Skip to content

सोडून गेलेल्या व्यक्ती हा आपला loss नाहीये, त्यांच्या चांगल्या आठवणींसोबतही छान आयुष्य जगता येते.

सोडून गेलेल्या व्यक्ती हा आपला loss नाहीये, त्यांच्या चांगल्या आठवणींसोबही छान आयुष्य जगता येते.


अपर्णा कुलकर्णी


मालती ताई आज लवकर उठून नटून थटून मंदिरात आल्या होत्या कारण मकरंद रावांना नेहमीच मालती ताई नटून थटून राहिलेल्या आवडत. मंदिरात आल्यावर नेहमीप्रमाणे त्यांनी डोळे भरून विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीकडे पाहिले आणि क्षणार्धात त्यांचेही डोळे भरून आले. विठ्ठल रखुमाईचा जोडा अगदी सुशोभित दिसून येत होता. त्यांनी पदराने डोळे पुसले आणि मंदिरापासून जवळच असलेल्या छोट्याशा वनराईत येऊन बसल्या ते ही अगदीच ठरलेल्या जागी. दोन सीटच्या त्या बाकड्यावर बसताना शेजारची रिकामी जागा पुन्हा त्यांच्या पोटात गोळा आणून गेली.

आज पहिल्यांदा त्यांच्या शेजारची जागा रिकामी होती, कारण प्रत्येक वेळी मकरंदराव त्यांच्या शेजारी बसून असतं. ते म्हणत, मालती विठ्ठला सोबत रखुमाई म्हणजे मकरंद सोबत मालती असेच मला वाटते, त्यात इथे बसताना गर्द वनराईत तुझा हात हातात असला की सगळे काही मिळाल्याची जाणीव मला होते, मी परिपूर्ण असल्यासारखे वाटते. पण आज हे सगळं बोलायला मकरंदराव शेजारीच काय तर या जगातच नव्हते.

पुन्हा मालती ताईंचे डोळे पाणावले आणि त्याना आठवले मालती ताई जेंव्हा जेंव्हा रडत तेंव्हा तेंव्हा मकरंदराव दुःखी होत होते. तुझ्या डोळ्यातील पाणी म्हणजे त्यात माझेच अपयश मला दिसून येते मालू, तुला सुख देण्यात मीच कुठेतरी कमी पडतो असे मला वाटते. त्यामुळे तू रडत जाऊ नकोस कधीच.

अगदी मी तुला सोडून कायमचा या जगातून निघून गेलो तरीही आपल्या सुखद आठवणी, एकमेकांसोबत घालवलेले आनंदी आणि उत्कट क्षण तुला आठवायला हवेत आणि त्या आठवणीने तुझ्या चेहऱ्यावर हसू असायला हवे हे लक्षात ठेव.

मकरंद रावांचे असेच भारावलेले बोलणे मालती ताईना आठवले आणि त्या मनोमन हसल्या. मालती ताईंना सुधीर हा एकुलता एक पण अतिशय आज्ञाधारक मुलगा होता. सुधीर संस्कारी असण्याचे संपूर्ण श्रेय मकरंद रावांकडे जात होते. कारण मालती ताई पहिल्या पासूनच जरा रागीट स्वभावाच्या आणि शिष्टबद्द्ध होत्या आणि याउलट मकरंदराव होते, त्यामुळेच त्यांनी सुधीरच्या कलेने घेऊन त्याचा खोडकर स्वभाव समजून घेऊन त्याला वाढवले होते. शिवाय घरात आणि मालती ताईच्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती.

गेल्या काही वर्षात मकरंद रावांची तब्येत कमी जास्त होत होती. जणू काही आपण मरणार याचा अंदाज त्यांना आला होता त्यामुळेच त्यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी सुधीर आणि मालती ताईच्या नावाने आधीच करून टाकली होती. पण मालती ताईंच्या आयुष्यात मकरंद रावांच्या अनेक गोड आठवणी होत्या ज्या प्रॉपर्टीपेक्षा कितीतरी अनमोल होत्या. मकरंद रावांना जाऊन काहीच दिवस झाल्यामुळे मालती ताईंना त्यांच्या सोबत घालवलेले अनेक क्षण सातत्याने आठवत होते आणि त्याची तीव्रताही जास्त होती.

पण हळू हळू दिवस जात गेले तशा त्या सावरल्या आणि त्यात सुधीरने ही त्यांना खूप जास्त मदत केली. मालती ताईंना कधीच एकटे सोडले नाही, जास्तीत जास्त वेळ त्यांच्याच सोबत घालवला, मालती ताईंना नेहमीच मकरंदरावांची आठवण येत होती त्यामुळे चेहरा पडून जात होता त्या त्या वेळी सुधीरने त्यांना बोलते केले, कोणतीच गोष्ट मनात राहू दिली नाही आणि या आठवणी येतात तर येऊ देत आई, त्यांचा त्रास करून घेऊ नकोस, त्या दाबून टाकू नकोस तर उलट त्याच आठवणींना जगण्याचा आधार बनव असे पटवून सांगितले.

मालती ताईंना हे पटले की, आयुष्य म्हटले की जन्म मृत्यूचा खेळ आलाच. कोणी आधी आणि नंतर हे आपल्या हातात नाही तर त्यापेक्षा वास्तव स्वीकारून स्वतःला हे समजून सांगितले, की सोडून गेलेल्या व्यक्ती हा आपला तोटा नाही, तर त्यांच्या चांगल्या आठवणीं सोबत छान आयुष्य जगता येते तर आयुष्य सुसह्य आणि सोपे होऊन जाते.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “सोडून गेलेल्या व्यक्ती हा आपला loss नाहीये, त्यांच्या चांगल्या आठवणींसोबतही छान आयुष्य जगता येते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!