Skip to content

जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला गरजेची समजणार नाहीत, तेव्हा तुमची पत्नी एकट्याने आयुष्य जगेल.

जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला गरजेची समजणार नाहीत, तेव्हा तुमची पत्नी एकट्याने आयुष्य जगेल.


टीम आपलं मानसशास्त्र


पती आणि पत्नी या दोघानाही संसारात तेवढेच महत्व आहे. जसे एखाद्या कार ची , बैलगाडीची समांतर चाके. एका चाकात हवा कमी झाली किंवा पंक्चर झाले तर गाडीचा balance बिघडतो. पुढे जाताना प्रोब्लेम येतो. तसेच आहे संसाराच्या चक्रात दोघांनी ही दोघांना महत्व दिले पाहिजे.

पत्नी ही संसराकरिता न बोलता , न सांगता अविरतपणे अनेक गोष्टी करत असते. घर सांभाळणे , घरची आवराआवर , स्वच्छता, टापटीप, घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना सांभाळणे, स्वैपाक , मुलांच्या घरच्यांच्या आवडी निवडी , वेळा सांभाळणे. घरातल्यांची आजारपणे , बाहेरची कामे, ग्रोसरी असेल ,भाजीपाला असेल किंवा अगदी इस्त्री चे कपडे, दळण घेवून येणे . स्वतः नोकरी करत असेल तर त्या जबाबदाऱ्या. वेळेत निघणे , घरी आल्यावर परत घरची कामे ,स्वैपाक , जेवणे नंतरचे सगळे आवरणे , दुसरे दिवशी ची तयारी. नातेवाईक कोनाच्याकडे काही कार्यक्रम असतील तर जाणे येणे, व्यवहार , देवाणघेवाण , घरी येणारे पाहुणे त्यांचें पाहुणचार , शिवाय घरातले काही बिघडले वस्तू , मशीन तर त्याच्या दुरिस्तोमागे लागून ते मेकॅनिक किंवा इतर योग्य व्यक्तींकडून वेळीच देखभाल , दुरुस्ती करून घेणे . असंख्य कामे असतात.

याखेरीज पत्नीला घरातल्या सगळ्यांचे मूड किंवा तऱ्हा संभाळव्या लागतात.

बरेचवेळा असे होते की एव्हढे सगळे सांभाळून , सगळ्या आघाड्यांवर सातत्याने लढून ही तिचा विचार कधी केलाच जात नाही. ती ही माणूस आहे. तिला ही मदत करावी

ती काही मशीन नाही सतत कामे , कष्ट आणि अविरत सगळ्यांच्या करिता उभी राहायला.

पत्नीला ही महत्व पाहिजे असते. तिला ही घरातल्या , एकमेकांच्या विषयी , आर्थिक गोष्टी , गुंवणुक , विमा , मेडिकल गोष्टी , घरातल्या गोष्टी स्पष्ट आणि विश्वासात घेवून सांगणे गरजेचे असतें. काही महत्वाचे निर्णय घेताना तिच्या मताचा ही विचार आणि आदर केला जावा .

ती तिचे माहेरचे स्वतः चे अस्तित्व सोडून सासरी येवून तिथे सगळ्यांशी जुळवून घेण्याचा, सर्वांना सुखात ,आनंदात ठेवण्याचा , कोणाला काही कमी पडणार नाही याची काळजी घेण्याचा , सर्वांना सुखकर जीवन जगता येईल या करिता प्रयत्न करत असते.

जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला गरजेची समजणार नाहीत, तिची कदर करणार नाही. तिने केवळ कर्तव्य करत राहिली पाहिजेत. सगळ्यांच्या करिता आपुलकीने , प्रेमाने , ओढीने त्यांच्या छोट्या गोष्टी करत असते .त्याची जाणीव राहिली बाजूला .तिने केलेच पाहिजे असा attitude.

जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला सतत घालून पाडून बोलता. तिला काही आणि कशात समजतच नाही असेच वागवता. याउलट समजत नसेल तर तिला समजून सांगण्याची तुमची जबाबदारी असते. ते सोडून तुम्ही तिला समजत नाही म्हणून सतत टोमणे मारता किंवा दुर्लक्ष करता.

तुमच्या प्रत्येक वेळी बायकोने साथ दिली असते. तुमचे आयुष्यातले , नोकरी मधले चढ उतार , सुख – दुःख यात तिने बरोबरीने साथ दिली असते. कधी नोकरी गेली तर स्वतः कमावून तिने घर खर्च भागवला असतो. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलली असते.

तुम्ही नोकरी मध्ये , कामात व्यस्त असताना तुम्हाला तुमच्या स्वतः कडे लक्ष देणे शक्य नसते अशावेळी तुम्ही बाहेर जाताना व्यवस्थित , टापटीप राहावे म्हणून ती स्वतः तुमच्या करिता फॉर्मल , कधी casual करिता casual ase कपडे निवडते. तुम्हाला चार चौघात वावरता येईल असे बाह्य स्वरूप केश रचना असेल, दाढी मिशा , तुमचे बाह्य व्यक्तिमत्त्व सुधारतं असताना अंतर्गत व्यक्तिमत्त्व ही उठावदार होण्यासाठी तुमच्यातला आत्मविश्वास जागा करत असते, विविध गोष्टीत प्रोत्साहन देत असते. तुमच्या पेहराव पासून रुमाल , चप्पल , बुट सगळ्याची ती जातीने काळजी घेत असते.

ऑफिस काम , इतर गोष्टींचे ताण तणाव यातून तुम्हाला घरी कायम शांतता देण्याचा प्रयत्न करत असते. उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करत असते. विविध गोष्टी सांगून , तुम्हाला तुमच्या दिवसाविषयी बोलून , अडचणी समजून घेत असते. कधी सल्ला , मार्गदर्शन करत असते.

तर सगळ्या ताणातून मुक्त होण्यासाठी तुमचे आवडते छंद जपण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी बाहेर , पिकनिक करिता घेवून जात असतें कधी surprise म्हणुन तुमच्या मित्रांचा ग्रूप बोलावून त्यांचे खानपान आणि आदरातिथ्य करत असते.

तर तुम्हाला काम , इतर गोष्टींचे त्रास , विवंचना , कसे आर्थिक गोष्टी असतील, गृहकर्ज , नोकरीतील ताण तणाव यातून रिलॅक्स होताना अतिशय सुंदर आणि सुखकारक शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतें.

अशी अतिशय caring बायको तुम्हाला ठराविक काळानंतर जेव्हा गरजेची वाटत नाही त्याचे कारण काय तर एका ठराविक स्टेज नंतर तुम्ही स्थैर्य मिळविले असते. आर्थिक विवंचना , नोकरी , विमा , गृह कर्ज सगळे जास्तीचे burden कमी होत गेले असते. आणि ठराविक status maintain करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण झाली असते. मुले मोठी होवू लागली असतात. जबाबदाऱ्या कमी होवू लागतात. तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घेवू लागता. बायकोला त्याची साधी कल्पना ही देत नाही. तिला त्यात विचारणे सोडून च द्या. सांगणे ही सोडून देता.

तसेच तुमची कालांतराने शारीरिक गरज ही कमी होते कारण शरीर थकते , अवयव साथ देत नाहीत .

अगदी काही नाही तर सगळे स्थैर्य मिळाले की तुम्हाला बायकोचा कंटाळा येतो. कारण ती छान नीटनेटकी राहत नाही. अशावेळी ज्या तरुणी सुंदर राहतात तिकडे आकर्षण निर्माण होते. कधी मित्र सहकारी यांच्या संगतीने बाहेरची टेस्ट घेण्याची ..ती ही स्त्री बाबत इच्छा होते. मग त्याचे कधी सवयी मध्ये रुपांतर होते. अशावेळी तुम्ही तुमच्या तुमच्या पत्नीला गरजेची समजणार नाहीत.

