नवऱ्याचा आधार नसलेल्या महिलेने स्वतःला मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग कसे करावे??
टीम आपलं मानसशास्त्र
स्त्री असो अथवा पुरुष प्रत्येकाला कोणाचा तरी आधार हा गरजेचा असतोच. अगदी कोणतीही स्त्री अथवा पुरुष खूप मानी अस्त्तील. अहंकार म्हणलं तरी चालेल. तरी ही त्यांना ही आधाराची गरज असतेच. केवळ अनेक अनुभवातून किंवा परिस्थितीतून ते strong बनत गेले असतात. त्यांना पर्याय नसतो. याचा अर्थ असा नाही की त्यांना आधाराची गरजच नसते. उलट प्रत्येक व्यक्तीला मानसिक, आर्थिक , सामाजिक स्थैर्य पाहिजे असते.
स्त्री तशी भावनिक , मर्यादा असणारी , लाजरी , कोणाचा तरी आधार असेल तर खूप strong असणारी असते. लहान असताना आई – वडील, घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्ती, भावंडे यांचा आधार असतो. शाळेत , कॉलेज मध्ये , ऑफिस मध्ये मित्र – मैत्रिणी, सहकारी यांचा आधार , मदत असते.
लग्नानंतर सासरचे , आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नवऱ्याचा आधार असतो.
प्रत्येक स्त्रीला नवऱ्याचा आधार कायमस्वरूपी मिळेलच असे नसते. काही स्त्रियांना नोकरी निमित्त मग त्यांची स्वतः ची असेल किंवा नवऱ्याची त्याकरिता बाहेर राहावे लागते , कधी देशात तर कधी परदेशात. अशावेळी स्त्रीला क्षणोक्षणी लागणारा आधार हा सोबत नसतो.
तर काही वेळेस लहान वयात येणारे वैधव्य असेल तर नवऱ्याचा कायमचा आधार हरवलेला असतो.
तर कधी घटस्फोट , विचार जुळत नसतील तर वेगळे राहणारे नवरा बायको ..यात बायकोला असलेला नवऱ्याचा आधार हरवलेला असतो.
तर असेही नवरे असतात जे असून ही व्यसन , दारू यांच्या आधीन झालेले असतात. काही काम , उद्योग करत नाहीत उलट बायको काम करत असते आणि ते बायकोला मारहाण करत असतात. अशा बायकाना नवरे असूनही आधार नसतो.
तर असेही पुरुष आहेत जे पहिली बायको जिवंत असताना ही दुसरी बायको करतात. आणि बरेचवेळा ते पहिल्या बायको आणि मुलांच्या कर्तव्यात दुसऱ्या बायकोला कोणताच आधार देवू शकत नाहीत . आर्थिक , सामाजिक दृष्ट्या नाहीच पण मानसिकदृष्ट्या ही खूप मर्यादित.
अनेक स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या , मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या ही नवऱ्याचा आधार नसतो.
आर्थिकदृष्ट्या एकवेळ स्त्री काही ना काही काम करून , कष्ट करून , तीच्या शिक्षणाच्या , अनुभवाच्या जोरावर ती उभी राहू शकते.
पण नवऱ्याचा आधार नसलेल्या महिलेने स्वतःला मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग कसे करावे??
१. मी खंबीर आहे : मी कुठेही कमी नाही हे स्वत:च्या मनाला बजवावे : – स्त्री जेवढी मानसिक दृष्ट्या खंबीर असते तितकीच कमकुवत ही समजली जाते तेवढीच अनेकदा भावनिक दृष्ट्या तिला आधारची खूप गरज असते.
शरीर आणि मन याने नाजूक असते स्त्री. आता देश प्रगत झाला. तशी स्त्रियांनी ही प्रगती केली. अनेक आघाडीवर स्त्रिया कार्यरत आहेत. अशावेळी त्या शरीर आणि मन याने ही घट्ट आहेत. त्यांच्या जबाबदाऱ्या खंबीरपणें पार पाडतात.
