Skip to content

तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षिले आहात हे कसे ओळखाल? आणि हा प्रॉब्लेम कसा सोडवाल?

तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षिले आहात हे कसे ओळखाल? आणि हा प्रॉब्लेम कसा सोडवाल?


टीम आपलं मानसशास्त्र


आयुष्यात जसजसे अनुभव येवू लागतात त्यातून आपल्या concept clear होवू लागतात. सुरुवातीला कोणतेच अनुभव नसतात तेव्हा सगळे चांगले आहे असे वाटत असते.

आपण लहान असताना आई वडील सांगतात एखादी वस्तू गरम आहे. हा आहे त्याला हात लावू नको. बावू होईल. पण आई वडिलांचे लक्ष नाही असे बघून कुतूहल म्हणून हात लावला जातो. किंवा एखादी गोष्ट करू नको म्हणले तर त्याचे कारण काय ? करू नको म्हणले की त्याचं गोष्टीचे आकर्षणं वाटते. आणि जेव्हा हात लावल्यावर गरम गरम भाजते तेव्हा समजते की आपले आई बाबा बरोबर सांगत होते. पण ते नको करू म्हणाल्यावर आपण तिकडे अजून जास्त आकर्षित होत गेलो. अनुभव आल्यावर आपण चुकीचे आहोत हे समजले.

तसेच आहे आपल्या ही आयुष्यात वेगवेगळे अनुभव येत गेले की काय बरोबर , काय चूक हे समजते.

कधी व्यक्ती , स्वभाव , बाह्य आकर्षण , बाह्य व्यक्तिमत्त्व , आवाज , वस्तू, एखाद् मशीन , एखादी जागा यांचा अनुभव काहीच नसतो . पण त्याकडे आकर्षित होत असतात.

शैलजा लग्न होवून दोन मुले ही झाली. नवरा सुहास उत्साही , रसिक होता. चांगल्या पदावर नोकरी होती. त्याचा एक जवळचा मित्र करण कायम घरी येत असे. मुलांच्या सोबत , शैलजा सोबत भरपूर मोकळेपणे बोलत असे. सुहास , मुले घरी नसतील तरी काही कारणाने तो घरी येतच असे. मग शैलजा आणि त्याचे बोलणे वाढू लागले. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढू लागली.

आणि त्यांनी पायरी सोडली. कधी घरीच भेटत तर कधी काही कामानिमित्त ती ही बाहेरगावी , माहेरी , मैत्रिणीकडे अशी कारणे काढून ते दोन चार दिवस जमतील तसे बाहेर जात होते. दोघेही खूप आनंदात होते. शारीरिक जवळीक आणि एकमेकांची काळजी जे घेत होते ती हवीहवीशी वाटत होती. कदाचित प्रेम गवसले होते. आवडी निवडी जपत होते.

करण ही विवाहित होता. दोन मुले होती. त्याचा संसार ही चांगला चालला होता. त्याचा व्यवसाय होता. कधी फायदा कधी तोटा होत होता. शैलजा पैसे बाळगून होती. करण नवरा भरपूर कमवत होता. पैसे देत होता. पैशाची गरज असेल की तिच्याकडे बिनधास्त तिच्याकडे पैसे मागत होता. ती ही त्याला देत होती . त्याचे खर्च भागवत होती. असे करत हळूहळू त्याने तिचे सोन्याचे दागिने ही काढून घेतले. तिला ते समजले ही नाही.

प्रेम , शारीरिक संबंध यातून पुढे जात होते. तो तिला नेहमी सांगत होता. बायको पासून समाधान , सुख नाही. तू आणि मी लग्न करूया. एकत्र राहूया. हळूहळू शैलजा त्याच्याकडे खूप जास्त आकर्षित होत गेली.त्याच्या सोबत जायचे ठरविले. बऱ्यापैकी दागिने, पैसे ती सोबत घेवून गेली. ते सगळे सुरक्षित राहावे म्हणून त्याच्याकडे दिले. त्यांनी लग्न केले. खोटी कागदपत्रे तयार केली. तो तिला मुंबईला घेवून गेला. शैलजा ला आपल्या family मध्ये ठेवले आणि त्याची बायको मुले मात्र स्वतंत्र मोठ्या फ्लॅट मध्ये राहत होती. तो तिकडे ही जात असे. घरी ही येत असे. पण लग्न करून शैलजा खूप अडकून पडली. घरच्या सगळ्यांचे स्वैपाक , जेवणे यातच अडकली. करण इकडे येईल तेव्हा भेट नाही तर भेट ही नाही. वाट बघत बसायची. इकडे सासरचे तसे खूप मागास. कास्ट वेगळी. तिच्या राहणीमानात कुठेच काही बसत नव्हते.

