Skip to content

इतरांच्या डोक्यातील अवगुणांना तुमच्यातील सौंदर्य नष्ट करू देऊ नका.

इतरांच्या डोक्यातील अवगुणांना तुमच्यातील सौंदर्य नष्ट करू देऊ नका.


मेराज बागवान


माणसांच्या डोक्यात नेमके काय चाललेले असते हे आपण सांगू शकत नाही.पण काही जणांच्या डोक्यात एक प्रकारची नकारात्मकता भरलेली असते.ती पण इतरांच्या बाबतीत.म्हणजे काही जणांना उगाच काही बोल बोलण्याची सवय असते.जसे की ,”ही ना खूप स्वतःला शहाणी समजते.” “हा आहे ना खूप अहंकारी आहे,ह्याच्यात खूप Ego आहे”.

म्हणजे असे विविध ‘Label’ तुम्हाला देखील अनेक जणांकडून मिळत असतील.स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारी माणसे नाही मिळाली,किंवा मनाविरुद्ध वागू लागली की त्या लोकांच्या डोक्यात तुमच्या विषयी अवगुण निर्माण होऊ लागतात.पण कोणी काहीही बोलले तरी सत्य थोडे वेगळे असते.खरी परिस्थिती ह्याहून खूपच वेगळी असते.म्हणूनच ,’इतरांच्या डोक्यातील अवगुणांना तुमच्यातील सौंदर्य नष्ट करू देऊ नका.’

निशा एक हुशार मुलगी.ऑफिस मध्ये सगळेजण तिच कौतुक करीत असत.तिला विविध बक्षिसे देखील मिळत असत.पण तिच्या टीम मेम्बर ना मात्र तेवढे कौतुक मिळत नसे.निशा ला खासकरून एकटे काम करायला आवडत असे.म्हणजे तिला तीच तिचं विश्वच आवडत असे.बाकी लोक काय करतात ह्याचा ती विचार करीत नसे.ती तिच्याच कामात नेहमी व्यस्त असे.

पण झाले काय,काही दिवसांनी ऑफिस मधील तिचे सहकारी तिच्याशी जरा वेगळे वागू लागले.ते चर्चा करू लागले ,”निशा स्वतःला आजकाल खूप स्मार्ट समजत आहे.आपण म्हणजे कोणीच नाही,क्षुल्लक आहोत असं सरांना दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे.सर्वांनी फक्त तिच्याकडेच attention द्यावं असं तिला वाटत आहे”.

सुरवातीला निशा च्या हे लक्षात आले नाही कारण ती तिच्याच कामात व्यस्त होती.पण हळूहळू इतराजण काय बोलत आहेत हे तिच्या लक्षात येऊ लागले.पण तिच्या मनात असे काहीच नव्हते.मग तिने स्वतःला थोडे बदलण्याचा प्रयत्न केला.ती पूर्वी फार कोणाशी बोलत नव्हती.पण आता ती इतर सहकाऱ्यांबरोबर कामाविषयी चर्चा करू लागली,त्यांना कामात मदत करू लागली.आणि हळूहळू तिचे आणि इतर सहकाऱ्यांबरोबरचे गैरसमज दूर झाले.आणि सर्वजण पुन्हा सुरळीत काम करू लागले.

असेच काहिसे अनुभव तुम्हाला देखील आले असतील.तुमच्याविषयी लोक तितकंच बोलतात जितके ते तुम्हाला ओळखतात.ते अनेकदा समजून न घेता फक्त ‘Judge’ करतात. म्हणून त्याचे तुमच्याविषयी काहीही मत असले.त्यांच्या मनात तुमच्याविषयी कितीही अवगुण असले तरी तुम्ही तुमच्याल्या चांगल्या गोष्टी नष्ट करू नका.उलट त्याच गोष्टींना तुम्ही तुमची ताकद बनवा.त्याच गोष्टींचा आधार घेऊन त्याच लोकांसाठी असं काहो तरी करा की पुढच्या वेळी ते तुम्हाला ‘ Judge’ करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील आणि मगच बोलतील.

काहीजणांना तुमच्याविषयी एक प्रकारची ‘Jealously’ असते.पण स्पष्टपणे ते तसे बोलून दाखवत नाहीत.मात्र तुम्हाला अनेकदा कमी लेखण्याचा प्रयत्न करीत असतात. तुम्हाला ‘Dominate’ करू पाहतात.पण तुम्ही अशा वेळी भावनिक न होता,तटस्थ राहायला शिकले पाहिजे.तुमच्यातील चांगल्या गोष्टींना आणखीन उजाळा दिला पाहिजे.आणि हे तुम्ही इतरांना दाखवण्यासाठी नाही करायचे,तर स्वतःच्या प्रगतीसाठी करायचे.

स्वतःला विकसित करण्याचा अट्टहास कायम सुरू ठेवा.मग ते विकसित होणे कुठल्याही बाबतीत असू शकते.यामुळे तुमचे इतर लोकांकडे लक्ष जाणार नाही,जे तुमच्याविषयी अवगुण डोक्यात घेऊन बसले आहेत.तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करा.एक प्रकारची चांगली ऊर्जा तुमच्या जीवनात प्रवेश करेल.

मग ह्यानंतर वास्तव जगासमोर असेल.सत्य काय आणि असत्य काय हे वेळच सर्वांना दाखवून देईल.तोपर्यंत तुम्ही स्वतःमधील सौंदर्य जपा. स्वतःचे गुण जोपासा.तसेच मनातील पूर्ण नकारात्मकता बाजूला सारा,म्हणजे पुढील वाट मोकळी होईल आणि तुमच्यातील सौंदर्य कायम राहील.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!