या १० पद्धती लक्षात ठेवा, तुम्हाला कोणीही ऑनलाइन फसवणार नाही.
हर्षदा पिंपळे
“तिला काल चार लाखाला फसवलं गेलं गं.एवढी शिकली सवरली आहे पण सोशल मीडिया आणि पैसे याचा मोह काही आवरता आला नाही तिला.”
“ऑनलाइन प्रेमाच्या जाळ्यात एका तरूणीची फसवणूक.”
“नोकरी देतो ,घर देतो असं म्हणून केली लाखाची फसवणूक.”
ही उदाहरणं काही नवीन नाहीत.
रोज एकतरी ऑनलाइन फसवणूकीची बातमी कानावर पडतेच.
तर वाचकहो,ऑनलाइन फसवणूक कुणाला माहीत नाही असं होणार नाही. इथे असणाऱ्या प्रत्येकालाच ऑनलाइन फसवणूक काय असते ते माहीत आहे.यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फसवणूक असते.आता बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे फसवणूकीचं प्रमाणही वाढत आहे. आधी लोकं प्रत्यक्षात फसवायची आणि आता ऑनलाइनही लोकं फसवणूक करायला लागली आहेत.अनेकदा सांगूनही लोकं त्याच चूका करत असतात. आपला सगळा डेटा कुठलीही शहानिशा न करता अनोळखी लोकांना सहजपणे शेअर करतात.
केवळ व्यावहारिक दृष्टीने फसवणूक होते असं नाही तर वेगवेगळे गुन्हे,किंवा मग मैत्री, प्रेम यांचीही फसवणूक आजकाल ऑनलाइन होताना दिसते. तर याच फसवणूकीपासून सावध राहणही आवश्यक आहे. तर काही अशा पद्धती आपण पाहूयात जेणेकरून आपल्याला कुणी ऑनलाइन फसवणार नाही.
◆वैयक्तिक डेटा शेअर न करणे:
सर्वात महत्वाचं असतं ते आपली वैयक्तिक माहिती.मग ते आपल्या नावापासून गावापर्यंत सगळ्या गोष्टी यामध्ये येतात.त्यामुळे आपला वैयक्तिक डेटा कधीच कुणालाही कुठलीही शहानिशा न करता शेअर करू नका.
◆कुठल्याही लिंकवर क्षणार्धात क्लिक करणं थांबवा. लिंक कोणती आहे? तिचे फायदे/तोटे जाणून घ्या.ती लिंक सुरक्षित आहे की नाही हे आधी तपासून घ्या.
◆सतत पर्सनल गोष्टी सोशल मीडियावर पब्लिक करू नका.
◆इन्स्टा/एफबी सारख्या माध्यमांवर आजकाल कुणीही मेसेज करतं.आणि बऱ्याचदा गोड गोड बोलून आपण ऑनलाइन या जाळ्यात फसले जातो.त्यामुळे अशा कोणत्याही माध्यमातून कुठल्याही अनोळखी व्यक्तीने मैत्रीसाठी/प्रेमासाठी मागणी घातली तर स्पष्ट नकार द्या. शक्यतो अशा गोष्टींमध्ये गुंतू नका.एखाद्या व्यक्तीची पूर्ण तपासणी करूनच योग्य निर्णय घ्या.
◆हल्ली पंचवीस लाखाच्या लॉटरीचा एक मेसेज whatsapp द्वारे कित्येकांना येतोय.तर असे अनेक मेसेज असतात. जे आपला वैयक्तिक डेटा मिळवण्यासाठी सगळा खटाटोप करत असतात.तर अशा मेसेजेस ला रिप्लाय न करता थेट रिपोर्ट करा.लॉटरी लागली या भ्रमात आपला वैयक्तिक डेटा शेअर करू नका. आणि मेसेजला / कॉलिंग ला रिप्लाय देऊ नका.
◆सायबर सिक्युरिटीविषयी बेसिक अभ्यास नक्की करा.जेणेकरून सायबर सिक्युरिटी कशी काम करते याचा अंदाज तुम्हाला येईल.
◆आधार कार्ड/बँक डिटेल्स, पॅन कार्ड अशा महत्त्वाच्या गोष्टींची माहिती शेअर करू नका.
◆मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ओटीपी अशा गोष्टी शेअर करू नका.
◆नोकरीच्या नावाखाली हल्ली आर्थिक फसवणूक केली जाते.बक्कळ पैसे घेऊन नोकरी देण्याचं आमीष दाखवून कित्येकांची सहज फसवणूक केली जाते.त्यामुळेच अशा नोकरीच्या मेसेजेस ला बळी पडू नका.कोणतीही योग्य कंपनी नोकरी देण्यासाठी पैशाची मागणी करत नाही. त्यामुळे व्यवस्थित चौकशी करा.
◆इंटरनेट कनेक्शन सिक्युरिटी जाणून घ्या.
तर मित्रांनो, आपली फसवणूक व्हावी असं कुणालाही वाटत नाही. मग ती प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष असो.फसवणूक ही वाईटच असते.त्यात या ऑनलाइन फसवणूकीचा वेग वाढत जाताना दिसत आहे. तर अशी फसवणूक होऊ नये यासाठी काही गोष्टींची माहीती असणं गरजेचं आहे. काही गोष्टींवर आपणच लक्ष ठेवणं आवश्यक आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टी काही मुद्दे माहीत असतील तर आवर्जून ते शेअर करा.जेणेकरून ऑनलाइन फसवणूकीला कुणीही सहजासहजी बळी पडणार नाही.
त्यामुळे शक्य होईल तितकं चुकीचे गैरसमज लोकांपर्यंत पोहोचवू नका.याउलट ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी, ती होऊ नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करा.याविषयी जनजागृती करा.इतकच नाही तर ऑनलाइन फसवणूक झाल्यावर काय करायचं ,कुठे मदत मागायची याविषयीही अजाणत्या लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा.
चला,थोडं जागरूक होऊयात,ऑनलाइन फसवणूकीला आपणच आळा घालूयात..!
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