तेव्हा तेव्हा तुमची पत्नी एकट्याने आयुष्य जगेल.याचे कारण म्हणजे..ती तुमच्यात आणि सर्व कुटुंबात एवढी involve झाली असते की प्रसंगी तिने स्वतः कडे दुर्लक्ष केले असते. स्वतः प्रचंड जबाबदाऱ्या पेलेल्या असतात. अनेक खस्ता खाल्ल्या असतात. कधी आजारी पडली तरी तात्पुरती औषधे घेवून कायम कुटुंबा करिता , तुमच्या करिता हसतमुख उभी राहिली असते. धडपड केली असतें . आर्थिकदृष्ट्या बचत करताना स्वतः चार कामे जास्त करून पै आणि पै साठविले असतात . कष्ट असोत. आजारपणे असोत जागरणे , प्रसंगी धावपळ केली असते.

आणि जेव्हा आता तिला खऱ्या आरामाची गरज असते. तिला समजून घेण्याची गरज असते. तिला सुख , समाधान देण्याची वेळ असते. तिची काळजी घेण्याची वेळ असते. अशावेळी अचानक पतीन त्याचे वागणे बदलले , बायकोची शारीरिकदृष्ट्या ही गरज नाही आणि इतर गोष्टीत गरज नाही दाखविले तर ती खरेच एकाकी पडते. आणि ती, तेव्हा तुमची पत्नी एकट्याने आयुष्य जगेल. कारण इतके वर्ष तिच्या विश्वात फक्त तुम्हीच होता. तिचे संपूर्ण विश्व पती आणि कुटुंब यात च सामावले होते. ते सोडून ती दुसरीकडे कुठेच जावू शकत नाही. भले एकत्र एका घरात राहत असाल पण ती एकटी आयुष्य जगायला सुरुवात करते. पूर्वीची ती आणि आताची ती यात रुक्षपणा , कोरडेपणा येतो. कारण हे जेव्हा जाणवते की आता पतीला आपली गरज नाही तेव्हा ती सुरुवातीला त्याच्या सोबत खूप भांडते , आपला हक्क दाखविण्याचा , गाजविण्याची प्रयत्न करते. कधी रुसते. कधी चिडते. कधी खूप रौद्र रूप धारण करते.आदळाआपट करते. भावनिक दृष्ट्या खूप दुखावली जाते. तसे बोलून , भांडून , वाद घालून ही फरक पडत नाही. तुम्हाला तिची गरज नाही हेच जेव्हा तुम्ही दाखवता तेव्हा कधी कधी अगदी जीव देण्याचा ही प्रयत्न करते.

मन आणि शरीर याने ती एवढी प्रचंड तुमच्यात गुंतली असते की शेवटी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करून , संवाद साधण्याचे प्रयत्न ही करते. प्रसंगी तुम्हाला आवडेल असे स्वतः मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करते आणि तरी ही जेव्हा तुम्ही दाखवता की तुम्हाला तिची गरज नाही तेव्हा मात्र ती मानसिक दृष्टया पूर्ण खचून जाते.

आयुष्यभर ज्या स्त्रीने तिचे सर्वस्व दिले असते. कधी स्वतः चा विचार न करता केवळ तुमच्या करिता सगळ्या गोष्टी करण्यात पूर्ण involve झाली असते. प्रसंगी बायको, आई, मैत्रीण आणि तुम्ही लहान मुल समजून ही तिने तुम्हाला सांभाळले असते. अगदी तळहाताच्या फोडपेक्षा जास्त जपले म्हणले तरी चालेल.

अशा तिच्या केवळ तुमच्या भोवतीच्या विश्वा मधून तुम्ही गरज नाही म्हणून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करता तेव्हा ती हतबल होते. ती तो आघात स्वीकारू शकत नाही.

