Skip to content

एक चांगली बहीण शंभर मित्रांपेक्षा का चांगली असते वाचा.

एक चांगली बहीण शंभर मित्रांपेक्षा का चांगली असते वाचा.


मेराज बागवान


भाऊ-बहिणीचे नाते खूप पवित्र मानले जाते.’एक हजारो में मेरी बेहना है’ हे गाणे तुम्हाला माहित असेल.अगदी असेच असते.आई नंतर सर्वात जास्त तुम्हाला जाणणारी ,समजून घेणारी,न सांगता डोळ्यातील भाव ओळखणारी,अगदी मनातले ही न काही बोलता ओळखणारी ,आयुष्यभर काळजी आणि पाठिंबा देणारी बहीण च असते.आणि तिची ही महती शंभर मित्रांपेक्षा अधिक आहे.म्हणूनच म्हटले आहे की , एक चांगली बहीण शंभर मित्रांपेक्षा चांगली असते.

तुम्हाला मित्र अनेक असतील.ते खूप चांगले देखील असतील,तुमची नेहमी मदत करीत असतील.पण एक चांगली बहीण असेल तर ,ती ह्या शंभर मित्रांपेक्षा देखील श्रेष्ठ असते. चांगली असते.का बरे असे असेल? अनेकांना तर आपल्या बहिणीची किंमत देखील नसते.आजकाल तर भावा-बहिणीचे नाते खूप ‘व्यावहारिक’ झाले आहे.दोघे भाऊ-बहीण असून देखील शत्रू पेक्षा जास्त वाईट पद्धतीने एकमेकांशी वागताना दिसतात.कलह- भांडणे,नंतर मग अबोला हे अनेक घरात दिसते.पण सगळीकडे च ही परिस्थिती आहे असेही नाही.काही ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे.

‘आशा’ एक उच्च विद्याविभूषित मुलगी.शिक्षण घेऊन चांगल्या सरकारी नोकरीत उच्च पदावर रुजू झालेली. तिला एक भाऊ होता, ‘मनोज’.आई-वडील गेल्यानंतर आशा,मनोज एवढेच त्यांचे कुटुंब राहिले होते.मनोज देखील चांगला शिकलेला होता.पण नोकरीत आणि व्यवसायात देखील त्याला यश मिळत नव्हते.आशा मनोज ची मोठी बहीण.लहान भावाची जबाबदारी म्हणून तिने लग्न देखील केले नाही.आणि फक्त स्वतःच्या भावासाठी जगत राहिली.

मनोज एके दिवशी खूप उदास होऊन बसला होता.आशा त्याच्याजवळ आली आणि म्हणाली,’का रे मनु ,असा बसला आहेस एवढा का निराश आहेस.”

“काही नाही,ताई,नेहमीचेच.एक व्यवसाय सुरू करायचा होता. पण तिथे देखील मला अपयश आले.”

“नेमके काय झाले आहे मनोज”?

“तुला कसे सांगू.. मला समजतच नाही.पण सांगतो.ताई, तू मला व्यवसाय करण्यासाठी दोन लाख रुपये दिले होते.पण मला माझ्या मित्राने फसविले.आणि तो पैसे घेऊन कुठे तरी पळून गेला आहे.काहीच संपर्क होत नाहीये.मला समजत नाही मी काय करू? तुझा सामना कसा करू हेच समजत नव्हते.सॉरी ताई” आणि मनोज मोठमोठ्याने रडू लागला.

“अरे मनू बाळा रडू नकोस.मला समजते आहे तू हे काही मुद्दाम केलेले नाही.तुझी फसवणूक झाली आहे. घाबरु नकोस. आपण ह्यातून नक्की मार्ग काढू.”

यानंतर दोघांनी मिळून त्या मित्राची पोलीस तक्रार केली.पोलिसांनी त्याला शोधून देखील काढले आणि पैसे देखील परत मिळाले.आशा,मनोज खूप खुश झाले.

मनोज एकांतात असताना विचार करू लागला.’अरे मी ताईला किती गृहीत धरत होतो.सारखे तिला काहीही बोलायचो.पण ती बिचारी मला कधीच काहीच बोलली नाही.ती मला वारंवार सांगत असे की वाईट मित्र सोडून दे.त्यामुळे तुझाच त्रास कमी होईल.पण मी तिचे ऐकले नाही.आणि समस्येत अडकलो.मी नेहमी ताई पेक्षा मित्रांवरच जास्त विश्वास ठेवायचो.त्यांना आपलं मानायचो.आणि ताईकडे दुर्लक्ष करायचो.पण जेव्हा मी अडचणीत होतो तेव्हा ताई शिवाय कोणीच माझी मदत केली नाही.खरंच ताई तू खूप ग्रेट आहेस. माझ्यासाठी तू स्वतः देखील अजूनही लग्न केले नाही.नेहमी माझाच विचार करीत राहिली.माझ्यासाठी जगत राहिली.तुला तुझे असे स्वतःचे आयुष्यच राहिले नाही.पण मी आता माझी चूक सुधारणार आणि तुला एक आनंदी जीवन देणार.

पुढे मनोज स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहिला.पण तरी देखील आशा सनाधानी नव्हती.तिने त्याचे लग्न चांगल्या मुलीशी लावून दिले .त्याचा संसार फुलवीला.आणि त्यानंतरच स्वतः लग्न केले आणि आपले स्वतःचे आयुष्य सुरू केले.अशा प्रकारे ती नेहमी मनोज ला पाठिंबा देत राहिली,तिचा आधार बनून राहिली.

तर अशी असते एक चांगली बहीण.प्रत्येक भावाच्या आयुष्यात एक ‘आशा’ बनून येते.कायम खरीखुरी साथ देते.भाऊ कसाही वागला तरी देखील त्याची साथ सोडत नाही.आई नंतर मुलाची खरी काळजी घेणारी ही बहीण च असते.निस्सीम,निस्वार्थी प्रेम करणारी एक चांगली बहिणीच असते.

आशा सारखी बहीण ज्यांच्या आयुष्यात असेल तो भाऊ खरेच भाग्यशाली होय.अशा बहिणीला नेहमी आयुष्यात जपा. तिचा मान राखा. तिचा आदर करा.तिला कधी दुखावू नका.काहीही झाले तिला तिला आयुष्यभर जपा.कारण एक चांगली बहीण शंभर मित्रांपेक्षा चांगली असते. तिच्या इतके चांगल्या रित्या तुम्हाला कदाचित कोणताच मित्र समजून घेऊ शकणार नाही.त्यामुळे तिचे नेहमी आभारी राहा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!