वारंवार मानसिक अपमान होत असेल तर सेल्फ रिस्पेक्ट साठी या १० गोष्टी करून पहा.
मेराज बागवान
सेल्फ रिस्पेक्ट’ म्हणजेच ‘स्वाभिमान’ प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो,पण प्रत्येकजण तो जपतोच असे नाही.त्याला विविध कारणे असू शकतील.कधी नाती जपण्यासाठी,कोणाला तरी न गमावण्यासाठी,कधी कलह नकोत म्हणून तर कधी समोरच्या व्यक्तीचा मान ठेवण्यासाठी, ती व्यक्ती दुखावू नये म्हणून सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवला जातो.पण इतके करून देखील वारंवार मानसिक अपमान होत असेल तर मात्र वेळ येते ती सेल्फ रिस्पेक्ट जपण्याची.
प्रत्येक व्यक्ती एकमेव असते.मान ठेवणे,रिस्पेक्ट देणे हे माणुसकीला धरून असते.आपण समाजात राहतो. वेगवेगळी माणसे भेटत जातात.कधी घट्ट नाते तयार होते,मैत्री निर्माण होते, कधी प्रेम फुलते, तर कधी आयुष्यभरासाठी माणसे जोडली जातात.मग ह्या व्यक्तींच्या सहवासात राहत असताना अनेकदा वाद-विवाद देखील होण्याची शक्यता असते.मत भेद देखील होऊ शकतात.मग कधी होते काय,की तुम्हाला अनेकदा मानसिक अपमान समोरच्या व्यक्तीकडून मिळतो.तुम्ही नाते जपत असतात.त्या व्यक्तीच्या मनाची काळजी घेत असतात आणि म्हणूनच अनेकदा तुम्हाला अपमान सहन करावा लागतो.
पण वारंवार असे होत राहिले तर तुमची कोणतीच किंमत समोरच्या व्यक्तीसाठी राहत नाही.म्हणून काही गोष्टी करणे अपरिहार्य ठरते.ह्या गोष्टी समोरच्या व्यक्तीसाठी नसतात तर स्वतःची मानसिक काळजी घेण्यासाठी आणि स्वतःला मानसिक रित्या सदृढ बनविन्यासाठी आवश्यक असतात.
१) शांतता (Silence ) – जर तुम्हाला एखादी व्यक्ती वारंवार काही बोलत आहे,किंवा न बोलता देखील तुमचा अपमान करत आहे.तुमच्या मतांना किंमत देत नसेल तर अशा वेळी तुम्ही शांतता प्रिय होणे गरजेचे आहे.काहीही त्या व्यक्तीशी न बोलणे,किंवा फक्त आवश्यक आहे तेवढेच बोलणे हिताचे ठरते.
२) दुर्लक्ष करणे – एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप काही करीत आहात. मदत करीत आहात.तरी देखील ती व्यक्ती तुम्हाला वारंवार म्हणत आहे की ,’एवढंच,तू हे नाही केलं माझ्यासाठी’.कितीही केले तरी अपमान च पदरी पडत असेल तर त्या व्यक्तीकडे थोडे चार हात लांबच राहा.दुर्लक्ष करा.तुमचाच त्रास कमी होईल.
३) सतत उपलब्ध न होणे – तुम्ही काही लोकांसाठी नेहमी हवे तेव्हा उपलब्ध असतात.मग यातील काही जण तुम्हाला गृहीत धरू लागतात.’तू काय मोकळीक आहेस,तू available आहेस’ असे शब्द वापरायला देखील ते मागे पुढे पाहत नाहीत.तुम्हाला त्यांची काळजी असते म्हणून तुम्ही नेहमी त्यांच्यासाठी हजर राहतात. पण ती व्यक्ती याचा गैरफायदा घेते.आणि सतत तुमचा अपमान करू लागते.त्यामुळे तुम्ही सतत उपलब्ध होणे बंद करा.
४) स्वतःचे छंद जोपासा – वारंवार मानसिक अपमान सहन केल्याने मन अशांत बनते.नकारात्मक विचार येतात.नैराश्य येते.मग अशा वेळी स्वतःच्या आवडी निवडी जपा. स्वतःकडे लक्ष द्या.स्वतःला जी काही कला,छंद जोपासायचे आहेत ते जोपासा.स्वतःला वेळ द्या.म्हणजे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट टिकून राहील.तुमची किंमत कायम राहील.
५) गरजू लोकांना मदत करा – ज्यांना खरोखरच गरज आहे कोणत्यातरी गोष्टीची तर अशा वेळी अपमान करणाऱ्या व्यक्तींकडे लक्ष देण्याऐवजी,त्यांचा सतत विचार करण्याऐवजी स्वतःला इतरांसाठी थोडा काळ झोकून द्या.समाजकार्य करा.ज्यांना खरेच गरज आहे त्यांचा आधार बनण्याचा प्रयत्न करा.यामुळे तुम्हाला तुमची स्वतःची जाणीव होईल.स्वाभिमान जपला जाईल.
