Skip to content

ही ५ सीक्रेट्स कधीही आपल्या पार्टनर पासून लपवू नका.

ही ५ सीक्रेट्स कधीही आपल्या पार्टनर पासून लपवू नका.


हर्षदा पिंपळे


आपण आपल्या बऱ्याच गोष्टी कित्येकांपासून लपवत असतो.अगदी छोट्या छोट्या गोष्टी लपवण्याचीही अनेकांना सवय असते.मग आपण कोणत्याही वयात असलो तरीही गोष्टी लपवणं काही थांबवत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळेच छोट्या छोट्या गोष्टी लपवत असतात. त्यालाच कधी कधी आपण सिक्रेट्स असं म्हणतो.

“मी चार चॉकलेट्स खाल्ले, आईला सांगू नको हं ?”,”मी शाळा बुडवली,लेक्चर बंक मारलं.””ते आपल्यातील सिक्रेट्स आहेत. सांगू नको हं कुणाला ?”

ही अशी वाक्य तर प्रत्येकाच्या कानावर नक्कीच पडली असतील यात शंकाच नाही. तर या अशा गोष्टी लपवल्याने फारसा फरक पडत नाही.

परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या हाइड केल्याने अनेकदा फरक पडतो.तर ते नक्की काय….? ते आपण जाणून घेऊयात.

तर मित्रांनो, असचं आपण आपल्या जोडीदारापासूनही बऱ्याच गोष्टी लपवत असतो.आपले बरेचसे सिक्रेट्स लपवत असतो.

तर हे असे सिक्रेट्स लपवणं कितपत योग्य आहे ?

सिक्रेट्स हे शेअर करायला हवेत का ? की सिक्रेट्स हे सिक्रेट्सच असतात…? ते एका ठराविक लोकांसोबतच शेअर केले जातात का ? तर असे बरेचसे प्रश्न अनुत्तरित राहतात.

नात्यात पारदर्शकता असावी असं म्हणतात. कधीच कोणतीच गोष्ट लपवू नये असही म्हंटलं जातं.पण कधीतरी अशी वेळ येतेच की काही गोष्टी हाईड कराव्याशा वाटतात.आणि आपण अनेकदा त्या गोष्टी हाईडसुद्धा करतो.कुणाला कळणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेतो.

पण मित्रांनो काही गोष्टी आपल्या जोडीदारापासून कधीही लपवण्याचा प्रयत्न करू नका.असे काही सिक्रेट्स वेळीच जोडीदाराला विश्वासात घेऊन सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करा.कारण सिक्रेट्स हे कधीतरी रिवील होत असतात. ते दीर्घकाळ लपून राहू शकत नाही.

◆भूतकाळ – आता नाही म्हंटलं तरी कित्येकांना पास्ट हा असतो.तो पास्ट सहसा सगळेच सहजपणे विसरत नाही. काही जणं लग्नानंतरही तो भूतकाळ विसरत नाही. त्यांना तो भूतकाळ विसरणं अवघड वाटतं.तर असचं काही भूतकाळ असेल, किंवा भूतकाळाविषयी कोणत्याही गोष्टी असतील तर त्या वेळीच जोडीदाराला सांगण्याचा प्रयत्न करा. एक्स बद्दल असणाऱ्या सगळ्या गोष्टी स्वतःहून सांगून टाका.

◆आर्थिक व्यवहार – कोणतेही आर्थिक गैरव्यवहार केले असतील किंवा कुठलेही आर्थिक व्यवहार कुणाशीही केले असतील तर त्याविषयी जोडीदाराला कल्पना द्या.तसेच कमावते असाल तर आर्थिक व्यवहार कशाप्रकारे सांभाळता, काय कुठे आणि कशी गुंतवणूक करत आहात याविषयी जोडीदाराला कल्पना द्या.कुठल्याही आर्थिक गोष्टी लपवून ठेवू नका.

◆आरोग्याविषयी कल्पना – काही आरोग्याच्या तक्रारी असतील तर अशा गोष्टी लपवण्यात काहीच अर्थ नसतो.तर कोणत्याही प्रकारचा छोटा मोठा आजार असो तो आपल्या जोडीदाराला नक्की सांगा.कुटुंबातील कुणालाही आरोग्याशी संबंधित असणाऱ्या तक्रारी लपवू नका.

◆ कुटुंबातील कुणाला किंवा वैयक्तिक काही गोष्टी असतील,समस्या असतील तर त्याचाही खुलासा वेळीच जोडीदारासमोर करणे.

◆स्वतःच्या इच्छा /आकांक्षा /गरजा-

स्वतःच्या काही इच्छा आकांक्षा असतील तर त्या सिक्रेट्स म्हणून ठेवू नयेत.त्या लपवू नयेत.जे काही असेन ते मोकळेपणाने सांगून टाकावे.कोणत्याही गरजा असतील तर त्याही सांगणं जास्त मस्टआहे.

आता सिक्रेट्स वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. काही एक्सबद्दल असू शकतं,काही घरातील गोष्टीबद्दल असू शकतं,नोकरी , व्यवहार अशा बऱ्याच गोष्टींविषयी वेगवेगळे सिक्रेट्स असू शकतात. पण असे हे सिक्रेट्स आपल्या जोडीदारापासून लपवण्यापेक्षा मोकळेपणाने शेअर करा.त्याला विश्वासात घेऊन अशा गोष्टी बोलायला शिका.

कारण अशा गोष्टी सिक्रेट्स ठेवल्या तर त्या नंतर जोडीदाराला समजल्या तर कदाचित नात्यात वादविवाद होऊ शकतात. कटूता निर्माण होऊ शकते.कदाचित एखादा जोडीदार समजून घेईलही.परंतु सगळेच जोडीदार हे नंतर समजून घेतीलच असं नाही.

म्हणूनच जे काही सिक्रेट्स असतील ते वेळीच आपल्या जोडीदारासमोर स्पष्टपणे सांगून मोकळे व्हा.कारण नात्यातील पारदर्शकता यामुळेच टिकून राहण्यास मदत होत असते.

आपले सिक्रेट्स खरचं आपल्यापुरते ठेवायचे की विश्वासात घेऊन जोडीदाराला सांगायचे ? या गोष्टीचा विचार आवर्जून करा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!