घरात राहिली तरी एकटी राहू लागते. खूप अलिप्त होत जाते. घरातून घालवून दिले तर ती एकट्या ने आयुष्य जगायला सुरू करते. कारण तिला आता आपली नको आणि परकी कोणी ही माणसे नकोत असे होते. कोणाच्या मध्ये involve होण्याची गरज वाटत नाही.

तरुण असेल तरी दुसऱ्या पुरुषाला आपले शरीर आणि मन देण्याची तयारी नसते कारण तुमच्यात ती मनापासून involve झालेली असते. तशी शारीरिक साथ , सुख ही दिले घेतले असते. आणि अचानक तुम्हाला गरज नाही म्हणून तुम्ही अलिप्त वागलात , सोडून दिले तरी ती ते कधीच विसरू शकत नाही. याचे कारण आपली संस्कृती ,संस्कार आहेतच .शिवाय तिच्या मनाचे विचार की ती तिचे शरीर आणि मन दुसऱ्या कोणाला देवू शकत नाही कारण प्रत्येक चांगल्या वाईट आठवणी, सुख याची आठवण असते ते ती कधीच विसरू शकत नाही.

अर्थात आता थोडा काळ बदलला आहे. जिथे लिव्ह इन रीलेशनशिपमध्ये खूप पुढे गेले आहेत. घटस्फोट हा पूर्वी घेतला जात नव्हता ..त्या ऐवजी तडजोड केली जात होती. पण आता घटस्फोट ही घेतले जातात. दुसरी लग्न ही होतात. नवरा बायको सुख देत नसतील तर विवाह बाह्य संबंध ही ठेवतात. दोन लग्न करणारी ही आहेत.

पण जी स्त्री संस्कार आणि मर्यादा राखून आहे . ती जी आपल्या पती मध्ये पूर्ण involve आहे ती कधीच इतर कोणासोबत राहू शकत नाही. ते स्वीकारू शकत नाहीं तिची मानसिकता अशी होते की आता काही नको मला एकटे राहायचे आहे. मला कोणाकडून ही कसली अपेक्षा नाही. वाद ही नकोत. मी ज्या गोष्टी केल्या त्याची आठवण ही नको .जाणीव ही नको आणि आता परत त्यात involvement ही नको. सगळ्यातून अलिप्त एकटी ..शांत राहणे आणि जे आहे त्याचा स्वीकार करते ती. शेवटी नशीब म्हणून एकट्याने आयुष्य जगेल. पण कोणाच्या ही दारात गरज म्हणून ही उभी राहणार नाही. किंवा अनेक वेळा सगळे प्रयत्न करून पतीला ही तिचे महत्व पटवून देण्याचा असफल प्रयत्न केल्यावर त्याला त्याची किंमत नाही, गरज नाही याची जाणीव झाल्यावर तिला हेच भासते की ती वापरून झालेले जीर्ण पाय पुसणे कसे असते. की जे नवे असताना , वापरात असताना इतरांना ओले पाय पुसण्यासाठी, कोरडे ठेवण्यासाठी स्वतः त्रास सहन करत असतें स्वतः ओले होत असते. पण इतरांना सुखकारक अनुभव , फील देत असते. पण तिचा वापर करकरून संपला , जीर्ण झाले की दाराबाहेर टाकून दिले जाते. ज्या पायपुसण्याने आपल्याला खूप छान फेश फील दिला तेही विसरले जाते. तशी स्त्रीची अवस्था होते.

ती एकटी पडते . आणि एकट्याने आयुष्य जगते. कारण आता परत सगळे निर्माण करण्याची , दुसरीकडे जावून सगळ्यांना परत आपलेसे करण्याची , त्यांच्या मध्ये involve होण्याची तिची क्षमता ही संपली असते. सगळ्यांच्या करिता चांगले करून ही तिच्या वाट्याला निराशा आली असते. त्रास , दुःख याचा डोंगर इतर कोणी समजू ही शकणार नाही.

