Skip to content

एक उत्तम बायको असण्याची हे १५ लक्षणे वाचा.

एक उत्तम बायको असण्याची हे १५ लक्षणे वाचा.


हर्षदा नंदकुमार पिंपळे


सगळेच संसार काही तुटत नाही.काही संसार हे अगदी शेवटपर्यंत गुण्यागोविंदाने सुरळीतपणे चालू असतात.पण संसार हे तेव्हाच टिकतात जेव्हा दोघेही तितकेच समजूतदार असतात.मित्रांनो,सगळेच काही वाईट नसतात. काही आदर्श बायको आणि आदर्श नवऱ्यांची उदाहरणं आपल्या अवतीभवती नक्कीच आहेत.

आता एक उत्तम बायको कशी असावी असं विचारलं तर कित्येकांना वाटतं तिला चांगलं जेवण बनवता यायला हवं,तिने घर नीटनेटकं ठेवायला हवं.सगळं वेळेवर आवरायला हवं.परंतु आदर्श गृहीणी किंवा एका उत्तम बायकोची लक्षणं हीच असतात का ? तर नाही. आपणच तो तसा समज करून घेतलाय.जेवण आणि नीटनेटकेपणा या दोन्ही पलिकडेही अजून वेगळ्या गोष्टी असतात. त्याही आपण जाणून घ्यायला हव्या.

म्हणूनच आज नीटनेटकेपणा आणि उत्तम स्वयंपाक येणं ही दोन्ही लक्षणं मी सांगत नाही. यापेक्षा अजून एका उत्तम बायकोमध्ये काय असू शकतं ते आपण जाणून घेऊयात.

तर अगदीच काही वेगळी आणि अनोळखी अशी लक्षणं नाहीत. सर्वांच्या परिचयाची असलेली ही लक्षणं एका उत्तम बायकोमध्ये असतात. त्यावरुन ती एक उत्तम बायको आहे असं समजलं जातं.

तर चला जाणून घेऊयात अशी पंधरा लक्षणं —–

१)समजूतदारपणा –

कुठल्याही नात्यात समजूतदारपणा हा अत्यंत महत्त्वाचा असतो.तोच नवरा बायकोच्या नात्यातही असणं आवश्यक असतं.नवऱ्याला वेळप्रसंगी समजून घेणे.कुठलाही गैरसमज करून न घेता थोडा समजूतदारपणा दाखवणे.

२)आवडीच्या गोष्टींसाठी मोकळीक –

काही (चांगल्या)गोष्टी नवऱ्याला आवडतात परंतु बायकोला त्याच सहसा आवडत नाही. परंतु अशावेळेस तीने मात्र सरळ सरळ नकार न देता नवऱ्याला थोडी तरी मोकळीक देणे.

३) छंदांना प्रोत्साहन देणे –

तबला वाजवणे,पेटी वाजवणे अशा कोणत्याही प्रकारच्या छंदांना मनापासून प्रोत्साहन देणे.मी आहे सोबत, तु फक्त चालत रहा असा विश्वास निर्माण करणे.

४) इच्छा आकांक्षा जाणून घेणे –

स्वतःच्या इच्छा आकांक्षांचा सातत्याने पसारा न मांडता कधी कधी नवऱ्याच्या इच्छा आकांक्षा काय आहेत ते जाणून घेणे.त्या पूर्ण करण्यासाठी विश्वास निर्माण करणे.

५)जबाबदारी घेणे-

संसार दोघांचा असतो त्यामुळे साहजिकच एकमेकांच्या जबाबदारीची जाणीव ही दोघांना असणं गरजेचं असतं.तर असचं,थोडं तु थोडं मी अशा कलाने जबाबदारी वाटून घेणे.ओझं न समजून मनापासून सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारणे.

६)सुख दुःखात सोबत करणे

कुठल्याही कठीण काळात सोडून न जाणे.येणाऱ्या सुख दुःखात मनापासून साथ देणे.आर्थिक काठिण्य काळ असो वा कोणताही कौटुंबिक कठीण काळ असो,कुठलीही पळवाट न शोधता विश्वासाने साथ देणे.

६)काळजी घेणे :

आपुलकीने काळजी घेणे.सतत छोट्या मोठ्या गोष्टींच्या तक्रारी न करता मनापासून काळजी घेणे.

७) पारदर्शीपणा :

कुठल्याही गोष्टी लपवून न ठेवणे.प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता असणे.

८)आदर करणे :

चारचौघात आणि एकट्यातही नम्रपणे वागणे.मतांचा,विचारांचा ,भावनांचा आदर करणे.

९)कौतुक करणे –

छोट्या छोट्या गोष्टींच अगदी मनापासून कौतुक करणे.केलेल्या कामाचा अभिमान वाटणे.

१०) सतत कुरबुरी न करता छोट्या छोट्या गोष्टीतही समाधान मानणे,छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधणे.

११)मोकळा संवाद साधणे,मनातील भाव भावना,सुखदुःख शेअर करणे. दिवसभरातून किमान अर्धा तास तरी वेळ देणे.

१२)कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न करता निरपेक्ष प्रेम करणे.

१३)मैत्रिण बनून राहणे.एखाद्या मैत्रिणीसारखं समजून घेणे,समजून सांगणे.हक्काने रागावणे.

१४)कुटुंबाची मनापासून काळजी घेणे.घरातील वातावरण सतत हसतं ठेवणे.स्वतः आनंदी राहून घरही आनंदी ठेवणे.

१५) संशय न घेणे –

कोणत्याही प्रकारचा संशय न घेता सामंजस्याने सगळ्या गोष्टी सांभाळणे.

तर मित्रांनो, ही अशी उत्तम बायको असण्याची काही लक्षणं आहेत. फक्त जेवण येतं म्हणून ती उत्तम बायको आहे असं होत नाही.याउलट नवऱ्याला वेळप्रसंगी समजून घेणं,चुकत असेल तर समजून सांगणं,स्वप्नांना,छंदांना प्रोत्साहन देणे,जबाबदारी स्वीकारणे,निरपेक्षता ,निःस्वार्थीपणा अशा बऱ्याच गोष्टी एका उत्तम बायकोमध्ये असणं आवश्यक आहे.

(अर्थात ही सगळी एका उत्तम पतीचीही लक्षणं असावीत.)

तर पहा,एक उत्तम बायको असण्याची ही लक्षणं आहेत.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!