Skip to content

एकमेकांशी लग्न करण्याआधी या ८ गोष्टींवर चर्चा नक्की व्हायला पाहिजे.

एकमेकांशी लग्न करण्याआधी या ८ गोष्टींवर चर्चा नक्की व्हायला पाहिजे.


टीम आपलं मानसशास्त्र


लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे, स्त्री आणि पुरुष यांचे एकत्र येणे नसते. यात दोन कुटुंबे ही एकत्र येत असतात. दोन्ही कुटुंबे त्यातील व्यक्ती , त्यांचे स्वभाव , संस्कार , रीती रिवाज , या सुधा आधी माहिती करून घ्याव्या लागतात. त्यावर ही चर्चा व्हावी लागते. लग्न म्हणले की मुलगा असो मुलगी त्यांना एकमेकांशी कुठे ना कुठे जुळवून घ्यावे लागते. आधी बोलून बऱ्याच गोष्टी वर जरी चर्चा झाली तरी असे काही तरी बारकावे राहतात च जे लग्न झाल्यावरच समजतात. अशावेळी नवरा बायको यांच्यावर असते की त्यांनी कसे जुळवून घ्यायचे.

याखेरीज एकमेकांशी लग्न करण्याआधी या ८ गोष्टींवर चर्चा नक्की व्हायला पाहिजे.

१. शिक्षण : खरे तर शिक्षण जास्त असल्यामुळे चांगली नोकरी, व्यवसाय , स्थैर्य हे तर नक्कीच मिळते.

अर्थात असे नाही की कमी शिकलेला माणूस ही शिकलेल्या पेक्षा कैक पटीने जास्त कमवत असतो. अनुभव , वैचारिक दृष्ट्या ही प्रगल्भ असतो.

मात्र मुलगी जास्त शिकली असेल तर तिला ही तशी अपेक्षा असते की मुलाचे शिक्षण , विचार जुळले पाहिजेत. कारण थोडी ती मॉडर्न असते. पेहराव , केशभूषा , राहणीमान. त्यामुळे ते सगळे जमले तर लग्नानंतर जुळवून घेताना अडचणी येत नाहीत.

२. अपेक्षा : – सगळ्यात महत्वाचे असते ते एकमेकांच्या एकमेक आणि कुटुंब यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते.

नवऱ्याचे एकत्र कुटुंब असते आणि मुलगी विभक्त कुटुंबातून येते आणि तिला एकत्र कुटुंबात राहायचं नसते. जमवून घ्यायचे नसते. विभक्त कुटुंबपद्धती करिता नवऱ्याचा विरोध असतो. हे लग्नानंतर समजले तर मतभेद वाढत जातात.भांडणे ,वाद होतात. त्यामुळे जे असेल ते आधी स्पष्ट बोलून त्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत का नाही याचे विचार करून मग निर्णय घेणे योग्य.

तसेच इतर ही अपेक्षा असतात. जसे घरकामाची वाटणी, आर्थिक गोष्टींची जबाबदारी कोणी घ्यायची , अगदी पुढे जावून मुले कधी होवू द्यायची , मुलांची जबाबदारी त्या अनेक गोष्टी आधी बोलून clear कराव्यात.

३. नोकरी :- सध्याची वाढती महागाई बघता घरचे किती ही चांगले असेल तरी नोकरी ही असावी असे वाटते कारण स्थैर्य हवं असते. वाढते खर्च टाळू शकत नाही.

आजकाल मग एकट्या मुलाच्या नोकरीवर भागत नाही म्हणून मुलाची अपेक्षा असते की मुलीने ही नोकरी करून संसाराला हातभार लावावा. त्यातून. थोडी बचत करता येणे शक्य असते.

लग्नाआधी जरी मुलगी नोकरी करत असेल तरी बरेचवेळा अशी मानसिकता होते की लग्न ठरले , झाले की मुली नोकरी सोडून देतात. ,मग तिथूनच खटके उडतात . म्हणून ज्या गोष्टी असतील ते स्पष्ट बोलून पुढे ठरवून तसे निर्णय घ्यावेत.

