाक्य ” काबील बनो कामियाबी तूम्हारे पिछे झक मार के आयेगी “!
खरेच आहे . शिक्षण , कधी आवडीचे तर कधी घरातले सांगतील ते , ते पूर्ण झाले की नोकरी , करियर मागे धावताना आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे ती गोष्ट केली तर आपण आनंदी राहतो. आपले passion आणि प्रोफेशन जर एक असेल तर आपल्याला काम करताना अधिक उत्साह येतो .
फरहान ला इंजिनिअर होवून त्यातच नोकरी मिळवावी आणि मोठे व्हावे हे त्याच्या वडिलांचे स्वप्न असते. ज्यात फरहान ला खरेच आवड नसते. इच्छा नसते. त्यामुळे कसाबसा पास झालेला फरहान नोकरी , करियर विषयी ही निराश च असतो. कंटाळलेला असतो. जेव्हा रॅन्चो त्याच्या फोटोग्राफीच्या आवडिविषयी आठवण करून देतो त्याला त्याचे आवडते passion हे प्रोफेशन म्हणून निवडण्यासाठी, त्या क्षेत्रात आलेली संधी निवडण्यासाठी प्रेरित करतो. तेव्हा अगदी कंटाळलेला, निराशा आलेला फरहान त्याच्या क्षेत्रात अतिशय उत्साहाने कामाला लागतो. खूप आशावादी होतो.
या चित्रपटातले ही काही प्रसंग , गाणी उत्साही बनवितात.
३ मुन्नाभाई M.B.B.S. आणि लगे रहो मुन्नाभाई :-
एक जादू ची झप्पी सगळ्या दुखांवर , एकटेपणा वर ,चिडचिड , राग यावर जालीम उपाय .. निराशेतून , त्याच त्याच कामाचा कंटाळा आलेला असताना, आणि स्वच्छता कर्मचारी मकसुद भाई यांना लोक महत्व देत नसतात.त्यांच्या कामाची दखल ही घेतली जात नसते. पण ते त्यांचे काम नेटाने करत असतात. त्याच्या कामाची कदर नसताना होणारी चिडचिड , परत परत करावे लागणारे तेच तेच काम . यातून कंटाळलेले , चिडचिड करणारे मक्सुद भाई यांना मुन्नाभाई प्रेमाने जादू की झप्पी देतो तेव्हा त्यांची निराशा , चिडचिड कुठल्या कुठे पळून जाते. आणि ते अजून जास्त उत्साहाने कामाला लागतात.
तर लगे राहो मुन्नाभाई मध्ये जे समस्या ग्रस्त आहेत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी radio वरून तत्पर उपाय देणारा हा मुन्नाभाई सगळ्यांच्या मध्ये आशावाद निर्माण करतो.
४. छीछोरे : –
कॉलेज मधल्या मुलांच्या लाईफ मध्ये त्यांच्या parents ची जी अपेक्षा असते ती पूर्ण करता येत नाही म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या मुलाला आपल्या कॉलेज जीवनातील घटना , आपली स्पर्धा, त्या स्पर्धेत असणारी चुरस, त्यातून हसत हसत स्वीकारलेली आपली हार, आणि हा मोठा आशावाद की कोणी तरी पहिले येणार याचा अर्थ आपण कुठे कमी आहोत असे नाही.
यातून मुलाला जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन दाखवणारे आई वडील आणि त्यांचे सगळे जवळचे मित्र.
५. हेराफेरी:
सामान्य लोकांची कहाणी म्हणले तरी चालेल, गावाकडून नोकरी करिता आलेल्यांची सत्य अवस्था , नोकरीची खटपट , राहण्याचे प्रॉब्लेम्स, जागा शोधणे यातून ही परेश रावल घरमालक खूप साधे साधे जोक्स करून एकदम टेन्शन मधून रिलॅक्स करतो.