पण अजूनही सर्वसामान्य स्त्रिया ज्या आहेत त्यांना जेव्हा नवऱ्याचा आधार नसतो तेव्हा मात्र त्यांनी स्वतः च स्वतच्या मनाला खंबीरपणे बजावले पाहिजे की , मला कोणाच्या आधाराची गरज नाही. मी कुठेही कमी नाही. खंबीर आहे. जे problems , समस्या येतील त्या सोडविण्यासाठी मी स्वतः समर्थ आहे.
२. नवऱ्याचा आधार नाही ही नकारात्मक विचारसरणी मनातून काढून टाकून सकारात्मक विचारसरणी ठेवणे : – सतत मनात आणि दुसऱ्याशी बोलताना मला नवऱ्याचा आधार नाही . सगळे एकटीला बघावे लागते , काय करणार पर्याय नाही असे नकारात्मक किंवा सहानुभूती मिळविणारे शब्द नकोत. तर शांतपणे मनात हे सकारात्मक विचार करा की ठीक आहे नाही ना आधार नाही. मी तो आधार नसेल तरी ही जिद्दीने पुढे जात राहीन. मुले असतील तर मुलांची काळजी स्वतः घेईन त्यांना आनंदी ठेवून त्यांच्यात आणि आपल्यात उत्साह निर्माण करीन असे attitude म्हणले तरी चालेल. किंवा असा सकारात्मक विचार ठेवावा.
मुळात याचा स्वीकार करा की मला नवऱ्याचा आधार नाही. ते स्वीकारले की राहते काय तर सगळी धडपड स्वतः करण्याची सकारात्मक मानसिकता.
३. नवऱ्याचा आधार नाही म्हणजे पूर्णपणे एकटे आहोत आता कसे होईल हे विचार काढून टाकावेत. :
नवऱ्याचा आधार नाही म्हणजे आता सगळे संपले , आपण एकटेच आहोत. आता कसे होणार , असा सतत नकारात्मक विचार करत बसण्यापेक्षा कधी काही बोलावे वाटले , आधाराची गरज वाटली तर आई वडील हे सर्वात उत्तम नाते असते जिथे मोकळेपणाने आणि विश्वासाने बोलून अनेक समस्या सोडविल्या जातात. काही नाही तर मन हलके होते. आई वडील नसतील तर भाऊ , बहीण असतात. वेळप्रसंगी ते आधार देतात. फक्त मोकळेपणाने बोलले पाहिजे. अनेक समस्या या वाढतात कारण आपण मोकळेपणाने बोलत नाही.
४. काही गोष्टी अशा असतात की तिथे खरेच नवऱ्याच्या आधाराची च गरज असते. पण अशा वेळी स्वतः वर विश्वास ठेवायचा. :
काही वेळेस नवरा बायको यातल्या ज्या अनेक गोष्टी मोकळेपणा ने करत असतात. बोलत असतात. निस्वार्थीपणे मदत करत असतात.न बोलून ही बरेचवेळा केवळ सोबत आहोत हा आधार असतो. किंवा खरेच जिथे इतरांच्या पासून संरक्षण म्हणा किंवा माझा नवरा माझा भककम आधार आहे. कोणत्याही परिस्थितीत मग आर्थिक असेल, सामाजिक सुरक्षितता देण्यासाठी असेल , रोजच्या कौटुंबिक अडचणी मध्ये त्या सोडविताना आधार , मानसिक गोष्टीत सुख , शांतता , आनंद , टेन्शन फ्री आयुष्य जगण्यासाठी नवऱ्याचा आधार खूप गरजेचं असतो.
आणि काही कारणाने स्त्रीला नवऱ्याचा हाच आधार मिळत नाही तेव्हा स्त्री खूप एकाकी , एकटी पडते.
एकतर स्वतः च मानसिक संतुलन बिघडवून बसते. सतत तेच विचार की हे असे का ?माझ्याच बाबत असे का ?
