Skip to content

आनंदी वैवाहिक जीवन असूनही पुन्हा जुन्या प्रेमात शिरावेसे का वाटते.

आनंदी वैवाहिक जीवन असूनही पुन्हा जुन्या प्रेमात शिरावेसे का वाटते.


मेराज बागवान


आजकाल ‘प्रेमसंबंध’ असणे काही नवीन गोष्ट नाही.पण प्रत्येकवेळी ते प्रेम सफल होतेच असे नाही.अनेकदा कोणत्यातरी कारणास्तव ‘ब्रेकअप’ होते आणि नाते कायमचे संपते.मग एकमेकांशी लग्न करण्याचा तर विषय च उद्भवत नाही.पण हे इथेच संपत नाही.काही काळानंतर विवाह दुसऱ्या व्यक्तीबरोबर होतो.सगळे स्थिरस्थावर देखील होते.वैवाहिक जीवन आनंदी देखील असते.पण एक प्रकारची वेगळी मानसिकता उद्भवू शकते.ती म्हणजे ,विवाह झाल्यानंतर देखील पुन्हा जुन्या प्रेमात शिरावेसे वाटणे.

वैवाहिक जीवनात काही समस्या असतील,भांडणे,कलह,वादविवाद असतील तर असे घडणे साहजिक आहे. पण सर्व काही नीटनेटके असूनही पुन्हा जुन्या प्रेमात का बरे शिरावेसे वाटते.याबद्दल थोडा अभ्यास करून काही गोष्टी लक्षात आल्या.आणि त्यावरून काही मुद्दे तुमच्यासोबत मांडत आहे.

१) जीवनात स्थैर येणे – लग्न झाल्यानंतर एक प्रकारचे आयुष्य ‘सेट’ होते.म्हणजे आई-वडिलांची मुलांची जबाबदारी संपते.आणि मुले-मुली त्यांचे त्यांचे आयुष्य बसवतात.वैवाहिक जीवनात स्थिरस्थावर होतात.नोकरी-व्यवसाय सुरळीत सुरू असतो.मुलांचे संगोपन सुरू असते.आणि म्हणूनच मग एक प्रकारे माणूस ‘रिलॅक्स’ झालेला असतो.आणि मग हा निवांतपणाच पुन्हा जुन्या प्रेमाची आठवण करून देतो.

२) मानसिक समाधान शोधणे – लग्न झाल्यानंतर थोडा काळ लोटला की स्वतःकडे पुन्हा लक्ष जाते.माझे मन मला काय सांगते आहे, माझ्या मनात काय चालले आहे याची जाणीव हळूहळू व्हायला लागते आणि मन आणि प्रेम याचा तर खूप जवळचा संबंध. ह्या मनाला जुनेच प्रेम हवेहवेसे वाटते.कारण जुन्या प्रेमाजवळ जितके ‘मोकळेपणाने’ व्यक्त होता येते तितके दुसऱ्या कोणाजवळ च होता येत नाही.मग ती ‘बायको किंवा नवरा’ का असेना.आणि हे मानसिक समाधान शोधण्यासाठी मन जुने प्रेम पुन्हा नव्याने शोधू लागते.

३) भावनिक गुंतागुंत – प्रेम ही एक भावना आहे.माणूस भावनांनी बनलेला आहे.विवाहपूर्वी कोणाशीतरी प्रेम जुळलेले असते.पण ते सफल होत नाही,विवाहपर्यंत ते पोहचू शकत नाही.मग लग्न झाले तरी भावना संपलेल्या नसतात. मग कधी तरी ह्या भावना उचंबळून येतात.आणि माणूस ते प्रेम शोधू लागतो.

४) भूतकाळ आठवणे – माणूस अनेकदा वर्तमानापेक्षा भूत-भविष्य इथेच रेंगाळत असतो.मग भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी तरी ह्याला कशा अपवाद ठरतील.विवाह झाला,आयुष्य थोडे सेट झाले की पुन्हा मग मन भूतकाळात ओढ घेते.मग जुने प्रेम आठवत राहते,ती व्यक्ती आठवत राहते.