६. The Persuit of happiness :-
घरातून बाहेर पडलेल्या वडील आणि मुलाचे रोजचे struggle, मुलाला सांभाळून , जे मिळेल ते काम करताना होणारा तोटा , राहण्याचे , जेवणाचे होणारे प्रॉब्लेम्स ,मिळेल ते खायचे, वेळ प्रसंगी जिथे मिळेल तिथे राहून गुजराण करायची. आणि struggle करून एक दिवस यशस्वी होण्यासाठी रोज आशावादी राहणारे पिता पुत्र.
७. अशी ही बनवाबनवी:
सर्वांना एकदम हसवत आणि खिळवून ठेवणारा. मराठी सिनेमा असला तरी मित्र , भाऊ , अशा चौघांची शहरात येवून नोकरी आणि राहण्यासाठी ची धडपड , त्यात पैसे नसताना येणाऱ्या अडचणी, निराशा यावर मात करून हसत खेळत , काही तरी मार्ग काढत , जागा मिळविण्यासाठी जोडीदार म्हणून आपल्याच मित्राला स्त्री वेशात , बायको म्हणून ओळख करून देवून राहण्याची जागा मिळवून ती टिकविण्यासाठी रोजची धडपड. प्रयत्न. पण कुठेही निराश न होता येईल त्या अडचणी हसत खेळत सोडविण्याची जिद्द आणि तयारी.
आयुष्य जगण्यास खूप मोठा आशावाद निर्माण करते.
८. नाचे मयुरी:
सुधा चंद्रन यांच्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.साऊथ च्या प्रसिद्ध भरत नाट्य डान्सर आणि प्रसिद्ध नटी .
रोड accident मध्ये त्यांचे पाय दुखावले गेले. कृत्रिम पाय बसवून परत जिद्दीने त्यांनी नृत्य केले. त्यावर आधारित हा सत्य चित्रपट . एवढ्या मोठ्या अपघातात एका डान्सर ने तिचे पाय गमावणे म्हणजे अतिशय दुःखद घटना. किती निराशा आली असेल. कृत्रिम पाय बसवून परत त्याच जिद्दीने नृत्य करणे हा केवढा मोठा आशावाद. .
९. उरी :
आपण सतत आपल्याला किती कष्ट , किती त्रास आहेत याचेच पाढे वाचत असतो. रोजच्या त्याच त्याच रूटीन अगदी स्थैर्य असलेल्या रूटीन ला ही कंटाळतो.
मात्र देशसेवा करणाऱ्या सैनिकांना कंटाळा हा शब्द नसतो. दिवस , रात्र कधी ही त्यांना जोखीम पत्करून मिशन पूर्ण करावे लागते. त्यात जिवंत राहू याचा काही भरोसा ही नसतो. पण तरी देशासाठी जीवाची ही पर्वा न करता कायम तत्पर आणि उत्साहाने कार्यरत असणारे हे जवान. कायम आशावादी असतात. प्रयत्नांची शर्थ लढतात.
१०. खुबसुरत :
नवीन खुबसुरत. डॉक्टर मिली चक्रवर्ती , phisotherapist , आपल्या पेशंट ला बरे करण्यासाठी कसे कसे त्याच्या मनाची तयारी करावी लागते. आपल्या तब्येत आणि झालेला न विसरता येणारा कटू प्रसंग याने. खचलेल्या आणि नाउमेद झालेल्या राजासा यांना त्या प्रसंगातून , धक्क्यातून बाहेर काढून बरे करणारी ही डॉक्टर. प्रचंड सहनशीलता आणि आशावाद याचे उदाहरण.
असे अनेक चित्रपट आहेत. मराठी मधला आशिकी, कल हो ना हो, शिवाजी महाराजांच्या वरचे चित्रपट, जे आपल्याला आपण कंटाळले असू, निराश झाले असू किंवा त्याच त्याच रूटीन मधून वैतागलेले असू तर कधी हास्य , मनोरंजन , तर कधी नव्याने प्रेरणा देवून आपल्याला जीवनाप्रती आशावादी बनवत असतात.
म्हणून खरेच कधी खूप कंटाळा येतो, निराशा येते तेव्हा नक्की काही हलके फुलके कार्यक्रम बघा. कधी असे आशावादी चित्रपट बघा ज्यातून तुम्ही परत उत्साही व्हाल.
शुभेच्छा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


लेख खूपच छान आहे