४. आर्थिक जबाबदाऱ्या : – आर्थिक गोष्टींची जबाबदारी ही लग्नानंतर कोणी घ्यायची हे प्रश्न बरेचवेळा पडतात. दोघेही नोकरी करणारे असतील तर एकमेकांवर ढकलले जातात. तर कधी एकत्यावरच खर्च पडतो कारण तो / ती न बोलता आपल्या संसारासाठी करत असतात.

सुरुवातीला ठीक असते. पण जबाबदाऱ्या वाढतात. मुले होतात त्यांचे खर्च , शिक्षण , इतर खर्च वाढतात त्यावेळी मग हे आर्थिक खर्च वादाचे मुद्दे ठरतात. मीच का करायचे आणि मलाच करावे लागते. म्हणून तेही आधीच बोलून ठरवून घ्यावे.

निदान या मुद्याचा विचार केला जावा.

५. एकमेकांच्या आवडी निवडी : – एकमेकांच्या आवडी निवडी वर आधी चर्चा या व्हायलाच पाहिजे असतात. कारण की बायका खूप हौशी ,उत्साही असतात. घरचे , बाहेरचे काम सभाळून ही सुट्टी दिवशी कुठे बाहेर फिरायला मुळात नवऱ्या सोबत जायला उत्साही असतात. याचे कारण त्यांना त्याच्या सोबत वेळ पाहिजे असतो. नेहमीच्या रूटीन मधून थोडा बदल पाहिजे असतो. कधी एकांत तर कधी मित्र मैत्रिणी यांच्या सोबत .

अशावेळी जर नवरा मात्र उत्साही नसेल. घरात बसणेच आवडत असेल त्याला. लोकांच्यात मिसळणे आवडत नसते. असे असेल तरी दोन टोके निर्माण होतात. आणि मतभेद निर्माण होतात.

६. जन्मजात काही कमतरता , व्यंग, आधी पासून काही आजार आहेत का , या गोष्टींवर ही चर्चा होणे गरजेचे असते. कारण बरेचवेळा एखादा किरकोळ जरी आजार असेल तरी तो कायमचा असेल तर जोडीदाराला त्रासदायक ठरतो. किंवा आधी का सांगितले नाही म्हणून नाराजी निर्माण होते.

उदा. सानिया आणि स्वरूप दोघांचे लग्न अतिशय दणक्यात झाले. दोघांनी लग्न आधी भरपूर वेळ एकत्र घालवला होता . आवडी निवडी , खरेदी सगळे दोघांच्या पसंतीचे झाले होते. लग्न झाले आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात ते हनिमून करिता थंड हवेच्या ठिकाणी गेले. ते पण सानिया ने स्वरूप ने आधी ठरविले होते. पहिले दोन दिवस खूप छान गेले. अचानक तिकडे थंडी वाढली .आणि स्वरूप ला त्याच्या दम्याच्या आजाराने डोके वर काढले.अगदी श्वास घेताना होणारा त्रास . मग त्याची औषधे ..हे सगळे तिकडे चालू झाल्यावर सानिया चा एकदम विरस झाला.

तिने एकदम बडबड सुरु केली तू तुझ्या आजाराविषयी आधी का बोलला नाहीस. मला त्याने त्रास झाला तर यापासून पुढे आपल्या मुलांना त्रास झाला तर एवढ्या टोकाला गेली ती. त्यामुळे पुढचे हनिमून कसे बसे च पार पडले म्हणावे लागेल.

याचमुळे जन्मजात काही कमतरता , व्यंग, आधी पासून काही आजार आहेत का , या गोष्टींवर ही चर्चा होणे गरजेचे असते.

