Skip to content

परिघाबाहेरच्या व्यक्तीसोबत Intimate होण्याआधी हे १० प्रश्न स्वतःला नक्की विचारा.

परिघाबाहेरच्या व्यक्तीसोबत Intimate होण्याआधी हे १० प्रश्न स्वतःला नक्की विचारा.


टीम आपलं मानसशास्त्र


इंटीमेट याचा अर्थ माहिती आहे सगळ्यांना. तरीही परत सांगते की इंटीमेट म्हणजे जवळचा , अतिशय जवळचा , जिव्हाळ्याचा. जिवलग, व्यक्तिगत .

अगदी स्वच्छ म्हणावे की ज्याच्या सोबत आपण सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने करू शकतो , असा. / अशी. जीवश्च कंठश्च.

What is the real meaning of intimate ?

having, or being likely to cause, a very close friendship or personal or sexual relationship.

आता जेव्हा आपण आपला इंटीमेट म्हणता तेव्हा साहजिक च आहे तो आपला आहे. त्याच्याशी आपलेपणा आहे. अर्थात इंटीमेट म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचीच जवळची मैत्री असे म्हणणे साफ चूक आहे. अगदी जिवलग मैत्री ही दोन मित्र, दोन मैत्रिणी आणि एक मित्र एक मैत्रीण यात ही होते. पण बहुदा एकापेक्षा जास्त इंटीमेट हे कधी होत नाहीत. कारण आपण प्रत्येकाला तेवढेच आपल्या जवळचे समजत नाही. आणि आपल्या सोबत असणारा / असणारी ती कदाचित आपली इंटीमेट असू शकते / शकतो किंवा तूच्याब/ त्याच्या दृष्टीने ते स्थान दुसऱ्या कोणाचे असू शकते. कारण तेवढ्या मोकळेपणे त्यांना तुमच्याशी बोलता येत नसेल जेवढे इतर कोणाशी बोलावे वाटत असते.

काही वेळेस हे इंटीमेट कसे होतात. तर रोजच्या सहवासातून , शाळेत एकत्र असताना , कॉलेज मध्ये एकत्र असताना , ऑफिस मध्ये. किंवा जवळच्या ओळखी मधले.

पण जेव्हा या परिघा बाहेरच्या व्यक्तीसोबत इंटीमेट ..जवळचे संबंध, मैत्री किंवा त्याहून पुढे जाण्याची वेळ येते . तेव्हा ही बरेचवेळा आपण काहीच माहिती करून न घेता. काही गोष्टींचं ज्या आकर्षित करतात त्याकडे लक्ष देवून अनेक इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आणि जेव्हा कधी असे होते की तुम्हाला त्या इंटीमेट विषयी काही विचारले तरी ही माहिती नसते.

ज्यांनी व. पु. काळे यांचे इंटीमेट वाचले असेल ते खूप चांगल्या प्रकारे माझ्या लिखाणाचा उद्देश समजतील. किंवा ते नक्की समजू शकतील की कोणीही असो , जवळचा , दूरचा असो , परिघा बाहेरची व्यक्ती सोबत Intimate होण्याआधी नक्की कशी आहे. तिच्यात विषयी माहिती. किंवा काही प्रश्न येणे गरजेचे आहे.

मग अशा कोणत्या गोष्टींचे विचार करायला पाहिजे आहेत. आणि हे १० प्रश्न स्वतःला नक्की विचारा.

१. खरेच ती आपल्या परिघा बाहेरची व्यक्ती आपली इंटीमेट होवू शकते का ? त्या व्यक्तीची तेवढी पात्रता आहे का ? ती विश्वासार्ह आहे का ?

कारण त्या व्यक्तीच्या भरोषावर आपण पुढची अनेक पाऊले उचलणार असतो. त्या व्यक्तीने कुठे अधांतरी सोडले तर.

याखेरीज खरेच शेवटपर्यंत ती व्यक्ती आपली सोबत , साथ देवू शकते का ? याचे स्पष्ट बोलणे झाले का ?

२.. आपल्याला या परिघा बाहेरच्या व्यक्ती विषयी खरेच किती माहिती आहे ?

