Skip to content

एखाद्या रिलेशनशिप मधून बाहेर पडण्यासाठी ही १० कारणे तुमच्या जवळ असायला हवीत.

एखाद्या रिलेशनशिप मधून बाहेर पडण्यासाठी ही १० कारणे तुमच्या जवळ असायला हवीत.


मेराज बागवान


‘रिलेशनशिप’ आजकाल सर्वत्र माहीत असलेला आणि आता ‘कॉमन’ झालेला हा शब्द.ह्याला आपण प्रेम-संबंध वगैरे देखील संबोधतो.पण असे जरी असले तरी आपली सामाजिक व्यवसथा आजही लग्न ह्या संस्थेलाच नैतिक मानते आणि ‘रीलेशनशीप’ ला आजही समाज मान्यता नाही.

कॉलेज ची मुले-मुली असतो,किंवा नोकरी-व्यवसुसंवादसाय करणारे तरुण-तरुणी असोत.आजकाल लग्न करण्याआधी ‘रिलेशनशिप’ अनुभवायला अनेकजण उत्सुक असतात. आपण तर जाणतोच की ह्यातील किती रिलेशनशिप लग्नामध्ये रूपांतरित होतात.कारणे वेगवेगळी असू शकतील.पण आजही आपल्याकडील वास्तव हेच आहे की जवळपास ९०% रिलेशनशिप लग्नापर्यंत पोहचत नाहित.आणि त्या ‘रिलेशनशिप’ चे ‘ब्रेकअप’ हे नक्की असते.

माणूस हा नाती जपणारा असतो.नात्यांमुळे आयुष्य फुलते. एक प्रकारचा पाठिंबा मिळतो,आधार मिळतो.व्यक्त होण्यासाठी कोणीतरी हक्काचे माणूस मिळते.पण काही काही वेळेस ही नाती असह्य होतात.कधी मुलाला तर कधी मुलीला.पण समजत नाही ,की नक्की काय होत आहे.एक प्रकारची घुसमट आणि मानसिक त्रास होत राहतो.वाटत असते की सोडून द्यावे सगळे आणि वेगळे व्हावे पटकन.पण कारणे काय आहेत हे मन समजू शकत नाही. कारण भावनिक गुंतागुंत झालेली असते.

पण असे करून देखील चालत नाही.ह्याने मानसिक कुचंबणा होते आणि माणूस वास्तवात जगू शकत नाही.म्हणूनच एखाद्या रिलेशनशिप मधून बाहेर पडण्यासाठी ही १० कारणे तुमच्या जवळ असायला हवीत.

१) समजुतदातपणा – रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या प्रत्येक पुरुषाने आणि स्त्रीने प्रथम ‘Maturity’ पहिली पाहिजे.उगाच कंटाळा आला म्हणून नाते आता नको,असे म्हणण्यात काहीच समजुतदारपणा नसतो.म्हणून नात्यामधून बाहेर पडण्याआधी हा विचार करावा की ,माझा पार्टनर मला समजून घेऊ शकतो की नाही.आणि मगच योग्य तो निर्णय घ्यावा.

२) विचारांची जुळवणूक – समजा मुलीचे विचार खूपच मॉडर्न आहेत आणि मुलगा अजूनही गावाकडील विचारांचा आहे तर दोघांच्या विचारसरणीत खूप मोठा फरक असू शकतो.आणि पुढे जाऊन ह्या कारणामुळे नाते मोडू शकते.त्यामुळे विचार जुळत आहेत की नाही हे योग्य रित्या तपासून मगच रिलेशनशिप मधून बाहेर पडणे योग्य ठरते.

३) आदर – कोणत्याही नात्यात आदर नसेल तर ते मुळीच टिकत नाही.एकजण दुसऱ्याला वाटेल तसे बोलतो.विचारांना महत्व देत नाही.मतांना किंमत देत नसेल तर हे नाते पुढे नेणे कितपत योग्य असते? त्यामुळे लग्नाआधी त्या रिलेशनशिप मधून बाहेत पडणे योग्य ठरते.आदर कोणत्याही व्यक्तीसाठी फार महत्वाचा ठरतो.तसेच नात्याबरोबर स्वाभिमान देखील प्रत्येक व्यक्तीने जपला पाहिजे.तरच जगण्याला खरा अर्थ असतो.उगाच व्हावत जाणे मानसिक आरोग्य बिघडवते.

४) सुसंवाद – संवाद नात्यांना जिवंत ठेवतो.संवाद म्हणजे काय,दोन्ही व्यक्तींनी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणे.एक जण बोलतो आहे आणि दुसऱ्याला त्याचे काही देणे-घेणे नसेल तर त्या नात्याला देखील काहीच अर्थ उरत नाही.आणि असे नाते पुढे नेणे म्हणजे एक प्रकारे ‘जबरदस्ती’ करण्यासारखे ठरते,जरी उद्देश तसा नसेल तरी देखील.

