ही ६ कारणे आहेत, एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल खूपच पझेसिव्ह होण्याची!
मयुरी महाजन
सर्वप्रथम पझेसिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया, जसे की एखाद्या गोष्टीवर फक्त आपलाच मालकी हक्क आहे, असे दाखवणे व ती गोष्ट कोणासोबतही वाटून घेण्यास इच्छुक नसणे,
इथे आपण व्यक्तीच्या बाबत बोलत आहोत, तर या ठिकाणी पझेसिव्ह असण्याचा अर्थ म्हणजे आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीने आपल्यापेक्षा दुसरे कोणाला अधिक महत्त्व दिलेले, त्यांना सहन होत नाही, अशी व्यक्ती त्या व्यक्तीच्या बाबतीत खूपच पझेसिव्ह आहे असे म्हटले जाते ,
मयुरी फक्त माझीच जवळची मैत्रीण आहे, तिने अन्य कोणासोबत मैत्री केलेली किंवा जवळिक साधलेली मला आवडणारच नाही, मी जर मुलगा म्हणून तिचा मित्र आहे, तर तिने अन्य कोणत्याही मुलासोबतही मैत्री केलेली मला खपणार नाही, हा झाला ओव्हर पझेसिव्हपणा…..
मानसशास्त्र विषयाच्या अभ्यासाला जेव्हा आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी मिळून प्रॅक्टिकल साठी तयारी करत होतो ,तेव्हा आमच्यातीलच एक मैत्रीण ज्यांना आम्ही ताई म्हणतो, त्यांनी ‘वैवाहिक समायोजन’ या विषयावरती असलेली चाचणी व त्याचे निष्कर्ष, जेव्हा त्यांना त्यांच्या भाषेमध्ये ते सविस्तर सांगा असे सांगण्यात आले, तेव्हा त्यांनी मांडलेली मते अगदी मनाला स्पर्शून गेलेली, या विषयाच्या निमित्ताने त्यांची मते आवर्जून मांडावी असे वाटले,
वैवाहिक समायोजन करत असताना संसार या तीन अक्षरी शब्दाला निभवण्यासाठी दोघांचाही कस लागतोच, परंतु ती फक्त माझीच आहे, तो फक्त माझाच आहे, असा अट्टाहास नको ,बऱ्याच घरांमध्ये बायकोला असं वाटते नवरा फक्त माझा आहे, त्याने माझंच ऐकावं, घरातील अन्य व्यक्तींना त्याने दिलेले महत्त्व सुद्धा बायकोला सहन होत नाही, अगं बाई तो आईच्या पोटी जन्माला आला, तेंव्हाच तर तुझा झाला ना… मग तो त्याच्या आईचाही आहेच ना… आईचा झाला तेव्हाच तर तुझा झाला,
ही होती आमच्या ताईंनी मांडलेली मते… जी समर्पक आहेत,
नवरा-बायकोच्या नात्यात एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांना जपणं, एकमेकांप्रती सुरक्षित वाटणे, गरजेच आहेच, पझेसिव्ह असणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु ओव्हर पझेसिव्ह असणं, हे आपणच आपल्या पायावर मारलेल्या कुऱ्हाडी प्रमाणे आहे, आता तुम्ही म्हणालं की ते कसं …..तर एखाद्या व्यक्ती एखाद्या बाबत खूपच पझेसिव्ह असणे, हे तुम्हाला तुमच्या नात्यात कटूता वाढवण्यासाठी कारणीभूत असते, व मी तर म्हणेल कि, ती कीड आहे ,आपल्या नात्याला लागलेली जी दिसत नाही, परंतु हळूहळू एक दिवस ती तुमच्या नात्याला संपवण्यासाठी कारणीभूत असेल, चला तर मग पाहूया की एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल खूपच पजेसिव्ह होण्यामागची ती सहा कारणे नेमकी कोणती आहेत ,
एक- पजेसिव्ह होण्यामागचे कारण शोधा -प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कारण असतेच, ती व्यक्ती पजेसिव्ह आहे असं म्हणून तिच्यावर चिडचिड व राग दाखवून काहीही साध्य होणार नाही ,ती व्यक्ती तशी का आहे, हे जाणून घेण्याचा जर प्रयत्न केला, तर आपल्याला खात्रीने त्याचे उत्तर सापडेल,ती व्यक्ती कुठल्या भावनेत अडकून तसं वागतेय,हे कळेलं.
