Skip to content

सेकंड लाईफ पार्टनर शोधण्याआधी तुम्ही मागच्या त्रासातून बाहेर पडलायत का? हे या ७ मार्गाने शोधा.

सेकंड लाईफ पार्टनर शोधण्याआधी तुम्ही मागच्या त्रासातून बाहेर पडलायत का? हे या ७ मार्गाने शोधा.


हर्षदा पिंपळे


पहिला पार्टनर शोधतानाच इतकी दमछाक होते की काही विचारायलाच नको.पण मग विचार करा,पहिल्या वेळेस पार्टनर शोधतानाच इतकी दमछाक होत असेल तर दुसरा लाईफ पार्टनर शोधताना किती बरं त्रास होत असेल ? अर्थात सगळ्यांच्याच आयुष्यात असा दुसरा पार्टनर शोधायची वेळ येते असं नाही. पण ज्यांच्या आयुष्यात अशी वेळ येते त्याच्यामागे नक्कीच काही ना काही कारणं असतात. कुणाचा अपघात होतो तर कुणी आजारपणामुळे मरण पावतं.तर कुणाचा काही कारणांमुळे घटस्फोट झालेला असतो.काही जणं पुन्हा लग्नाचा विचार करतात तर काही जणं सगळं आयुष्य जोडीदाराशिवाय जगायचं ठरवतात.

पण हे सेकंड लाईफ पार्टनर शोधणं खरचं इतकं सोपं आहे का ? तर ते इतकही सोपं नाही.कारण सेकंड लाईफ पार्टनर शोधायचा म्हंटलं तर अनेक गोष्टींचा पुन्हा नव्याने विचार करावा लागतो.आणि सगळ्यात महत्वाचा असतो तो पास्ट…आपला भूतकाळ.आपण त्यातून बाहेर आलो आहोत का हे पाहणं देखील तितकच महत्वाचं असतं.तर कधी कधी आपल्याला हे समजत नाही. तर हेच कसं शोधायचं ते आपण पाहूयात.

◆भावना –

सेकंड लाईफ पार्टनरविषयी सहजच विचार करणं काही सोपं नाही.पहिल्या जोडीदाराविषयी आपल्या मनात असणाऱ्या भावनांचा आपण पुरेपूर विचार करून पाहिला तर आपल्या नक्कीच लक्षात येईल की,आपण कुठे आहोत.आपल्या मनात आधीच्या जोडीदाराविषयी कोणत्या आणि किती भावना जागृत आहेत. किंवा अजूनही त्याच भावना तितक्याच जिवंत आणि जागृत आहेत का ? हे तपासून घ्या.

◆ आठवणी – सातत्याने तुम्हाला तुमच्या जुन्या गोष्टी आठवत आहेत का? चांगल्या वाईट कोणत्या आठवणी तुमच्या मनात घर करून आहेत का ? आठवणी तुम्ही पूर्णपणे विसरला आहात का ?

◆विचार – सतत तुमच्या मनात तेच तेच विचार घोळत आहेत का ? अजूनही तुम्हाला तोच त्रास जाणवत आहे का ? असचं झालं तसचं झालं असा विचार मनात वारंवार येत आहे का? हे तपासून पहा.

◆स्वीकार्यहता – परिस्थिती स्वीकारून पुढे जायचं ठरवलं आहे का ? जे घडून घेलयं ते स्वीकारलं आहे का ? नव्याने आयुष्य जगणं स्वीकारलं आहे का ?या प्रश्नांची उत्तरं शोधून पहा.

◆ काळजी – आधीच्या गोष्टींची,त्या पार्टनरची/फॅमिलीची सतत काळजी वाटत आहे का? मन सतत त्यांच्या काळजीने चलबिचल होतं का ?

◆सहवास-
पुन्हा पुन्हा तोच शारीरिक / भावनिक सहवास हवाहवासा वाटतोय का ?
◆सगळं व्यर्थ वाटणे – पहिल्या जोडीदाराशिवाय सगळं व्यर्थ वाटतय का ? त्याच्याशिवाय सगळं अशक्य वाटतय का ? अवघड वाटतय का ?

या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करून पहा.या गोष्टी फार महत्वाच्या असतात.पहिला जोडीदार गमावल्यामुळे आयुष्यात अनेक उलथापालथ होत असते.मग कारण कोणतही असो.त्याचा परिणाम हा भविष्यावर होत असतो.आणि अर्थातच सेकंड पार्टनर चा विचार करायचा झाला तर आपण आधी स्वतः तेवढे प्रिपेअर आहोत का हे तपासून पाहणं खूप आवश्यक असतं.

आपण जुन्या गोष्टींमध्ये किती अडकून पडलोय,का त्यातून बाहेर आलो आहोत या सगळ्याचा विचार करूनच सेकंड लाईफ पार्टनर निवडणे योग्य ठरते.
नाहीतर भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीमधून आपण अजूनही बाहेर आलेले नसू,त्याच गोष्टीचा स्वतःला त्रास जाणवत असेल तर लगेचच दुसऱ्या जोडीदाराचा विचार करणं फारसं योग्य नाही.

म्हणून स्वतःला व्यवस्थित ओळखा.नीट समजून घ्या.खरचं आधीच्या त्रासातून बाहेर पडला असाल, मन मागे वळून पाहत नसेल,जुन्या गोष्टी उगाळत नसेल आणि पुन्हा एकदा मनापासून जर खरचं नवं आयुष्य सुरू करावसं वाटत असेल तरच दुसरा जोडीदार शोधण्याचा निर्णय घ्या.

कारण शेवटी वर्तमान आणि भविष्याचा प्रश्न असतो.भूतकाळात अडकून वर्तमान हेल्दी जगता येत नाही. आणि भविष्यही त्यामुळे अंधारात राहण्याची शक्यता असते.

त्यामुळे जो काही निर्णय घ्याल तो काळजीपूर्वक घ्यायला विसरू नका.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!