Skip to content

तुम्हाला एखादा पुरुष हवाहवासा वाटतोय हे १० लक्षणांवरून ओळखा.

तुम्हाला एखादा पुरुष हवाहवासा वाटतोय हे १० लक्षणांवरून ओळखा.


टीम आपलं मानसशास्त्र


स्त्री आणि पुरुष यांच्यात आकर्षण ही नैसर्गिक गोष्ट, भावना आहे. एखाद्या पुरुषाला एखाद् स्त्री आवडते. ती हवीहवीशी वाटते.

तसेच स्त्रीला एखादा पुरुष हवाहवासा वाटतोय हे १० लक्षणांवरून ओळखा.

१. सतत आवडणाऱ्या पुरुषाकडे नजर जाणे : –
जेव्हा स्त्रीला एखादा पुरुष आवडतो तेव्हा साहजिकच तिचे लक्ष सतत त्याच्यावर केंद्रित होते. तो काय करतो , सतत त्याच्याकडे बघणे , डोळ्यात डोळे घालून बघणे. यातून एकमेकांची ओढ आहे , विश्वास आहे , प्रेम आहे हे व्यक्त होत असते. तो पुरुष हवाहवासा वाटत असतो.त्याचे व्यक्तिमत्त्व आकर्षित करू लागते. त्याची उंची , नाक , चालणे , बोलणे याकडे नजर केंद्रीत होते. त्याचा आवाज कसा आहे ते ऐकण्याची ओढ लागते.

२.सतत त्या आवडणाऱ्या , हवाहवासा वाटणारा पुरुष असतो त्याच्या अवतीभोवती ही स्त्री घुटमळत असते. जेणेकरून त्याचा मिळणारा थोडासा ही सहवास तिला हवाहवासा वाटतो. ती त्यातून ही आनंदी होत असते.

३. ओळख आणि माहिती करून घेणे : -जो पुरुष आवडतो , हवाहवासा वाटतो त्याच्या विषयी सगळी माहिती करून घेतली जाते. तो काय करतो , त्याचे नाव , कॉलेज असेल तर कोणते कॉलेज, नोकरी मध्ये असेल तर कोणती , कुठे या गोष्टींची माहिती करून घेतली जाते.

४. स्त्री जो पुरुष हवाहवासा वाटतो त्याच्या सोबत सतत बोलण्याचा प्रयत्न करत असते. मग काही ना काही कारण काढून संवाद वाढवला जातो.

५. त्याच्या आवडी निवडी जाणून घेतल्या जातात. : जो पुरुष हवाहवासा वाटतो त्याच्या आवडी निवडी समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

६. त्याच्या आवडीनुसार पेहराव, केशभूषा , मेकअप करणे : जो पुरुष हवाहवासा वाटतो त्याच्या आवडी निवडी समजून आपण तसे राहण्याचा प्रयत्न ती स्त्री करत असते. मग तसा पेहराव , केशभूषा , मेकअप असेल ते त्याला आवडते तसे करण्याचा प्रयत्न करून त्याला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असते.

७. जो पुरुष आपल्याकडे बघत ही नाही त्याच्यावर प्रेम करणे आणि तो च हवाहवासा वाटणे म्हणजे खरेच खूप कठीण असते. कारण त्याच्या दृष्टीने तिला कोणतेच महत्व नसते. ती कुठेच नसते त्याच्या विश्वात.
तो हवाहवासा वाटतो आणि त्याने आपल्याकडे बघावे म्हणून सततचे प्रयत्न केले जातात.

८.. ओळखीचे रूपांतर पुढे मैत्री आणि प्रेमात होण्यासाठी प्रयत्न केले जातात.

जो पुरुष ,वत्याचा सहवास सतत हवाहवासा वाटतो त्याच्याशी ओळख करून घेवून सतत काही ना काही कारणाने त्याच्याशी बोलून , भेटून , कधी त्याची मदत घेवून ओळख वाढवली जाते आणि नंतर वाढत गेलेली मैत्री त्याचे रूपांतर प्रेमात होण्यासाठी प्रयत्न केले जातात.

९. सतत त्याच्या विचारात हरवणे. बाकी गोष्टीत लक्ष न लागणे : –
जो पुरुष हवाहवासा वाटतो सतत त्याच्या विचारात हरवून जाते ती. कोणी इतर काही गोष्टी बोलत असेल , सांगत असेल तरी तिकडे लक्ष नसते. कोणाशी बोलत असेल तरी त्याच्या विषयी च बोलले जाते. किंवा जाणून घेतले जाते. तो दिसला नाही तर मनात एक हुरहूर लागून राहते. कुठे असेल , काय करत असेल, मग त्याच्या मित्र मैत्रिणीकडून विचारपूस करून घ्यायची .मग बिझी असेल तर ठीक. कुठे बाहेरगावी गेला का तर मन खट्टू होते.