करण घटस्फोट घेणार नाही हे तिच्या जावेने सांगितले तिला. त्याच्या बायको सोबत तो मस्त आनंदात आहे. हे अनेकवेळा दाखवून दिले. तेव्हा लक्षात येवू लागले शैलजा ला. तिने मग करण कडे तिचे दागिने मागितले. तेव्हा तो म्हणाला बिझनेस करिता ते मी गहाण ठेवले आहेत. लवकरच सोडवून देईन. पण बरेच दिवस झाले ते काही परत करणे नाव ही नाही.

हळूहळू शैलजा ला करणं मधला फरक जाणवू लागला. तो बिझी आहे असे सांगून भेटायला ही येत नसे. शैलजा ला तिच्या मुलीची आठवण येत असे. ती घरी फोन करत असे तिच्या मुलीशी बोलत असे. तिचा नवरा खूप चिडला होता. की असे घर , मुले सोडून अचानक कोणता विचार न करता गेली.

करण चे वागणे बदलत च गेले. शैलजा खूप एकटी पडू लागली. घरकाम करण्यासाठी आणल्या सारखे झाले. त्यात तिचे दागिने करण ने त्याच्या बायकोला घातले तो फोटो जावे ने दाखविल्यावर शैलजा करण सोबत भांडली. वाद घातले. माझे दागिने पाहिजे म्हणल्यावर देत नाही म्हणाला तो.

अशावेळी तिला जाणवू लागले की ती एका चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षित झाली आहे. आणि चुकीचे निर्णय घेतले. आणि तिला खूप पश्चाताप होवू लागला की तिने चांगला संसार , मुले , घर , नवरा सोडून खूप चुकीचा निर्णय घेतला तो ही केवळ काही क्षणिक मोहा करिता.

घरी फोन करून सतत बोलू लागली. मुलीला मोकळेपणे इकडचे problems सांगितले तेव्हा सुहास ने च मोठ्या धडाडीने निर्णय घेवून तो त्याच्या घरच्यांच्या समवेत शैलजा ला घ्यायला गेला. तिला मोठ्या मनाने माफ करून तो घरी घेवून आला. आता दोघांचा संसार अजून जास्त आनंदात सुरू आहे. एकमेक काळजी घेतात. वेळ देतात. भरपूर फिरायला जातात. आवडी निवडी सांभाळतात. भूतकाळात जे होवून गेले त्याचा उल्लेख ही नाही. आठवण ही नाही .

आपण ही आयुष्यात कधी तरी कोणाकडे तरी आकर्षित होत असतो .

तुम्ही एका चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षिले गेले आहात हे कसे ओळखाल? आणि हा प्रॉब्लेम कसा सोडवाल?

१. जी व्यक्ती काही काळापुरती तुमच्या सोबत गोड गोड बोलण्याचा दिखावा करत असेल. आणि काम झाले की लगेच तुम्हाला तोडत जरी नसेल तरी दुरावा. अंतर ठेवत असेल . टाळत असेल.

२. ओळख वाढवून जवळीक साधण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जरी प्राधान्य देत असेल तरी एकदा जवळीक साधली की ती व्यक्ती तुम्हाला प्राधान्य देणे कमी करते.

३. बरेचवेळा ते आकर्षण संपले की तुम्ही कुठे महत्वाचे नाही, वाद , भांडणे होत असतील.

४. सुरुवातीला जवळीक साधताना जपण्यात येणाऱ्या आवडी निवडी , बाहेर घेवून जाणे , फिरायला जाणे , एकमेकाला वेळ देणे हे कमी होवू लागते. आपण काही चुकले का विचारले की उलट आपल्यावर च आवाज चढवून बोलणार. वाद घालणार.

५. हळूहळू तुझी गरज नाही असे attitude. माझे विश्व वेगळे. त्यांच्या समवेत आनंद मिळतो. तुझ्या समवेत त्रास असे वर बोलणे.