दोन -असुरक्षितेचे भावना- लहानपणापासून आई-वडिलांच्या दबावात वाढलेली एखादी व्यक्ती मोठेपणी आपल्या स्वतःसाठी असुरक्षिततेची भावना वाढवून अशी व्यक्ती प्रत्येक वेळेला आपल्या भावना जपण्याचा प्रयत्न करत असते,
तीन- हक्काची माणसं हक्काच्या गोष्टी गमावल्याचे दुःख -काही वेळेस जवळची व हक्काची माणसं गमवावी, लागल्याचे दुःख हे मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात जपलं गेलेलं असतं ,व नाही म्हटलं तरी कुठेतरी आता जवळ असलेली आपली माणसं यांच्या प्रती चिंता वाटू लागते, व ती दुरावू नये , गमवावी लागू नये, असे वाटत असते,
चार -अन्य घटनांचा असलेला भावनिक परिणाम -आपल्या आजूबाजूला अनेक घटना रोजच घडत असतात, त्याचा बरा वाईट परिणाम हा थोड्या प्रमाणात का होईना परंतु प्रत्येकावर होत असतो, त्यापैकी काही घटनांचा झालेला भावनिक परिणाम सुद्धा व्यक्तीच्या पझेसिव्ह असण्याच्या पाठीमागचे कारण असू शकते,
पाच -प्रेमाची कमतरता व विश्वासाचा अभाव -बऱ्याच वेळेला पझेसिव्ह असणारी व्यक्ती ही स्वतःच्या आयुष्यात प्रेमाला मुकलेली असते, किंवा प्रेम शोधत असते, व जेव्हा ते मिळते ,तेव्हा ते फक्त माझंच असावं, किंवा त्यावर फक्त माझाच अधिकार असावा, असा मालकी हक्क दाखवताना दिसते, विश्वासाला जेव्हा संशयाची फुंकर लागते, तेव्हा विश्वासाचा खरा अभाव आहे, असे वाटू लागते ,
सहा -संवादाचा अभाव -जर तुमच्या नात्यात संवादाचा अभाव असेल ,एकमेकांप्रति प्रारदर्शकता नसेल, तर पजेसिव्ह असणारी व्यक्ती नको ते अंदाज लावून मोकळी होते, तुम्ही काही सांगत नसाल तर ती व्यक्ती स्वतः तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करून माहिती काढण्याचा प्रयत्न करू शकते, व त्यामुळे संशयी वृत्ती वाढीस लागते ,
आपला पार्टनर पझेशन असेल, तर त्या पाठीमागे नक्कीच कारण असतील, ती समोरच्याला लक्षात आणून देणेही गरजेचे आहे ,शेवटी आपण लग्न करून एकत्र आलो म्हणजे, आपण एकमेकांचे मालक आहोत, असा याचा अर्थ होत नाही, आपण एकमेकांचे साथीदार आहोत, आपल्या इच्छांचा दुसऱ्या व्यक्तीवर बंधने म्हणून त्याचा मारा होऊ नये इतकेच, एकमेकांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, परंतु अवास्तव अपेक्षांच्या ढीगाखाली आपला पार्टनर कोलमडून पडेल, इतकी त्या अपेक्षांची उंची असू नये,
शेवटच एकच,” बंधनात ठेवून कोणीही आपलं होत नसतं” मग ते पशु असो वा माणूस त्यासाठी त्याला स्वच्छतेपणे बागडू द्या, हिंडू द्या….
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

