वाद घालणाऱ्या व्यक्तींसमोर वाद घालण्याआधी हे काही प्रश्न स्वतःला जरूर विचारा.
मयुरी महाजन
आतापर्यंत कधीच कुणाशी वाद झाला नाही, असे कोणीही नसणार ,आणि असेलं तर अपवादच , प्रत्येक व्यक्तीची वागण्या बोलण्याची एक पद्धत असते, व प्रत्येक व्यक्तीला ती पद्धतचं योग्य आहे, असे वाटत असते, प्रत्येकाला आपापला एक पॉईंट ऑफ व्हयू असतो, व ती व्यक्ती त्याच पद्धतीने वावरताना दिसते, त्यातल्या त्यात ज्या व्यक्ती वाद घालणाऱ्या असतात ,त्यांना अगदी छोटेसे कारणही पुरेसे असते, वाद घालण्यासाठी ,आणि त्या छोट्याशा कारणावरूनही काही वाद विकोपाला पेटलेले असतात,
गोष्टी गोष्टीवरून वादाला पेटणारी व्यक्ती वाद घालण्याच्या ओघात कुठल्याही दिशेला जाऊ शकते ,ज्याची आपल्यालाही कल्पना नसते ,तर आपल्या आजूबाजूला, आपल्या कुटुंबात, किंवा आपले सहयोगी ज्या ठिकाणी आपण काम करत असू, तेथे अनेक जण असतात, ज्यात कोणीतरी गोष्ट समजून न घेता वाद घालत असतो ,किंवा आपण स्वतः की आपल्याला वाद घालायचा नसतो, परंतु समोरची व्यक्ती असं काही बोलते, किंवा वागते, की आपला स्वतःवरचा संयम ताबा सुटतो ,व नकळत आपण त्या व्यक्तीसोबत वाद घालत बसतो, परंतु वाद घालणाऱ्या व्यक्तींसमोर वाद घालण्याआधी हे काही प्रश्न आपण स्वतःला जरूर विचारा,
एक-टाळी एका हाताने वाजत नाही, याप्रमाणे वादाचे कारण काहीही असो, जर समोरची व्यक्ती वाद घालत आहे, आणि त्याला आपणही प्रत्युत्तर म्हणून काहीतरी प्रतिक्रिया देतोच आहे, तर आपणही त्याच्या इतकेच जबाबदार आहोत ,समोरची व्यक्ती जर रागीट असेल, तर त्यांच्याशी वाद घालून आपण त्याला दुजोरा देऊ नये, शक्य असल्यास ती व्यक्ती शांत झाल्यावर बोलणे जास्त श्रेयस्कर ठरेल,
दोन- वाद घालणारी व्यक्ती कधीकधी अटेंशन प्रिय असते, आपल्यालाही काहीतरी महत्त्व आहे, व ते महत्त्व लोकांनी द्यावं, त्यासाठी अशी व्यक्ती प्रयत्न करत असते, व त्यासाठी ती काहीही करू शकते ,तेव्हा आपण स्वतःला हे नक्की विचारायला हवं, की या व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त महत्त्व भेटलेलं आहे, किंवा आपल्याकडून त्याला गरजेपेक्षा कमी महत्त्व दिले गेले आहे, हेही तपासून पहावे,
तीन- विषयावर वाद घालण्यापेक्षा शांतपणे आपण तो सोडू शकतो का??? हे स्वतःला विचारणे अत्यंत गरजेचे आहे, कारण वाद घालून कुठल्याही समस्येवर उपाय निघत नसून, गोष्टी आहे त्यापेक्षाही जास्त किचकट होऊन बसतात, अशावेळी शांतपणे त्यावर विचार होणे खूप गरजेचे आहे, त्यासाठी आपल्याकडे तितका संयम व स्वतःवरती ताबा असणे गरजेचे आहे,
