Skip to content

अशा प्रकारची माणसं कोणत्याही नात्यांमध्ये फार काळ टिकत नाहीत.

अशा प्रकारची माणसं कोणत्याही नात्यांमध्ये फार काळ टिकत नाहीत.


मेराज बागवान


नाती म्हटलं की माणसं आली,सहवास आला,संवाद आला. नात्यांमुळेच माणूस माणसाशी जोडला जातो.आई,वडील,भाऊ,बहीण,पती,पत्नी,मित्र,मैत्रीण अशी अनेक नाती बनत जातात.आणि ह्या नात्यांमधूनच आयुष्य घडत जाते.प्रत्येकाचा स्वभाव,मते, दृष्टिकोन वेगवेगळे असतात.पण तरी देखील नाती मात्र कायम असतात.नात्यांमुळेच जीवनाला खरे तर एक अर्थ प्राप्त होतो.कोणाचं कोणावाचून काही अडत नाही.पण कोणी ना कोणी कधी ना कधी कसा उपयोगी पडेल हे देखील सांगता येत नाही.आपली संस्कृती आपल्याला नाती जपायला शिकवते.

पण काही माणसे अशी असतात जी कोणत्याही नात्यांमध्ये फार काळ टिकत नाहीत.म्हणजे ते इतरांपासून लवकर दुरावतात.किंवा त्यांच्याशी संपर्क कमी कमी करत नंतर पूर्ण संपर्क च तोडून टाकतात. मग कशी असतात ही माणसं? आपण ह्या लेखात अशाच माणसांविषयी बोलणार आहोत.

१) आत्मकेंद्रित माणसे – ज्या माणसांना स्वतःच्याच विश्वात राहायला आवडते अशी माणसे आत्मकेंद्रित (Introvert) समजली जातात. त्यांना इतरांच्या सहवासापेक्षा स्वतःचाच सहवास जास्त महत्वाचा असतो आणि त्यामुळेच अशी माणसे कोणत्याच नात्यात फार काळ टिकत नाहीत.

२) विश्वास न ठेवणारी माणसे – काही व्यक्तींमध्ये ‘Trust Issue’s असतो.त्यांचा कोणावरच विश्वास बसत नाही.थोडा विश्वास बसायला लागला की लगेच त्यांचे मन जणू त्यांना खुणावते की ,’तू ह्या पुढे जाऊन विश्वास ठेवू नकोस’.आणि मग ते तिथेच थांबतात आणि त्या नात्यात अडकून राहत नाहीत.

३) स्वार्थी स्वभाव असणारी माणसे – काही माणसे खूप ‘मतलबी’ असतात.आपले काम झाले की इतरांशी संपर्क तोडतात.त्यांना त्या माणसाशी काही देणे घेणे नसते.त्यांना फक्त स्वतःचे काम आणि स्वार्थ दिसतो.मग कोणी कितीही त्यांना आपल्या जवळचे मानत असेल तरी देखील त्यांना त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसते.आणि म्हणूनच ते कोणत्याच नात्यात फार काळ टिकत नाहीत.

४) अति रागिष्ठ माणसे – राग येणे नैसर्गिक असते.पण अति राग आयुष्याची माती करतो.अति राग येणारी माणसे इतरांना पटकन काही तरी बोलून जातात.त्यांना दुखावतात.आणि त्यांच्या ह्या स्वभावामुळे ते कोणत्याच नात्यात फार काळ टिकत नाहीत

५) अहंकारी माणसे – ‘Ego’.अहंकारी माणसे स्वतःहून नाती जपण्यासाठी कधीच पुढाकार घेत नाही. किंबहुना त्यांचा अहंकार त्यांना ते करू देत नाही.मी स्वतःहून बोलणार नाही,कमीपणा घेणार नाही.त्यामुळे ते आयुष्यभर त्यांच्या अहंकाराला जपत बसतात आणि नाती गमावतात.