उलट बाहेरच्या जगात कोणाला आपली दुःख सांगत बसली , कोणाचा आधार शोधायला लागली तर एक तर सहानुभूती दाखविली जाईल किंवा तिचा अजून गैरफायदा घेतला जाईल .. आणि तिचा आपल्याच व्यक्तीने विश्वासघात केल्यावर पूर्ण जगा वरचा विश्वास च उडून जाईल. फसवणूक , खोटी सहानुभूती या पेक्षा एकट्यानेच आयुष्य जगणे पसंत करेल.

दुधाने तोंड पोळल्यावर ताक ही फुंकून पिणे पसंत करेल.

भीक नको कुत्रा आवर. आपले , परके कोणीही नको मी आणि माझे आयुष्य , माझे नशीब म्हणून एकट्यानेच आयुष्य जगेल.

आयुष्य सुंदर आहे. प्रत्येकाने आपल्या घडण्यात आपल्या बायकोचा ही मोठा वाटा आहे याची जाणीव कायम ठेवली पाहिजे. गरज सरो वैद्य मरो असे वागणूक देवू नका. तिने तिचे तन, मन , धन सगळे काही तुम्हाला दिले असते. आयुष्यभर काय सात जन्मात तिचे हे ऋण फिटणार नाही. कारण पुरुष नोकरी सोडल्यास किती आळशी आणि रोज घरची जबाबदारी , मुलांची , वडीलधारी , बाहेरची नाती जपण्यात, जबाबदाऱ्या रोज आणि वर्षानुवर्ष पेलण्यास असमर्थ आहे. याची जाणीव नक्की ठेवली पाहिजे त्याने.

बायकोने आपल्या करिता ज्या ज्या गोष्टी केल्यात त्याची जाण ठेवली पाहिजे. तिचे आयुष्यभर काय पुढचं सात जन्म ही ते ऋण फेडू शकणार नाही पती.

पती पत्नी दोघांनी ही समजून घेतले पाहिजे. एकमेकांची गरज ही कायम असते असे अधांतरी सोडून जावू नये. घेतली जबाबदारी तर शेवटपर्यंत निभवण्याची क्षमता निर्माण करणे गरजेचे असते.

अर्थात काही वेळेस अपवाद असतात जिथे काही केले तरी पती पत्नी पटवून घेवूच शकत नाहीत. तिथे त्यांनी एकमेकांच्या मार्गात अडसर होण्यापेक्षा दूर जाणे सोयीस्कर.

प्रत्येकाला मोकळेपणे आणि भरभरून आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. मानवता , संस्कार , भावना , क्षणिक गोष्टिकरिता आपल्या जवळच्या व्यक्तीला गरज संपली म्हणून कधीच सोडू नका. कारण तिनेच एकेकाळी तुमच्या गरजा समजून घेवून त्या पूर्ण केल्या असतात.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला गरजेची समजणार नाहीत, तेव्हा तुमची पत्नी एकट्याने आयुष्य जगेल.”

  1. Deepali Shridhar Tamhankar

    हा लेख सुंदर आणि अगदी पटण्यासारखे आहे, परंतु फक्त स्त्रियांसाठीच नव्हे तर पुरुष वर्गांसाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे, कधी स्त्रियांना त्रास सहन करावे लागते तर कधी कधी काही पुरुषांनाही काही स्त्रिया त्रास देतात , जीवन सुंदर आहे परंतु ज्यांच्या वाट्याला दुःखच आहे किंवा ज्यांच्या वाट्याला सुखी जीवनच आहे तिथे काहीही फरक पडत नाही, जेव्हा हे माझंच आहे, ते माझंच आहे असा हट्ट न करता एकमेकांना समजून, सांभाळून घेत जीवन जगता आले तेव्हाच जीवन सुरळीत चालू राहते . नाहीच समजून घ्यायचे मग कितीही आटापिटा केला काहीच फरक पडत नाही. शेवटी नाण्याला दोन बाजू आहेत काटा किंवा छापा, फक्त जीवन जगता आले पाहिजे कोणाचीही पर्वा न करता

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!