तुम्ही एक भावनिक व्यक्ती आहात की नाही हे या १० लक्षणांवरून ओळखा.
मेराज बागवान
भावना माणसाला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवतात.आपण अनेकदा म्हणतो,’मी खूप emotional आहे,ती खूप भावूक होते,तो खूप मनाला लावून घेतो…’.भावना प्रत्येक माणसात असतात.असलायलाच हव्यात. असे म्हणतात की मुली खूप भावनिक असतात.पण मुले देखील तितकीच भावनिक असतात. भावनिक व्यक्तीची व्याख्या करायची म्हटले तर,असे म्हणता येईल की,’एखादी गोष्ट मनाला जर खूप लागत असेल, त्या विषयी खूप जास्त विचार केला जात असेल तर ती व्यक्ती भावनिक म्हणता येईल’.
आपण ही व्याख्या केली.पण आणखीन सोप्या भाषेत तुम्ही भावनिक आहात की नाही,हे जर ओळखायचे असेल तर ही काही १० लक्षणं तुम्ही तपासून पाहु शकता.
१) रडू येणे – तुम्हाला कोणी काही बोलले तर लगेच जर का रडू येत असेल तर तुम्ही भावनिक आहात. उदा. मानसीला तिचे बॉस कामावरून थोडे बोलले.तर ती लगेच रडू लागली.
२) आपुलकी वाटणे – तुम्हाला जर का इतरांविषयी नेहमी आपलेपणा ,आपुलकी वाटत असेल तर तुम्ही एक भावनिक व्यक्ती आहात. उदा. विवेक नेहमी इतरांची प्रेमाने विचारपूस करतो.
३) मदत करणे – तुम्ही जर का नेहमी इतरांना मदत करत असाल तर समोरच्याची अडचण तुम्ही समजून घेत आहात.आणि हे समजून घेणे म्हणजेच भावनिक असणे होय.उदा.आशा गरीब लोकांना नेहमी अन्न दान करते.
४) विचारी व्यक्ती – तुम्ही जर एखाद्या गोष्टीविषयी सतत विचार करीत असाल तर तुम्ही भावनिक आहात. उदा.स्नेहा ला अमोल ने एक सुंदर भेटवस्तू दिली.स्नेहा सतत विचार करत होती,किती छान आहे हे गिफ्ट..मला इतकं सुंदर गिफ्ट मिळालं…स्नेहा इथे सतत विचार करीत आहे कारण ती भावनिक आहे.
५) थँक्स म्हणणे – तुम्ही जर का नेहमी इतरांना ‘थँक्स’ म्हणत असाल,नेहमी छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांचे आभार मानत असाल तर तुम्ही नक्कीच भावनिक आहात. उदा.दिशा सर्वांना थँक्स म्हणते.इतरजण नेहमी तिला म्हणतात,घडी घडी ‘थँक्स’ काय ग म्हणते…? पण तरी देखील दिशा तिची सवय नाही सोडत.कारण ती भावनिक आहे.
६) सॉरी म्हणणे – तुम्ही जर का तुमच्या चुकीसाठी सॉरी लगेच म्हणत असाल तर तुम्ही भावनिक आहात. उदा.अशोक मोहन ला सॉरी म्हणाला कारण तो मोहन ला भेटू शकला नाही.
७) समजूतदारपणा – तुम्ही नेहमी ‘Maturity’ दाखवत असाल, तसे वागत असाल तर तुम्ही भावनिक आहात. उदा.सुप्रिया आणि तृप्ती चे मोठे भांडण झाले.तृप्ती सुप्रिया ला खूप बोल बोलली.सुप्रिया दुखावली गेली,पण तरी देखील तिने तृप्ती ला समजून घेतले कारण तिला माहीत होते,तृप्ती ताणतणावात आहे.
८) प्रेमळपणा – तुम्ही जर का सर्वांशी प्रेमाने बोलत असाल,तसे वागत असाल तर तुम्ही भावनिक आहात. उदा.शरद सर्वांना स्वतःहून फोन करतो, काही काम नसताना देखील फक्त प्रेमाने विचारपूस करण्यासाठी फोन करतो कारण त्याच्यात प्रेमळपणा आहे.
९) काळजी घेणे – तुम्ही जर का नेहमी इतरांची काळजी घेत असाला तर तुम्ही भावनिक आहात. उदा.मोठा पाऊस सुरू होता.रोहन ने संतोष ला स्वतःकडील रेनकोट दिला कारण त्याला त्याच्याबद्दल काळजी होती.
१०) सतत इतरांचा विचार करणे – तुम्ही जर नेहमी इतरांविषयी विचार करत असाल तर तुम्ही भावनिक आहात. उदा.स्नेहल माझ्याशी बोलत नाही.माझ्याकडून काही चूक झाली नसेल ना.माझं काही चुकलं तर नाही ना.स्नेहल काही अडचणीत तर नसेल ना..असा विचार प्रियांका नेहमी करते कारण ती भावनिक आहे.
अशी काही लक्षणे आहेत भावनिक माणसांची.अशा माणसांना नेहमी इतरांची पर्वा असते. तसेच स्वतः देखील ते छोट्या छोट्या गोष्टींवरून भावून होतात.त्यांचे मन लगेच दुःखी होते.
भावनिक असणे चुकीचे नाही.भावना असल्याच पाहीजेत.पण आजच्या ‘कलयुगात’ व्यावहारिक जगाशी देखील सांगड घालता आली पाहिजे.कारण नुसत्या भावना देखील आयुष्यात उपयोच्या नसतात.त्यामुळे कुठे तर भावनिकता आणि व्यावहारिकता याचा ताळमेळ जमायला हवा.मग बाकी आयुष्य आपलंच आहे…
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