मग उत्तर मिळेल माहिती की त्याचे नाव , काय करतो , कुठे राहतो . जी व्यक्ती आपली इंटीमेट म्हणून आपण स्वीकारतो. किंवा त्या दृष्टीने पाऊल उचलतो तेव्हा

३.केवळ एवढी तुटक किंवा संक्षिप्त माहिती पुरेशी आहे का ?

कारण जी माहिती आहे ती खूप च संक्षिप्त आहे त्यावरून जरी त्याचे व्यक्तिमत्त्व ठरवायचे झाले तरी ते अपुरे आहे. किंवा त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा तरी अवघड आहे.

४. त्याची किती वैयक्तिक माहिती आपल्याला आहे का ?

केवळ नाव , पत्ता , काय करतो हे माहिती असणे म्हणजे अगदी बेसिक माहिती झाली.

अगदी वेळप्रसंगी आपल्या सोबत ती व्यक्ती असताना काही झाले, अगदी इतर कोणी येवून काही केले , आजारी पडली , कशाची allergy आली , किंवा काही गंभीर समस्या निर्माण झाली, अपघात , अचानक शारीरिक त्रास, व्याधी काही उपटली तर अशावेळी त्या व्यक्तीविषयी ची खरेच सगळी माहिती असते का आपल्याला ? त्याचा / तिचा blood group , कोणत्या औषधांची ॲलर्जी , आधी काही त्रास होते का , लहानपणाची history , या विषयी आपण विचारले का ? माहिती घेतली का ?किंवा त्या व्यक्तीने आपणहून काही सांगितले का ?

या गोष्टी महत्वाच्या असतात. कारण आपण ज्यांना इंटीमेट म्हणतो त्यांच्या या वैयक्तीक गोष्टी आपणास माहिती आहेत का ? हे जाणून घेणे गरजेचे असतें .

५. त्या व्यक्ती चा स्वभाव कसा आहे ? रागीट , समंजस , काळजी घेणारा , जपणारा , का खूप व्यवहारी ?

त्याच्या / तिच्या स्वभावाचे बारकावे माहिती आहेत का ?

बरेचदा कसे असते की स्वभाव ही जुळत नाहीत. याचे कारण भिन्न व्यक्तिमत्त्व , विचार भिन्न, सभोवतालचे वातावरण , परिस्थिती भिन्न, संस्कार भिन्न असतात. घरतले रीती रीवाज भिन्न असतात.

त्यामुळे आपले स्वभाव जुळतात का ? हा खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे.

जर जुळत नसतील तर प्रत्येक वेळी कोणी ना कोणी तडजोड करत राहिले पाहिजे असे होत जाते. आणि इंटीमेट न राहता एक अंतर येत जाते.

६. एकमेकांच्या आवडी निवडी जुळतात का ?

तसे म्हणले तर एकमेकांच्या आवडी निवडी जुळत नसतील तरी जमते की.अनेक जोड्या असतात की असे विचार मनात येतात.

पण जेव्हा आवडी निवडी मध्ये खूप फरक असतो तेव्हा जुळवून घेणे ही कठीण असते.

उदा. त्याला nonveg , drinks खूप आवडते आणि तीने nonveg , drinks कधीच खाल्ले नाही. घेतले नाहीत. कधी प्रयत्न ही केला नाही. आणि घरात ही कोणीच खाणारे नव्हते. कोणी पिणारे नव्हते.

अशावेळी खाण्यापिण्याच्या आवडी आणि गरजे नुसार खूप कटकटी , वाद होण्याच्या शक्यता. किंवा तिला त्याने खाण्याची जबरदस्ती करण्याचा ही त्रास होवू शकतो.

आजच वाचले एक नवरा कायम पार्टी , बाहेर जेवण , दारू पिवून येत असे. बायकोला कधी बाहेर घेवून जात नसे. तू मला योग्य नाहीस. तू दारू पण पित नाहीस.

रोज हेच ऐकून बायकोने दारू पिणे सुरू केले ते एव्हढे वाढले की तिचा जीव गेला त्यामुळे.

याचमुळे एकमेकांच्या आवडी निवडी जुळतात का ? हे खूप महत्त्वाचे असते.