चार -जर समोरची व्यक्ती वाद घालण्याच्याच विचाराने पेटलेली असेल, तर ती भांडून भांडून कुठपर्यंत भांडेल ,वाद घालून घालून कुठपर्यंत घालू शकते ,जर आपण शांत होऊन किंवा त्या वादाला इग्नोर करत असू ,तर जास्तीत जास्त समोरची व्यक्ती वाद करून करून आपल्याकडून कुठलीही प्रतिक्रिया येत नाही हे बघून कमी वेळात वाद थांबवू शकते,
पाच- भिंतीवर फेकलेला चेंडू हा आपण जितक्या ताकदीने टाकणार ,तो तितक्याच ताकदीने आपल्याकडे येतो ,हे आपल्याला आपल्या आयुष्यातही लागू होते, आपण जर वाद घालणाऱ्याच्या विचाराला हवा दिली तर ती ठिणगी आगीत कधी पेट घेते, हे आपल्याला कळतही नाही, त्यासाठी वाद होण्याचे कारण जर काही गैरसमजातून निर्माण झालेले असेल, तर आपण तो गैरसमज लक्षात आणून देणेही गरजेचे आहे ,
प्रत्येक माणूस जीवन जगत असताना ,आपापली तत्वे व आपली धारणा ठेवून जीवन जगत असतो, आपल्या तत्त्वात ज्या गोष्टी बसत नाहीत, त्याचा आपल्याला त्रास होतो, परंतु प्रत्येकाला ती तत्त्वे मान्य असतीलच असे मात्र नाही, कारण जशी आपल्याला आपली तत्त्वे आहेत ,तसेच प्रत्येकाला ती असतात, त्यामुळे ती स्वीकारता येत नसतील ,तरी चालेल परंतु त्याचा विरोध ही नसावा ,
शेवटी प्रत्येकाला आपापल्याप्रमाणे जगण्याचा हक्क आहे, आपण कधीही कुणाची लाईफ कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नये ,कारण प्रत्येक जण जीवनाला आपापल्या आरशातून पाहणे पसंत करतो, काही माणसं जीवनाच्या बाबतीत अगदी सरळ मार्गी असतात ,असे असले तरी देखील, सरळ मार्गी लोकांच्या आयुष्यात स्वतःहून त्यांना वाकड्यात पडणारे व त्यांच्याशी स्वतःहून वाद घालणारेही काही कमी नाहीत, अशावेळी स्वतःच्या तत्त्वांना जोपासताना त्यांचा गैरवापर करून कुणी जर आपल्यालाच वाकड्यात काढत असेल, तर त्यावेळी स्वतःसाठी उभे राहणेही गरजेचे आहे, योग्य त्या पद्धतीने शिक्षा देणे गरजेचे आहे, जसे की आपण पोलिसांची मदत घेऊ शकतो ,
बऱ्याच वेळेला चांगलं काम हाती घेतलेल्या माणसांना याची प्रचिती येतेच ,जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करत असता त्यावेळी सर्वप्रथम त्याला विरोध असतो, त्यासाठी अनेक अडचणी असतात, जसे की सावित्रीबाई फुलेंनी स्री शिक्षणासाठी जेव्हा पाया रचला, त्यावेळी त्यांच्या अंगावर शेण दगड गोटे फेकणारी माणसे होतीच की, तरीही त्या थांबल्या नाहीत, व अशा व्यक्तींसोबत वाद घालण्यात त्यांनी आपला वेळ देखील खर्ची घातला नाही ,कारण त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट होते, त्यांचे ध्येय सुस्पष्ट होते, व त्यांना फक्त ते साध्य करायचे होते, त्यासाठी ते कुठेही विनाकारण आपला वेळ त्यांनी घातलाच नाही, व आपल्या मार्गाने चालण्याचे त्यांचे धाडस आज लाखो स्त्रिया शिक्षणाची फुले फुलेंमुळे वेचू शकत आहे, हा त्यांचा गौरव आहे….
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

