एक पुरुष त्याच्या कुटुंबाला या १० वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकतो.
हर्षदा पिंपळे
कुटुंब हँडल करणं तशी सोपी गोष्ट नाही. परंतु ती तितकी अवघडही नाही. कुटंब हँडल करणं म्हणजे काय तर त्यात सगळ्या गोष्टी सहजपणे येतात.कुणाचं कुटुंब छोटं असतं तर कुणाचं मोठं असतं.
एखादं कुटुंब सांभाळताना जितकी स्त्री महत्वाची असते तितकाच महत्त्वाचा असतो तो पुरुष ! कारण किचनची किंवा मुलांच्या शैक्षणिक आयुष्याची जबाबदारी ही केवळ स्त्रीच उत्तमपणे पार पाडू शकते असं नाही.
एक स्त्री जसं संपूर्ण कुटुंब हँडल करू शकते अगदी तसचं एखादा पुरूषही त्याचं कुटुंब अगदी व्यवस्थित हँडल करू शकतो.
Yes, He can !
तर हाच पुरुष कोणत्या प्रकारे त्याच्या कुटुंबाला हँडल करू शकतो ते जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
◆मानसिक ताणतणाव –
घरातील प्रत्येकाला कधी ना कधी ताणतणाव हा येत असतो.तर हाच ताणतणाव कमी करण्यासाठी पुरूष उत्तम प्रकारे प्रयत्न करू शकतात./करतात. इतरांचा ताणतणाव कसा कमी होईल याचा विचार करून योग्य प्रकारे ते सिच्युएशन हँडल करू शकतात.
◆मुलांची शैक्षणिक जबाबदारी –
घरातील मुलांची शैक्षणिक जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. शाळेत प्रवेश घेण्यापासून, शाळेतून ने – आण करणे ते अगदी परिक्षेचा रिझल्ट आणण्यापर्यंत गोष्टी ते उत्तमरीत्या सांभाळून घेऊ शकतात. इतकच नाही तर अभ्यासात लक्ष घालून मुलांना काय हवं आणि काय नको यांच चांगलं निरीक्षण करू शकतात.त्यांचं करिअर , भविष्य कशाप्रकारे उज्ज्वल होऊ शकतं याचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊ शकतात.
◆आर्थिक जबाबदारी –
आर्थिक जबाबदारी व्यवस्थित हाताळणे.शैक्षणिक, कौटुंबिक,आरोग्याचा खर्च या सगळ्या आर्थिक जबाबदाऱ्या पुरुष हँडल करू शकतात.गृहकर्ज, वेगवेगळ्या प्रकारचे विमा,तसेच इतर अनेक गोष्टी पुरूष हँडल करू शकतात.
◆काळजी घेणे –
घरातील सदस्यांची त्यांच्या आजारपणात, किंवा इतरवेळी योग्य ती काळजी घेणे.मग ती मुलं असो,आईवडील असो वा पत्नी असो.प्रत्येकाची योग्य ती काळजी पुरुष निश्चितच घेऊ शकतो.
◆चुकीचं पाऊल न उचलणे -एक जरी चुकीचं पाऊल पडलं तर ते खूप महागात पडू शकतं.त्यामुळेच आयुष्य जगत असताना शक्यतो कुठल्याही प्रकारचं चुकीचं पाऊल न उचलणे.व घरातील कुणालाही चुकीचं पाऊल उचलू न देणे.
◆जबाबदाऱ्या ओझं म्हणून न स्वीकारता काळजी,प्रेम म्हणून स्विकारणे. किंवा मग जबाबदाऱ्यांकडे ओझ्याच्या दृष्टिकोनातून न पाहता जबाबदारी म्हणूनच पाहणे.
◆वेळप्रसंगी घरातील दैनंदिन कामांची जबाबदारी घेणे.अगदी चहापासून ते जेवणापर्यंत सगळी जबाबदारी आनंदाने पार पाडणे.
◆भूतकाळात घडलेल्या वाईट घटनांमधून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील.वर्तमानात जगण्यासाठी प्रोत्साहन देणे.
◆आपल्या कुटुंबातील सदस्याला कोणत्याही प्रकारची शारीरिक आणि मानसिक प्रकारची इजा होऊ नये याची पुरेपूर काळजी घेणे.घरातील सदस्यांवर लक्ष ठेवणे.त्यांना काय हवयं काय नको ते पाहणे.
◆घराच्या आनंदाची जबाबदारी घेणे.कुटुंबातील वातावरण आनंदी कसं राहू शकतं हे एका पुरूषाला नक्कीच कळू शकतं.घरच्यांचा आनंद कशात आहे आणि कशात नाही यातून तो कुटुंबासाठी नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ शकतो.
खरं तर कुटुंब हँडल करणं घरातील प्रत्येकाला यायला हवं.कारण प्रत्येकजण हा कुटुंबाचाच एक भाग असतो.मग कुटुंब हँडल करणं म्हणजे केवळ आर्थिक गोष्टी सांभाळणं नव्हे. आर्थिक गोष्टी सोडून इतर अनेक गोष्टी असतात.
त्यांचाही विचार करणं आवश्यक असतं.केवळ नोकरीवर घर चालतं म्हणजे संपूर्ण कुटुंब हँडल करणे असा अर्थ मुळातच अयोग्य आहे. कुटुंबातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, जाणीवाही समजून उमजून घेता यायला हव्या.तरच त्याला कुटुंब हँडल करणं म्हणता येईल.
तर असो, एक जबाबदार आणि तितकाच समजुतदार असलेला पुरुष आणि स्त्रीसुद्धा संपूर्ण कुटुंब अगदी व्यवस्थित हँडल करू शकते.कुटंबासाठी जे जे शक्य आहे, चांगलं आहे ते ते करण्यासाठी स्त्री असो वा पुरुष असो…दोघेही तितकेच प्रयत्नशील असू शकतात.
अर्थात दोघांनी मिळून मिसळून सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितच ते कुटुंब अधिक चांगल्या प्रकारे हँडल होऊ शकतं.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