५) कम्फर्टेबल फील करणे- म्हणतात ना पहिले प्रेम विसरता येत नाही.त्या प्रेमाची तुलना कशाशीच करता येत नाही.मग ते प्रेम असफल झालेले असले तरी देखील.ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलेले असते,तिच्याशी माणूस कायम ‘कम्फर्टेबल’ फील करीत असतो.,आणि तो कम्फर्ट पुन्हा मिळविण्यासाठी व्यक्ती जुने प्रेम शोधू लागते,त्या प्रेमात शिरावेसे वाटते.

६) चुकांची जाणीव होणे – प्रेम आणि लग्न दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.ज्या व्यक्तीवर प्रेम केलेले असते तिच्याशीच लग्न होईल असे नाही आणि ज्या व्यक्तीशी लग्न केलेले आहे तिच्यावर प्रेम असेलच असे नाही.अनेकदा लग्न झाल्यानंतर बांधिलकी कायम असते पण प्रेम असतेच असे नाही.पण हे लग्नाचे नाते निभावताना स्वतःच्या अनेक चुका लक्षात येऊ लागतात,ज्या जुन्या प्रेमाबरोबर केलेल्या असतात.नकळत त्या व्यक्तीला दुखावलेले असते.आणि ह्या सर्व चुकांची जाणीव झाली की मग पुन्हा जुने प्रेम आठवते.

७) प्रेम पूर्ण करण्याचा हट्ट – काही कारणास्तव जुने प्रेम पूर्ण होत नाही.पण ते प्रेम पूर्ण करायचेच असा एक प्रकारचा हट्ट माणूस कधी कधी करतो.मग विवाह झाला म्हणून काय झाले.

८) व्यक्त होण्यासाठी – प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी पहिले प्रेम महत्वाचे असते.त्यामुळे स्वतःच्या स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीला सांगावी असे वाटत असते.त्यामुळे मग स्वतःचे आनंदी वैवाहिक जीवन असूनही मन जुन्याच प्रेमाकडे ओढ घेत राहते.स्वतःचे वैवाहिक जीवन देखील कसे सुरू आहे हे सांगण्याची ओढ लागलेली असते.कारण आपलेपणा ,विश्वास असूनही टिकून राहिलेला असतो.

अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे माणूस आनंदि वैवाहिक जीवन असूनही पुन्हा जुन्या प्रेमात शिरू पाहत असतो.व्यक्तीनुसार ही कारणे बदलू शकतील.काही जण फक्त जुन्या प्रेमाबद्दल विचार करीत असतात,पण प्रत्यक्षरित्या त्या व्यक्तीशी संबंध ठेवत नाहीत.पण त्यांच्या मनात कायम ती व्यक्ती असते.

काहींच्या बाबतीत थोडे वेगळे असते.त्या व्यक्ती विवाह झाल्यानंतर देखील जुन्या प्रेमाशी संबंध ठेवतात.कधी ते फक्त मैत्रीचे असतात तर कधी जुन्या प्रेमाचे.आपण आजकाल विवाहबाह्य संबंध खूप ऐकत आहोतच.

जुने प्रेम हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय.पण मानसशास्त्र सांगते की , अशी देखील मानसिकता होऊ शकते की माणूस अनेकदा विवाह जीवनात आनंदी असूनही जुने प्रेम आठवत असतो आणि त्यात पुन्हा शिरू पाहत असतो.यावरून एक गोष्ट सांगावीशी वाटते.’प्रेम संपत नाही तर निरनिराळ्या मार्गांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या बहरत असते’.मग हे प्रेम बहरतात प्रत्येक वेळी दोन व्यक्ती जवळ असतीलच असे नाही.अंतर असूनही प्रेमाचा सुगंध मात्र कायम दरवळत असतो आणि दोन मने कायम बांधून ठेवत असतो.

प्रेम हे….


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!