५) करिअर आणि शिक्षण – मुले-मुली दोघे आजकाल ‘करिअर ओरियेनटेड’ असतात.मग नात्यांमध्ये एकमेकांच्या करीअर, शिक्षण ह्याला पाठिंबा मिळणे, प्रेरणा मिळणे अपेक्षित असते.आणि हे दोन्हीकडून होणे गरजेचे ठरते.फक्त माझंच करिअर महत्वाचं, तुझं नंतर बघू हे योग्य नसते.आणि जर का एक जण दुसऱ्याला ‘कमी लेखत असेल’ तर ह्या रेलशनशीप बाबत थोडा विचार करणे रास्त ठरते.

६) अपेक्षा – अपेक्षा दुःख देते,हे जरी खरे असले तरी काही अपेक्षा उपजत असतात.जसे की ,एकमेकांची काळजी घेणे,अडचणीत मदत करणे,विचारपूस करणे इत्यादी.ह्या काही सांगायच्या गोष्टी नसतात.पण एकाला वाटत राहते की ही माझ्याकडून नको त्या अपेक्षा ठेवत आहे.पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचे भानच नाते मजबूत बनवत असते. आणि ह्या गोष्टी जर का साध्य होत नसतील तर रिलेशन ठेवायचे की नाही हा प्रश्न उभा राहतो.

७) जुळवून घेण्याची क्षमता – दोघे जण ‘Compromise/Adjustment’ करायला तयार असतील तर आणि तरच ते नाते टिकते.जोर-जबरदस्तीने काहीही साध्य होत नाही.म्हणून दोघांनी जुळवून घेणे गरजेचे ठरते.तरी देखील हे होतच नसेल तर मात्र काहीतरी चुकत आहे हे खरे.

८) शारीरिक संबंध – हा सहजीवनाचा मूलभूत पाया असतो.ह्या विषयी दोघांचे मत काय ? पुढे जाऊन मुलांची जबाबदारी ह्या विषयी दोघांना काय वाटते हे फार महत्वाचे ठरते.त्यामुळे दोघांचे या विषयी विचार स्पष्ट असणे गरजेचे असते.ह्या गोष्टीवरून देखील रिलेशनशिप पुढे न्यायचे की नाही हे तुम्ही ठरवू शकता.

९) छंद/ आवडी-निवडी/भविष्याचे नियोजन – स्त्री-पुरुष दोघांनी आपल्या आवडी-निवडी एकमेकांना सांगणे आवश्यक असते.मला काय आवडते,माझे छंद काय आहेत हे दुसऱ्याला सांगितले तर नाते घट्ट होण्यास मदत होते.आणि स्वतःच्या छंदांना देखील न्याय देता येतो.तसेच भविश्याविषयी काय नियोजन आहे,किंवा आयुष्य कसे जगायचे आहे,जीवनातील मूल्ये काय आहेत हे एकमेकांना सांगणे मोलाचे असते.आणि हेच जर होत नसेल तर विचारपूर्वक निर्णय घेण्याची वेळ येते.

१०) विश्वास – अत्यंत महत्वाची गोष्ट.जगातील कोणतेही नाते विश्वासावर आधारलेले असते.रिलेशनशिप मध्ये एक प्रकारचा पारदर्शकपणा, खरेपणा असणे आवश्यक असते.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विश्वास दोन्हीकडून असावा.कोणी कोणाला फसवत आहे ही भावना कधीच नात्यांमध्ये निर्माण नाही झाली पाहिजे.आणि जर ही भावना निर्माण होत असेल तर पुढे जायचे की नाही हे स्पष्ट होते.

अशी काही कारणे आहेत जी विचारात घेणे गरजेचे असते, जेव्हा तुम्हाला वाटत असते की आता मला हे नाते नको आहे.कोणी आनंदाने नाते मोडत नाही.कोणतेही नाते तुटले की प्रचंड दुःख,यातना होतात.तोडणे सोपे असते पण जोडणे अवघड. म्हणून तडकाफडकी निर्णय घेण्याआधी वरील सर्व बाबींचा विचार करा आणि मगच योग्य तो निर्णय घ्या.

समाजात आज नाती मोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत नाही.फक्त लग्नाआधीचीच नाहीत तर लग्न मोडण्याचे,विभक्त होण्याचे,घटस्फोट याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे.ह्या सगळ्यात दोघे जण कसा दृष्टीकोन ठेवतात हे महत्वाचे ठरते.नाती जपली तर आयुष्य खरोखर खूप सुंदर बनते.कोणीतरी ‘हक्काचं’ आहे ही भावना खूप समाधान देणारी असते.म्हणून कोणत्याही नात्यातून बाहेत पडण्याआधी सर्व दृष्टीने विचार करा.डोक्यात राग घालून,खोटा अहंकार जपून काहीच उपयोग नसतो.ह्याने फक्त दोघांची मानसिक कुचंबणा होते.

काळजी घ्या….


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!