७. लग्नापूर्वी दोघांच्या पैकी कोणाचे काही होते का ? जसे प्रेमप्रकरण , प्रेमात धोका , ब्रेकअप , : –

आजकाल सोशल मीडिया चे प्रभाव , मुलं आणि मुली शाळेत , कॉलेजमध्ये , ऑफिस मध्ये एकत्र काम करतात . अशावेळी स्त्रीपुरूष यांच्यात आकर्षण हे होत असते. त्यातून प्रेम , शारीरिक जवळीक ही वाढते. पुढे काही कारणास्तव ते प्रेम टिकून राहत नाही. किंवा घरच्यांचा विरोध, दुसरी कोणी मुलगी आवडणे तिच्या प्रेमात पडणे ,सुरुवातीला वाटणारे प्रेम सतत एकत्र असताना एकमेकांचे विचार जमत नाहीत. वाद विवाद होतात अशावेळी ब्रेकअप होते.

पण लग्नापूर्वी मोकळेपणाने या गोष्टीवर होणाऱ्या जोडीदारासोबत चर्चा ही होणे गरजेचे असते. कारण नंतर जर कोणी आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात होते किंवा बायकोच्या आयुष्यात होते हे समजले तर मानसिक धक्का बसतो. एकमेकांच्या वरच्या विश्वासाला तडा जातो. आणि नंतर संशय वाढीस लागतो. कारण कधी उशीर झाला , बाहेर कुठे गेले, कधी त्या x व्यक्तीचा मेसेज चुकून फोनवर बघितला तर अजूनही त्यांच्यात काही आहे असा संशय मनात येवून आहे हे नाते क्षणात धोक्यात येते.

म्हणून आपल्या भूतकाळात घडलेल्या काही महत्वाच्या घटना याविषयी , बालपण याविषयी नक्की चर्चा करावी.

८. सेक्स ची आवड , त्यात असणाऱ्या अपेक्षा , लग्नापूर्वी कौन्सेलर सोबत चर्चा करावी याची गरज असते.

पूर्वी पासून खरे तर लग्न म्हणले की शारीरिक संबंध हे गृहीत धरले जातात. पण केवळ शारीरिक संबंध हे सुखी संसार घडवतात का ? तर नाही त्यात एकमेकांची मने जुळणे, स्वभाव , भावना समजून घेणे , शारीरिक , मानसिक गरजा समजून घेणे गरजेचे असते. याशिवाय काही गोष्टी या शारीरिक संबंध येण्यापूर्वी शास्त्रोक्त पद्धतीने माहिती करून घेणे गरजेचे असते.

आजकाल मुले, मुली खूप जागरूक झाली आहेत. त्यांना शारीरिक संबंध , संबंध ठेवताना घेण्यात येणारी काळजी , उपाय याची जरी बरीच माहिती जाहिरातीतून होत असेल तरी त्यावर counselor सोबत बसून मोकळेपणाने माहिती मिळणे , चर्चा होणे गरजेचे असते.

मुली या बऱ्याच लाजऱ्या आणि संस्कृती मुळे मर्यादाशील

असतात. त्यामुळे त्यांना मोकळे करून त्यांच्याशी लग्नापूर्वी ही मोकळेपणाने बोलून घेणे जरुरी असते.

आणि दोघेच जर याविषयावर बोलणार असतील तर उगीच मनात भीती , शंका निर्माण होतात. त्यामुळे शंकाचे योग्य निरसन होणे आणि भीती दूर होवून योग्य आणि अचूक guidance मिळण्याकरिता प्री marital counselling ची गरज असतेच.

म्हणून शारीरिक संबंधाची ओढ , आवड कितपत आहे याची माहिती करून घेणे किंवा बरेचवेळा लज्जा यामुळे ती इच्छा सुप्त असते. ती आवड निर्माण करणे या करिता चर्चा होणे , योग्य सल्ला घेणे गरजेचे असते.

लग्न आणि त्याच्या कल्पना , वास्तव यात प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. अपेक्षा वेगळ्या असतात. प्रश्न ही वेगळे असतात.

असे म्हणतात की शादी का लड्डू जो खाये वोह पछताये जो ना खाये वोह भी पछताये फिर खाके क्यो ना पछताये ?