६) समाजकार्य/ धार्मिक कार्य करणारी माणसे – आजकाल काही माणसे काही धार्मिक किंवा ‘Spriritual’ संघटनांशी जोडलेली असतात.पण त्यांच्या आयुष्यात ते कुठल्या नात्यात फार काळ टिकत नाहीत.बरेचजण अविवाहित देखील राहतात.त्यांना समाजकार्य इतर कोणत्याही नात्यापेक्षा सर्वश्रेष्ठ वाटत असते.

७) एकाकीपणा वाटणारी माणसे – काही माणसांना कायम एकाकी वाटत असते.सर्व जण भोवताली असून देखील त्यांना एकटे वाटत असते.ही त्यांची मानसिकता असते.आणि हळूहळू ही मानसिकताच त्यांचे आयुष्य बनते.आणि त्यामुळे अशी माणसे कोणत्याच नात्यात फार काळ टिकत नाहीत.

८) असंयमी माणसे – काही माणसांना प्रत्येक गोष्ट ‘लगेच,झटपट’ हवी असते.ती गोष्ट मिळेपर्यंत देखील त्यांना संयम नसतो.मग कोणाकडून काही लगेच मिळाले नाही की त्या नात्यातून बाहेर पडायला ते मागे पुढे पाहत नाहीत.

९) सोशल फोबिया – काही जणांना माणसात मिसळायची भीती वाटते.समाजात गेले तरी एक प्रकारची भीती त्यांच्या मनात कायम असते.ह्या मानसिकतेमुळे देखील अशी माणसे कोणत्याही नात्यात फार काळ टिकत नाहीत.

१०) ध्येयाने झपाटलेली माणसे – काही माणसे इतकी ध्येयवेडी असतात की त्यांना नाती जपणे महत्वाचे वाटत नाही.ते आयुष्यात मोठे यश संपादन करतात देखील.पण ती फार ध्येय वेडी असतात.आणि त्यामुळे ती कोणत्याही नात्यात अडकून बसत नाहीत.

११) अति व्यावहारिक माणसे – काही माणसे नात्यांमध्ये सुद्धा ‘व्यवहार’ बघतात.आणि ती व्यवहार संपला की नाती देखील संपवतात.

१२) जुळवून न घेणारी माणसे – काही जण आपलं तेच खरं करणारी असतात. इतरांच्या मतांना ते आदर देत नाही. जणू त्यांना नेहमी ‘Dominate’ करण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यांच्याकडे ‘Adujustment’ नावाचा प्रकार नसतो. म्हणून ते कोणत्याच नात्यात फार काळ टिकत नाहीत.

अशी काही माणसे जगात असतात. ह्याला आपण त्यांची मानसिकता म्हणू शकतो किंवा स्वभाव देखील. पण असतात अशी माणसे जी नात्यांमध्ये फार काळ टिकू शकत नाहित.ही मानसिकता लक्षात घेणे फार गरजेचे आहे.कारण आपले मानसिक आरोग्य फार महत्वाचे असते.तुमच्या आयुष्यात देखील अशी माणसे भेटली असतील किंवा पुढे भेटतील. म्हणून अशी माणसे ओळखता आली पाहिजे. आपण त्यांना बदलू शकत नाही.पण स्वतःला तर बदलू शकतो ना?

स्वतःची काळजी घेण्यासाठी एक संतुलित आयुष्य जगता आले पाहिजे.नाहीतर अगदी टोकाची भूमिका…’Extreme Level’ तरी कितपत उपयोगाची असते???

काही नाही फक्त आयुष्याचा फक्त एकच नाही तर प्रत्येक रंग जगता आला पाहिजे. नाहीतर काही जण वर म्हटल्याप्रमाणे एकच रंग आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत जगत राहतात.

‘अरे भाई ये जिंदगी है….और…ना कोई…रेस….बस जी लो हर इक पल इस जिंदगी के….’


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “अशा प्रकारची माणसं कोणत्याही नात्यांमध्ये फार काळ टिकत नाहीत.”

  1. कृष्णराज वासुदेव सावंत

    खूप प्रकारच्या स्वभावाचा तुम्ही उलघडा केलात ऐवढ्या प्रकारात चांगल्या माणसाची ओळख कशी करायची त्यांचा रंग कसा ओळखायचा हे एक कोडेच आहे असे वाटते .,.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!