१०. जो हवाहवासा वाटतो त्याच्याशी संपर्क वाढवल्यावर त्याला कोणते पदार्थ आवडतात ते जाणून घेतले जातात. त्याच्या आवडी निवडी , छंद काय ते ही जाणून घेतले जातात. आणि मग स्वतः त्याच्या आवडते पदार्थ करण्यास शिकले जातात. त्याला करून घेवून जावून खाण्यास आवडीने दिले जातात. त्याच्या आवडी निवडी समजून घेवून तसे त्याला छान भेटवस्तू दिल्या जातात. त्याचा आवडता रंग, तो स्वतः ही घातला जातो आणि त्याला गिफ्ट देताना आवर्जून विचारात घेतले जाते.

त्याचे छंद काय समजून त्याला त्यात अजून प्रेरित केले जाते. स्वतः ही त्यात खूप involve होत असते.

तुम्हाला एखादा पुरुष हवाहवासा वाटतोय हे अनेक लक्षणांवरून ओळखता येते. जसे तुम्ही सतत त्याच्या आजूबाजूला असता, त्याचा जास्तीत जास्त वेळ तुम्हाला पाहिजे असतो. सतत त्याने तुमच्याशी बोलत राहावे असेच वाटत असते. त्याच्या सोबत आपण एकटेच असावे असे ही मनापासून वाटत असते. त्याच्या सोबत गाडीवरून , गाडीतून एकांतात मस्त फिरावे. लाँग ड्राईव्ह .जेणेकरून तो जास्तीत जास्त वेळ एकत्र राहता येईल. त्याच बोलणे , विनोद , त्याची बुद्धिमत्ता , त्याचे व्यवहारिक ज्ञान त्याची हुशारी सगळे आकर्षित करत असते. आणि तो पुरुष केवळ आपलाच आहे. आपलाच असावा, आपल्याशीच बोलावे. अशी पझेसिव्ह वृत्ती वाढीस लागते.

तुम्हाला एखादा पुरुष हवाहवासा वाटतोय त्याच्या अवतीभोवती च तुमचे विश्व फिरू लागते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी तो आणि तोच..ही भावना वाढीस लागते. एक सुखद , गोड भावना असते ती. यात आधी मन, भावना गुंतातात , त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आकर्षित करतात. बोलणे , हसणे , बघणे , नजर , हुशारी , निर्णय क्षमता , समय सूचकता, त्यानंतर शारीरिक आकर्षण ही वाढू लागते. त्याचे बाह्य व्यक्तिमत्त्व उंची , physic , डोळे , नाक , खांदे , त्याचे चालणे , बोलणे , या गोष्टींचे ही आकर्षण वाटू लागते. तेही हवेहवेसे वाटते.

पण अगदी सुरुवातीला हे प्रेम निस्सीम , निस्वार्थी , निरागस असते. तो हवाहवासा वाटणारा पुरुष , त्याचे सर्वांगाने आकर्षण वाढले की मग लग्न आणि शारीरिक संबंध याची ओढ वाढते. इतर वेळी त्याचा हलकासा स्पर्श ही फुलवून टाकतो. त्यातून ही समजते की तो पुरुष हवाहवासा वाटतो. त्याच्या सतत जवळ जाण्याचा , राहण्याचा प्रयत्न स्त्री करत असते.

प्रत्येक स्त्रिच्या पुरुषा बाबत कल्पना या भारतीय भिन्न असतात. कोणाला कोणत्या गोष्टीवरून तो पुरुष सतत हवाहवासा वाटेल हे तिचे अनुभवच सांगतात.

पण ज्याच्या सोबत मन ,विचार जुळतात. आपुलकी , ओढ , प्रेम , आदर , विश्वास वाढतो.. त्याचे कर्तुत्व कधी हवेहवेसे वाटते. तर कधी दोघात होणारे संवाद , तर कधी शारीरिक आकर्षण , शारीरिक संबंध ही जो अतिशय सुखकारक देतो, त्यात ही स्त्री ची आवड निवड, गरज लक्षात घेवून केवळ शरीराची गरज पूर्ती करणे हा हेतू नसतो. तर त्या शारीरिक संबंधातून एकमेकांच्या विषयी ओढ अजून वाढवणे , आवडत्या गोष्टीतून समाधान , शांतता मिळविणे आणि नाते हळूहळू फुलवत जाणे हा हेतू असतो. त्यातून परमोच्च आनंद , स्वर्गीय सुख मिळविणे हा उद्देश असतो.
असा पुरुष स्त्री ला कायमच हवाहवासा वाटत असतो आणि ती त्याच्याकडे कायमच आकर्षित होत असते. किरकोळ वाद होत असतात कारण स्वभाव भिन्न असतात. तरी सगळे मिटवून परत बोलण्याचा प्रयत्न होतो

कधी मेसेज केला जातो. म्हणजे जो पुरुष हवाहवासा वाटतो त्याच्या कायम संपर्कात , जवळ राहणे स्त्रीला आवडते. त्यात तिला एक मानसिक सुरक्षितता ही लाभत असते..


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!