म्हणून स्त्री ने सतत तेच विचार करणे सोडून देवून जी परिस्थिती आहे त्याचा स्वीकार करून स्वतः मध्ये तेवढे बदल घडवून आणावे, तेवढी तयारी करावी की मीच एकटी नाही की नवऱ्याचा आधार नसलेल्या अनेक स्त्रिया आहेत. त्या धडाडीने पुढे जातात. तेव्हा मी ही आधार नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा नाहीच आधार हे गृहीत धरून ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याची मुद्देसूद लिस्ट करून पुढची आखणी केली तर आपल्याला गोष्टी सहजपणे करता येतील.
आणि मानसिक दृष्ट्या जे नाही त्याचा विचार करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. आपल्यात क्षमता निर्माण करायच्या. जेव्हा अगदीच भावनिक दृष्ट्या नवऱ्याचा आधार पाहिजे. मोकळेपणे बोलावे वाटते तेव्हा तुमची एक डायरी करा. त्यात मनात येईल ते मांडत जा. मन हलके होईल. आणि लिहिलेले नक्की वाचत जा त्यातून मार्ग मिळतील. क्षमता वाढतील.
जवळच्या मित्र मैत्रिणीशी बोला. पणबरेचवेला तसे बोलून फायदा होण्यापेक्षा तोटा ही होवू शकतो. कारण तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ते त्यांना कधीच समजू शकत नाही कारण त्यांच्यावर ते प्रसंग कधी आलेले नसतात. त्यातून एक तर तुम्ही चेष्टेचा विषय होता, किंवा सहानुभूती मिळविता. आणि तिसरे खरेच असे जवळचे मित्र मैत्रिणी आधार देणारे ही असतात पण त्यांनाही मर्यादा असतात. त्या बाहेर ते ही जावू शकत नाहीत.
म्हणूनच नवऱ्याचा आधार नसलेल्या महिलेने स्वतःला मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग ठेवत जावे. रोज ध्यान धारणा , दीर्घ श्वास, योगा, व्यायाम करून मनाची एकाग्रता ही वाढवावी आणि शरीर स्वास्थ्य ही ठेवावे. जेणेकरून कायम उत्साही राहता येईल. Motivational speech ऐकावीत, विचार ऐकावे. ज्यातून प्रेरणा मिळतील.
आणि जे नाही त्याचा स्वीकार करायचा आणि अपेक्षा ठेवणे सोडून द्यायचे. स्वतः वर विश्वास ठेवायला शिकायचा. अनेक गोष्टी आपण केल्या नसतात. माहिती नसते. म्हणून त्या गोष्टींची जबाबदारी घेताना भीती वाटते , ताण तणाव वाढतो, जमले नाही तर निराशा येते. पण सतत प्रयत्नवादी राहायचे. प्रयत्न केलेत की अनुभव मिळतो आणि अनुभव तुम्हाला अधिक विश्वास देत असतो. आणि खंबीर राहण्यास उपयोगी पडत असतो.
५. थोडा वेळ स्वतः साठी काढायचा :
नवऱ्याचा आधार नाही हे स्वीकारून अनेक जबाबदाऱ्या आपण पेलत असतात बायका . त्या पेलत असताना स्वतः कडे दुर्लक्ष होवू देवू नका. स्वतः साठी वेळ काढा. फिटनेस असेल , सौंदर्य असेल , किंवा पेहराव तो छान आणि आपल्याला उत्साह वाढविणारा ठेवावा म्हणजे निराशा येणार नाही. आणि आपला विश्वास अजून वाढेल.
या शिवाय आपली काही स्किल develop करण्यासाठी वेळ काढायचा. म्हणजे आपण स्वतः update राहू शकू. आणि अडचणी येणार नाहीत.
आयुष्य सुंदर आहे. नवऱ्याचा आधार नसलेल्या महिलेने स्वतःला मानसिक दृष्ट्या कमकुवत समजण्या पेक्षा स्वतः ला स्ट्रॉंग कसे बनवता येईल यावर भर देणे गरजेचे. All the best !
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
चांगला खुप छान
अतिशय सुन्दर प्रेरणा देणारा लेख