प्रार्थना करणे ही एक अशी शक्ती आहे ज्याद्वारे अती काळजी, संशय आणि भीती दूर सारता येते.
मेराज बागवान
आपण शाळेत असताना रोज शाळा सुरू होण्यापूर्वी ‘प्रार्थना’ म्हटली जायची.त्यावेळी ती एक प्रार्थना म्हणजे जणू अभ्यासच समजली जायची.अगदी पाठ असायची ती प्रार्थना.गाण्याच्या,कवितेच्या स्वरूपात सर्वजण ती म्हणत असत.शालेय जीवनात प्रार्थना म्हणजे फक्त शाळा सुरू होण्यापूर्वी म्हटले जाणारे गीत असे आपण मानायचो.पण ही प्रार्थना इतकी साधी, सरळ अजिबात नसते.
प्रार्थना म्हणजे एक भक्ती आहे,एक आशा आहे,एक ऊर्जा आहे,एक मागणे आहे.ज्याद्वारे अति काळजी,संशय आणि भीती दूर सारता येते.आपण मनात प्रार्थना करतो, देवाकडे प्रार्थना करतो, कधी कधी कोणाकडे बोलून दाखवतो.असे विविध प्रार्थना करण्याचे प्रकार असतात. प्रार्थना ही एक मानसिक कृती आहे.हे करायला आपले मन आपल्याला सांगते.कधी कधी आपण कोणत्याच व्यक्तीकडे एखादी गोष्ट मागू शकत नाही.मग ती गोष्ट आपण प्रार्थनेतून मागत असतो.
आज आपण पाहतो,अनेकजण मानसिक विकरांमधून जात आहेत.कोणाला खूप भीती वाटते,तर कोणी अति चिंतेने ग्रासलेले आहे. कोणाला कोणावर विश्वास ठेवावा हे समजत नाही तर कोणी प्रत्येक बाबतीत संशय घेत आहे. म्हणजे आज असे आहे की ,एक माणूस दुसऱ्या माणसावर सच्चेपणाने पटकन वागत नाही.एकमेकांना समजून घेण्याऐवजी अजमावण्यातच आयुष्य चाललेले आहे.अनेक त्रास,अडचणी,समस्या प्रत्येकजण अनुभवत आहे.मग अशा वेळी प्रार्थना च कामी येते.
ही प्रार्थना कशी बरे कार्य करीत असेल आणि त्या प्रार्थनेमुळे आपल्या समस्या कशा बरे कमी होत असतील?
प्रार्थना म्हणजे मनातील आर्त साद असते. म्हणजेच आपण ती मनापासून करीत असतो.जेव्हा एखादी गोष्ट मिळत नसेल त्यावेळी अनेकजण देवाला साकडे घालतात.नियती कडे याचना करतात.पण तरी देखील काही गोष्ट लगेच मिळतात च असे नाही.मग अनेकजण नैराश्यात आयुष्य जगू लागतात.पण असे नसते.प्रार्थनेत खूप मोठी ताकद आहे.जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा एक मानसिक शांतता आणि समाधान मिळते आणि यामुळे भीती नाहीशी होते.जणू एक प्रकारची आशा जागृत होते.
एखाद्या गोष्टींमुळे तुम्ही खूप काळजीत असाल. पण अशा वेळी तुम्ही कोणत्याही प्रकारची प्रार्थना केली की मन हलके होते.गुंतागुंत सोडवली जाते.सकारात्मक ऊर्जा तुमच्यात प्रवेश करते.एक प्रकारची शक्ती ही जाणीव करून देते की तुम्ही एकटे नाही आहात,संबंध सृष्टी तुमच्या सोबत आहे.आणि ही सृष्टी तुमची नेहमी मदत करणार आहे याची अनुभूती तुम्हाला येते.आणि मग यामुळे तुमच्यातील भीती,संशयी वृत्ती कमी होते.
प्रार्थना म्हणजे काही फक्त कर्मकांड नव्हते.अगदी ‘मेडिटेशन’ च्या माध्यमातून देखील तुम्ही प्रार्थना च करीत असतात. जगात अनेक ‘तत्वज्ञ’ ,’आध्यात्मिक गुरू’ आहेत.ते देखील आपल्याला प्रार्थनेचेच महत्व सांगू पाहत आहेत.थोडक्यात,आपल्या कोणत्याही समस्येचे निराकरण आपल्याच हाती असते.आणि ते निराकरण म्हणजे प्रार्थना आहे.
एकमेकांची मदत घेणे ,मदत करणे हे माणूसपणाचे लक्षण आहे. एकमेकांना साथ तर दिलीच पाहिजे.वास्तवात तशी कृती देखील व्हायला हवी.पण याच बरोबर जर प्रार्थनेची जोड असेल तर मानसिक कणखरपणा स्वतःमध्ये येतो.आत्मविश्वास,संयम,आशा वाढीस लागते.आणि मग आयुष्यात कोणती जरी समस्या आली,कोणतेही आव्हान आले तरी माणूस डगमगत नाही.
प्रार्थना केली म्हणजे सर्व समस्या कायमच्या सुटल्या,संपल्या असे होत नाही.वास्तवात समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे देखील तितकेच गरजेचे असते.पण प्रार्थना माणसाला मानसिकरित्या बळकट बनवते.आणि जर माणूस मानसिकरित्या मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो.
प्रार्थना ‘Peace of Mind’ आयुष्यात आणण्यात फार मोठी भूमिका बाजावते.म्हणून प्रार्थनवर विश्वास ठेवा.सर्वकाही छान च असेल आयुष्यात…
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