६. तर काही ठिकाणी जरी समजले की आपले निर्णय चुकले, चुकीच्या व्यक्तीकडे आपण आकर्षत झालो. त्या व्यक्तीला जरी आपण काही चिडून बोललो, रागावलो तरी ही ती शांत असते. लक्ष देत नाही. आणि तुम्हाला तोडत ही नाही. याउलट तुमच्या सोबत पूर्वी सारखे व्यवहार ठेवून असते.

म्हणजे कित्येक वेळा असे वाटते की आपण च चुकीचे आहोत.

आणि त्यांनी जरी आपल्याकडून काही पैसे घेतले असतील ते आपण माघारी मागितले तरी देणार नाही , बुडले असेही कुठे नाही बोलणार ..तर अजून गोड बोलून हो तेच द्यायचे आहेत त्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. लवकरच देतो असे गोड बोलून अजून गुंतवून ठेवणाऱ्या ही व्यक्ती असतात.

जे स्पष्ट बोलणारे , साफ मनाचे असतात .ते त्याक्षणी सगळे बोलून रिकामे होतात. त्यांच्या मनात काही ठेवत नाहीत. किंवा नात्यावर काय परिणाम होतील याचे विचार करत नाहीत. कारण त्यांना दिखावा जमत नसतो.

तुम्ही एका चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षिले गेले आहात हे ओळखले की हा प्रॉब्लेम कसा सोडवाल?

१. तुम्ही सत्य काय आहे याची परत परत चाचपणी करूंन मग च कठोर निर्णय घेणे गरजेचे असते.

२. बरेचवेळा काही तरी कोणाकडून समजते तर कधी कोणी मुद्दाम आपल्या मनात काही विचार भरवतात. अशावेळी ज्याच्याकडे आकर्षित झालो , ज्याच्या जवळ गेलो त्याच्याशी संवाद साधा. स्पष्ट विचारा. जेव्हा त्याच्याकडून काही तरी उडवा उडवी ची उत्तरे दिली जातात. तर काही तसे नसेल तर समजूत घातली जाते. समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो.

३. समोरची व्यक्ती नक्की कशी आहे हे आपल्या स्वतः ला ठरवावे लागते. तेही त्या व्यक्ती सोबत येणाऱ्या विविध अनुभवातून. आणि तरीही बरेचवेळा आपण चुकीचे ही असू शकतो.

त्यामुळे कोण कसा आहे. स्वभाव कसा आहे. या बारकाव्यांचा अभ्यास आपण करून त्यातून मार्ग शोधून प्रोब्लेम सोडवायचे असतात.

४. बरेचवेळा तुमचे प्रोब्लेम हे तुमचे असतात आणि ते सोडविण्याची जबाबदारी ही तुमची असते. त्यासाठी विविध प्रयत्न करणे. Trial error करणे गरजेचे असते.

आयुष्य सुंदर आहे.बरेचवेळा व्यक्ती वाईट नसते. चुकीची नसते. पण परिस्थिती , वेळ , वातावरण , अनुभव चुकीचे असतात.

एखाद्या वाईट अनुभवावरून, एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या वाईट वर्तनावर सगळ्याच व्यक्ती किंवा ती व्यक्ती पूर्णपणे चुकीची आहे असे होत नाही. त्यावेळची परिस्थिती, वेळ हीच कारणीभूत असते. म्हणून आधी वर्तनाचा जरूर विचार करा. कोण कधी कसे वर्तन करते. का ? हे विचार करत गेलात. किंवा अनुभवत गेलात तर सगळे प्रोब्लेम चुटकी सारखे सुटतात.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

6 thoughts on “तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षिले आहात हे कसे ओळखाल? आणि हा प्रॉब्लेम कसा सोडवाल?”

  1. जे आहे त्यात समाधान मानत राहिले तर प्रश्नच येणार नाही.
    प्रत्येक वेळेस समोरच्याचीच चूक असेल असे नाही.
    आपण काय वागतोय याची देखील जाणीव जरूर असावी.
    मीच बरोबर आहे हा हटवादिपणा नसेल तरच पुढील गोष्टी नीट होऊ शकतात.

  2. बरोबर सांगितले आहे पुर्ण शहानिशा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका.🖒

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!