पण तरीही लग्नाचे पावूल उचलताना खूप विचारपूर्वक , आणि चर्चा करून च उचलावे. प्रत्येक बारीक सरिकगोष्टीवर चर्चा करून मनात येणाऱ्या शंका दूर करून मगच पुढचं पावूल उचलावे.

याशिवाय बरेचवेळा लग्नानंतर दोघांच्या पैकी कोणाला परदेशी संधी मिळणार असते. आणि दुसऱ्याची जायची तयारी नसते. यावर चर्चा होवून पुढे कुठेही जाण्याची तयारी आहे का नाही हे ठरविणे गरजेचे असते.

उदा. लग्नाला दहा वर्ष झाली. श्रिया आणि कबीर यांना आठ वर्षाचा गोंडस मुलगा. श्रिया CA असून तिने कधी जॉब केला नाही. तिची प्रगती तिकडे कधी दाखविली नाही. घर एके घर एवढेच.

कबीर मात्र प्रचंड हुशार. सतत नवीन गोष्टींचा ध्यास. Multi national company मध्ये सात देशांचा. सार्क चा प्रेसिडेंट .

तरी ही अतिशय दूर दृष्टिकोन , जिद्दी ठेवून covid काळात त्याने ऑफिस आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत त्याचे M Tech उत्तम रित्या पूर्ण केले.

अलीकडे त्याला समजले की त्याची कंपनी दुसऱ्या कंपनी मध्ये मर्ज होणार आहे. कोणती रिस्क नको म्हणून त्याने आधीच परदेशात दुसऱ्या कंपनी मध्ये चांगला जॉब मिळविला. जायची तयारी सुरू झाली. बायको मुलगा सगळ्यांच्या सह जाणार होता. पण बायकोने विरोध करायला सुरुवात केली. मी कधी गाव सोडून गेले नाही ते देश सोडून कसे येणार.मला जमणार नाही. तुम्ही पण जायचे नाही. जॉब चे बघू इथेच. कमी पैसे मिळतील त्यात काय .

पण कुठेही कबीर ला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याची धडपड , त्याची उंच भरारी तिला समजुच शकली नाही. रोजचे वाद . विरोध यातून त्याने परदेशातील संधी सोडली. पण इथे ही कंपनी ची अनिश्चितता यातून रोजचे टेन्शन , नकारात्मक वातावरण , नकारात्मक विचार याचा परिणाम होवून त्याला अचानक heart attack आला . त्याची engioplasty झाली.

तो अजूनच मनाने आणि शरीराने खचला. अशावेळी त्याची बहीण स्वतः counsellor तिने त्याच्या वर सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांच्या सोबत त्याला खूप positive गोष्टींचे विचार करण्यास motivate केले. अनेक गोष्टी समजावून सांगून , रोज counselling करून चार दिवसात त्याला एकदम सकारात्मक बनविले. ज्यातून तो physically ही लवकर recover होवू लागला. आणि मानसिक दृष्ट्या ही. पुढे कोणती काळजी घ्यायची हे सुधा त्याला चांगले समजले.

हे सांगण्याचा उद्देश एवढाच की पती पत्नी मधले वैचारिक मतभेद कोणत्या ही टोकाला जावू शकतात. म्हणून एकमेक एकमेकास पूरक आहेत का , साथ देणारे आहेत का यावर ही लग्नापूर्वी चर्चा होणे गरजेचे असते.

आयुष्य सुंदर आहे . त्यात लग्न म्हणजे परमोच्च सुख. तुमची सायकल तेव्हाच पूर्ण होते जेव्हा जोडीदाराची साथ लाभते. म्हणून जोडीदार निवडताना काही गोष्टीवर जरूर चर्चा करा. मार्ग काढा. आणि आयुष्याचे सुंदर असे स्वप्न प्रत्यक्षात उतरवा. शुभेच्छा!!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एकमेकांशी लग्न करण्याआधी या ८ गोष्टींवर चर्चा नक्की व्हायला पाहिजे.”

  1. So nice…ha lekh bachun nakki lagnaagidar discuss karunqch lagna Kartil koni ithun Pudge🙏🏼

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!