७. परिघाबाहेरच्या व्यक्तीसोबत Intimate होण्याआधी नक्की हा विचार करा की त्या व्यक्ती मध्ये नक्की असे काय आहे की आपण आकर्षित होत आहोत? अशी कोणती खासियत आहे जी इतरांच्या पेक्षा वेगळी आहे. ? या शिवाय असे आपल्याला आणि त्या व्यक्तीला एकत्र आणणारे कोणते घटक आहेत. ? की जे काही झाले तरी कायम आपल्याला जोडून ठेवण्यास मदत करेल.

असे strong आणि weak पॉइंट्स कोणते ? माहिती आहेत का ? माहिती करून घेतले का ?

८. ज्या व्यक्तीसोबत इंटीमेट होणार आहोत त्याने / तिने तिच्या जवळच्या नातेवाईक यांची ओळख करून दिली का ? घरी घेवून गेले का ? त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिले का ?

याशिवाय जवळचे मित्र मैत्रिणी यांच्या ओळखी करून दिल्या आहेत का ?

९. ज्या व्यक्ती सोबत इंटीमेट होणार आहोत त्या आधी त्याच्या / तिच्या आयुष्यात दुसरे कोणी इंटीमेट होते का ? आहे का ? याची माहिती करून घेतली का ? हे महत्वाचे कारण ही गोष्ट आपल्या जवळकी नंतर समजली तर basically स्त्रियांच्या मध्ये खूप पझेसिव वृत्ती निर्माण होते. आणि त्यांना असुरक्षित वाटू शकते. भीती ही वाटते की आपल्या आधी कोणी होते ती परत जवळची होईल का ? आणि ती जरी नाही आली परत तर तिला सोडून आपल्याशी जवळीक केली म्हणजे आपल्याला सोडून अजून दुसऱ्या कोणाशी ही तो जवळीक करू शकतो.

ही भीती , असुरक्षितता निर्माण होवू नये किंवा एकमेकात अविश्वास वाटू नये म्हणून हे महत्वाचे असते की दोघांच्या ही आयुष्यात कोणी आहे का ? होते का ?

१०. सगळ्यात महत्वाचे शिक्षण , नोकरी , आर्थिक परिस्थिती ही व्यवस्थित आहे का ? ती जरी व्यवस्थित नसेल तरी मग पैशवरून वाद होतात. खर्च कोणी करायचे. त्यातून ही असुरक्षितता निर्माण होते.

कोणताही व्यक्ती आपल्या जवळच्या होण्याआधी अनेक गोष्टी एकमेकांना विचारा , स्वतः ला अनेक प्रश्न विचारा , शंका असतील त्या clear करा.

परिघाबाहेरच्या व्यक्तीसोबत Intimate होण्याआधी हे अनेक प्रश्न स्वतःला नक्की विचारा.ती व्यक्ती आपल्यापासून काही लपविते का? आपल्याला कधी टाळते का ? नको असलेले विषय काढले तर निघून जाते का ? का संयम बाळगते ? तिला आपल्या विषयी प्रेम , आपुलकी , काळजी , ओढ आणि मित्रत्व भावना आहेत का ? असे अनेक प्रश्न स्वतः ला विचारुन बघा. पटकन एखाद्यावर विश्वास ठेवला किंवा त्याला जवळचे केले तर कायम साथ देणार अशा काही घटना आहेत का? किंवा तो/ ती साथ देईल का ?

एकमेकांचे विचार , राहणीमान , स्वभाव , जमतात का , जुळतात का ?

असे अनेक प्रश्न आणि त्यांची समाधानकारक उत्तरे ही मिळणे गरजेचे असते. तुम्ही इंटीमेट होण्याआधी किंवा

परिघाबाहेरच्या व्यक्तीसोबत Intimate होण्याआधी हे आणि अजून जे कोणते विचार येतात.प्रश्न पडतात ते स्वतः चे स्वतः विचारून त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. समाधानकारक असेल तर नक्की पुढे जा. अडचणी वाटत असतील तर आधीच समोरच्याशी बोलून सगळ्या गोष्टी clear करा.

आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्या जवळची , समजून घेणारी , काळजी घेणारी , आपुलकी असणारी , ओढ लावणारी , आपल्यावर प्रेम करणारी आपली अशी व्यक्ती असणे खरेच खूप भाग्याचे. आपला इंटीमेट जरूर निवडावा.

All the best.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!