Skip to content

ही ७ कारणे आहेत, एखादी सिंगल व्यक्ती सुद्धा एकट्याने आयुष्यभर आनंदी राहू शकते.

ही ७ कारणे आहेत, एखादी सिंगल व्यक्ती सुद्धा एकट्याने आयुष्यभर आनंदी राहू शकते.


मेराज बागवान


‘सिंगल’ आयुष्य,म्हणजे अविवाहित राहणे किंवा कोणत्या ‘रिलेशनशिप’ मध्ये देखील न राहणे.आजकाल अशा लोकांचे प्रमाण समाजात वाढत चाललेले दिसते आहे.विवाह तर आपल्याकडची संस्कृती. पण आजकाल मुले-मुली लग्न करण्यास तयार नाहीत.त्याची कारणे देखील व्यक्तिपरत्वे निरनिराळी आहेत.’विवाह’ ही वैयक्तिक बाब असली तरी ,त्याला एक प्रकारचे सामाजिक स्वरूप आहे.पण आजकाल मुले-मुली लग्न न करता आयुष्यभर एकटे राहणे पसंत करीत आहेत.

त्यांचा हा निर्णय अनेकांना रुचत नाही.कुटुंबीय तर वारंवार लग्नाचा आग्रह च करीत असताना दिसतात.पण हा विषय थोडा वेळ बाजूला ठेवला तर आपल्या लक्षात येईल की सिंगल राहणे म्हणजे काही फार मोठे दुःख नाही.काही अशी कारणे आहेत ज्यामुळे , एखादी सिंगल व्यक्ती सुद्धा एकट्याने आयुष्यभर आनंदी राहू शकते.चला तर ही कारणे च आपण ह्या लेखात पाहूयात.

१) करिअर ला प्राधान्य – एखादी व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य तिच्या करिअर ला वाहून घेते.मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय.ह्यालाच ती व्यक्ती तिचे आयुष्य बनविते.तिचा प्रथम प्राधान्यक्रम तिचे करिअर असते.आणि त्यासाठी ती व्यक्ती कायम झटत असते.आणि अशा प्रकारे ती आयुष्यभर करिअर मध्ये स्वतःचे मन गुंतवते आणि आनंद देखील त्यातच पाहत राहते.मग ती सिंगल आहे याने काहीच फरक पडत नाही.

२) एकटेपणा एन्जॉय करणे – काही काही व्यक्तींना एकटे राहायला आवडते.म्हणजे समाजापासून ते दूर जात नाहीत.पण त्यांना त्यांचे आयुष्य स्वतःच्या हिमतीवर जगायला आवडते.अगदी कुठे दूर फिरायला जायचे असेल तरी अनेकदा ते ‘सोलो ट्रॅव्हलिंग’ निवडतात.आणि ह्या अशा जगण्यातच त्यांना खूप आनंद वाटत असतो.ह्या व्यक्ती स्वार्थी असतात असे नाही.पण त्यांना त्यांच्या मार्गात इतर कोणी नको असते. त्यांना आयुष्याचा प्रवास त्यांच्या तत्वावर जगायचा असतो.आणि हे असे जगणे त्यांना कायम आनंद देऊन जाते.

३) समाजासाठी स्वतःला वाहून घेणे – काही व्यक्ती अविवाहित राहतात.पण दुसरीकडे ते स्वतःला इतरांसाठी वाहून घेतात.जसे की ,आध्यात्मिक क्षेत्र असेल किंवा एखादे सामाजिक कार्य,उपक्रम. ह्या सारख्या गोष्टींमुळे त्यांना एक प्रकारचे आत्मिक सुख मिळत असते.हेच त्यांचे जीवन बनते.

४) स्वतः साठी जगणे/ छंद जोपासणे – काही व्यक्ती कोणत्यातरी कारणाने एकट्या राहतात.पण दुसरीकडे त्यांचे एकटेपण घालविण्यासाठी त्यांचे छंद त्यांच्यासोबत असतात.कोणाला कोणती कला जोपासायला आवडते तर कोणी काहीतरी सतत नवीन शिकण्याचा ध्यास घेत असते.स्वतःला हवे तिथे जाणे, फिरणे, भटकंती करणे अशा गोष्टींमधून त्या व्यक्तीला मनमुराद आनंद मिळत असतो.

५) अपेक्षा विरहित जगणे – ज्या काही सिंगल व्यक्ती असतात,त्या हळूहळू कोणकडूनच काहीच अपेक्षा ठेवत नाहीत.त्यांनी कोणासाठी तरी काही केले तरी ते त्या बदल्यात कोणतीच अपेक्षा कधीच ठेवत नाहीत.कर्म करणे आणि सोडून देणे इतकेच त्यांच्या लक्षात असते.म्हणजे ते एखाद्या गोष्टीत,माणसात फार अडकत नाहीत.आणि ह्यामुळे ते सिंगल असूनही आनंदी,शांतीमय जीवन जगू शकतात.

६) व्यावहारिक दृष्टिकोन – काही सिंगल व्यक्ती भावनांपेक्षा व्यवहार पाहतात.,ह्यामुळे ते कोणत्याच भावनेत गुंतत नाहीत.मग ती कोणतीही भावना असो.ते नेहमी वर्तमान पाहतात.कोणाची तशी जबाबदारी नसल्यामुळे भविष्य आणि भूतकाळ ह्यामध्ये ते अडकून पडत नाहीत.आणि ह्यामुळे ते एक ‘बॅलन्स लाईफ’ जगत असतात.आणि ह्यामुळे ती आनंदी देखिल राहतात.

७) वास्तवात जगणे – काही सिंगल व्यक्ती कोणीतरी माझ्यावर प्रेम करेल,कोणी मला आपलंसं म्हणेल ह्या विचारात कधीच राहत नाहीत.ते नेहमी वास्तव परिस्थिती स्वीकारतात.आज काय आहे,मी आज काय करणार आहे हेच ते नेहमी पाहतात.सत्य परिस्थिती पासून ते दूर पळत नाहीत.आणि ही गोष्ट आनंद देणारी,समाधान देणारी असते.

अशी काही कारणे असू शकतात सिंगल आयुष्य देखील आनंदी होण्यामागे. सिंगल राहणे किंवा रिलेशनशिप मध्ये राहणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.पण जी माणसे सिंगल आहेत किंवा सिंगल राहणे ज्यांनी निवडले आहे ते कायम दुःखी असतात किंवा नाराज,नौराश्यात असतात असे मुळीच नसते.जो तो आपले आयुष्य जगत असतो. आणि का नाही जगले पाहिजे ?

‘सिंगल आयुष्य’ जगणे कधी निवडलेले नसते तर कधी स्वतःहून निवडलेले असते.पण म्हणून आनंदी राहणे सोडायचे नसते.कारण आयुष्य कोणासाठीच थांबत नाही आणि कोणाचं कोणावाचून काही अडत नाही.म्हणून ‘मी सिंगल आहे आणि म्हणून मी दुःखी आहे’ असं म्हणण्यात काहीच अर्थ नसतो.किंबहुना आपण देखील अशा व्यक्तीविषयी नकारात्मक विचार कधीच करू नये .जसे की ,’बिचारी एकटी,कस आयुष्य काढणार..’,’एकटा आहे हा कसे घर सांभाळणार’ वगैरे वगैरे…

प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे असते.कोणीच कोणाच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करू नये.आपण अनेकदा कल्पना देखील करू शकत नाही इतका न दिसणारा संघर्ष दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात चालकेला असतो.त्यामुळे कोणाला ‘लेबल’ लावण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करूयात.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!