६) सतत स्वतः हून बोलणे टाळा – जी व्यक्ती तुमचा वारंवार मानसिक अपमान करीत आहे,त्या व्यक्तीशी स्वतःहून बोलणे शक्यतो टाळा.म्हणजे अगदी संवाद साधू नका असे नाही,पण ते म्हणतात ना ‘दुरून डोंगर साजरे’ अगदी तसेच.त्यामुळे त्यांच्याकडून संवाद सुरू होऊ द्या.यामुळे तुम्हीच स्वतःच स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट टिकऊ शकाल.
७) ध्यानधारणा (Meditation ) – जेव्हा मानसिक रित्या तुम्हाला अपमानास्पद वागणूक सतत मिळत असेल अशा वेळी योगा करा,ध्यान-धारणा करा.स्वतःशी सकारात्मक संवाद साधा.’मी कणखर,मजबूत,सकारात्मक आहे,स्वाभिमानी आहे’ असे स्वतःला म्हणा,तसा विचार करा आणि कृती देखील करा.
८) सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा- जे लोक तुमच्याशी खऱ्या आर्थने चांगले वागतात,कोणताही हेतू न ठेवता तुमच्याशी बोलतात अशा व्यक्तीच्या सहवासात राहा.जे तुम्हाला खरेच आपले समजतात,जे खरेच तुम्हाला आदर,किंमत देतात त्यांच्या समवेत वेळ घालवा. तुम्हाला तुमच्या सेल्फ रिस्पेक्ट ची जाणीव होईल.
९) चांगले वाचन करा – वाचनाने माणूस घडतो,चांगले वाचन,पुस्तके माणसाला एक नवीन दृष्टिकोन देऊन जातात.म्हणून चांगले वाचा.तुम्ही खरेच मानसिक रित्या बळकट व्हाल.
१०) फिरायला जा – तुम्ही सतत मानसिक अपमानाखाली राहून दडपणात राहतात.त्यामुळे थोडे काळ दुसऱ्या जागी जाणे हितकारक ठरते.त्यामुळे शक्य असेल तर एखादी छानशी ट्रिप नियोजित करा.’सोलो ट्रॅव्हलिंग’ चा जरूर आस्वाद घ्या.ते शक्य नसेल तर काही मित्र-मैत्रिणीसोबत फिरायला एखाद्या सुंदर, छानशा ठिकाणी जा. यामुळे तुम्हाला थोडा ‘change’मिळेल.तुमचे मन ‘Refresh’ होईल.आणि मुख्य म्हणजे तुम्हाला तुमच्या ‘सेल्फ रिस्पेक्ट’ ची अनुभूती येईल.
अशा काही गोष्टी तुम्ही जरूर ‘ट्राय’ करू शकतात.आपण दुसऱ्या व्यक्तीला बदलू नाही शकत.त्या व्यक्तीचा दृष्टिकोन आपण नाही बदलू शकत.आपण एकच गोष्ट करू शकतो.ती म्हणजे ,’स्वतःला बदलणे’.कधी कधी आयुष्यात अपमान मिळणे देखील गरजेचे असते.कारण त्या शिवाय आपण ‘बदलत नाही’.
अनेकजण तुम्हाला म्हणत देखील असतील,’अग तू त्यांच्या एवढं का पुढे पुढे करीत आहेस, स्वतःची जरा किंमत ठेव ना..’ .पण तुम्ही म्हणतात,’माझं प्रेम आहे त्यांच्यावर’.याचा अर्थ तुम्ही ह्या व्यक्तीचे ऐकत नाही आणि स्वतःची किंमत कमी करून घेतात.तुमच्या हे लक्षात येईपर्यंत समोरची व्यक्ती तुमचा सतत अपमान करून बसलेली असते.
इतरांना आपण कंट्रोल नाही करू शकत.त्यांची वागणूक आपल्या हातात नसते.म्हणून वेळीच स्वतःची किंमत टिकवून ठेवण्यासाठी,सेल्फ रिस्पेक्ट जपण्यासाठी स्वतःला बदला. आणि त्यासाठी वरील टिप्स तुम्ही वापरुन पाहू शकतात. ह्या टिप्स मात्र फक्त स्वतःसाठी वापरा, दुसऱ्या व्यक्तीचे लक्ष केंद्रित करण्यासाठी नाही. तुम्ही जरी बदललात तरी जे खरेच तुमचे आहेत ते तुमच्या आयुष्यात कायम राहतील आणि ज्यांना तुमचा बदल मान्य नाही ते आपोआप दूर होतील.त्यामुळे जास्त विचार करू नका.कारण मानसिक आरोग्य जपले गेले तरच पुढील जीवन सुकर होईल….
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Very motivated.
If that person is from your family, then these tips can’t help. It is bakvas
Mast aahe lekh👌👌
खरंच खूप छान लेख आहे
Nice article
Chan lekh aahe
मला हा लेख खुप छान वाटला आणि माझ्या उपयोगाला पडणारा आहे ,
मस्त लेख 👌
सकारात्मक विचार ✅✅👍🏻
Khup beautiful lekh aahe
खरंच खूप छान लेख आहे. यामधून खचलेल्या मनाला ऊर्जा मिळत आहे.सध्या मी अशाच प्रसंगातुन जात आहे.
खूप छान लेख
Very nice
very good
Khup chan lekha aahe
Very nice
Very motivated thanks
Very Nice n Right ✅