भावनिकदृष्ट्या जेव्हा पूर्णपणे कोसळाल तेव्हा हा लेख तुमच्या कामी येईल म्हणून सेव्ह करा.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“अग चिनू थोडतरी खाऊन घे, किती दिवस तू अशीच बसणारेस? तब्येत बघ काय करून ठेवली आहेस. अस करून कसं चालेल? नीट खात नाहीस, नीट झोपत नाहीस. एकसारखी काय शून्यात पाहत बसते? आता रम्या इथे असती तर तिला आवडल असत का तुझ हे वागणं? खाऊन घे बाळा थोड.” आई चिन्मयीला सांगत होती. गेले काही महिने सर्वांच्याच आयुष्यात खूप बदल झाला होता. पण सगळ्यात जास्त कोणाच्या असेल तर तो चिन्मयीच्या. तिची अगदी जवळची जिवाभावाची मैत्रीण रम्या आता या जगात नव्हती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रम्या जेव्हा हे जग सोडून गेली तेव्हा चिन्मयी तिथेच होती. तिने स्वतःच्या डोळ्यांनी सर्व पाहिलं होत.
रम्या आणि चिन्मयी खूप जवळच्या, खास मैत्रिणी होत्या. म्हणजे ज्या मैत्रिणीच्या जिवावर आपल्या घरातले आपल्याला बाहेर पाठवतील अश्या मैत्रिणी. एकमेकींशिवाय त्यांचं पान हलायच नाही. त्यांना बाहेरगावी शिकायला पाठवल ते पण त्यांना एकमेकांची सोबत होती म्हणून. या सोबत आहेत म्हणजे आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही अस घरातल्या माणसांना वाटत होत. तसा त्यांचा विश्वास होता आणि त्यांना या गोष्टीचं समाधान देखील होत. म्हणून त्यांनी या दोघांनी बाहेर राहायची शिकायची परवानगी दिली. दोघी हॉस्टेल वर राहत होत्या. खूप छान दिवस होते ते. दोघी एकत्र कॉलेजला जात, शिकणं, मजा, मस्ती त्यांचे बाकीचे फ्रेन्डस्. एकंदरीतच कॉलेज म्हटल्यावर एक स्वप्नवत आयुष्य डोळ्यासमोर येत किंवा असावं अस वाटत तस ते आयुष्य होत.
हॉस्टेलवर पण त्या दोघी प्रसिद्ध होत्याच. सर्व छान चाललं होत. हे त्यांच्या कॉलेजच शेवटचं वर्ष होत आणि ही घटना घडली. खर तर घटना घडते त्या आधीच त्याची कुठेतरी सुरुवात झालेली असते. आपल्याला ती दिसत नाही इतकचं. रम्या जी एरवी हसत खेळत, मजा मस्ती करायची ती अलीकडे शांत झाली होती. तिचा हा बदल बाकी कोणाला जाणवला नसला तरी चिन्मयीला लगेच समजला. तिने रम्याला अनेकदा विचारून पाहिलं पण रम्या म्हणाली काही नाही परीक्षेचं टेन्शन आहे. चिन्मयीला पण नंतर नंतर ते पटलं कारण खरच त्यांच्या परीक्षा होणार होत्या.
आणि रम्याचा स्वभाव पण काहीसा तसा होता. ती लगेच टेन्शन घेत असे. तरी चिन्मयी ने तिला समजावलं की तू परीक्षेचं टेन्शन घेऊ नको आपण आरामात पास होऊ. काही दिवसांनी रम्या पूर्वीसारखी वागू लागली त्यामुळे चिन्मयीला वाटलं आता काही प्रोब्लेम नसेल. पण एक दिवस काही कल्पना नसताना अस काही घडलं ज्याचा धक्का जो चिन्मयीला लागला त्यातून ती अजून सावरू शकली नाही. रम्याने हॉस्टेलच्या रूम मध्येच suicide केली. हे सर्व खूप अनपेक्षित होत. चिन्मयीने स्वतःच्या डोळ्यांनी तिचा तो मृतदेह पाहिला.
रम्या गेली हेच तिला काही दिवस पटत नव्हत इतका तिच्या मनावर ताण आला होता. जेव्हा हळू हळू भानावर आली तेव्हा भावनिक दृष्ट्या अजूनच कोसळली. इतकी घट्ट मैत्रीण असूनही आपल्याला तिच्या मनातलं दुःख समजू शकल नाही, आपण ते समजून घेऊन शकलो नाही या बदलचा अपराधीपणा, स्वतःवर असलेला राग, झाल्या घटनेचं दुःख सर्व गोष्टी मिसळल्या होत्या. आपण आपल्या मैत्रिणीला समजून घेतलं असत तर ती आज जिवंत असती, आपण तिला वाचवू शकलो असतो अस वाटून सारखं रडू येत होत. आता आपल्या हातात काहीच राहील नाही. असहाय्य असल्याची जाणीव आणि सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर ते म्हणजे तिला रम्याने अस का केल याच कारणच समजलं नाही.
अस काय झालं होत जे ती हिला सांगू शकली नाही आणि आपण जाणून पण घेऊ शकलो नाही. हे सर्व जेव्हा झालं तेव्हा त्यातून सावरण्यासाठी चिन्मयीचे आई बाबा तिला काही दिवसांसाठी घरी घेऊन आले. नंतर ते तिला परत सोडणार होते. कारण त्याच्या परीक्षा सुरू होणार होत्या. पण सर्व व्यर्थ गेलं. घरी आल्यानंतर तिची जी अवस्था होती ती परत गेल्यावर पण तशीच राहिली. काही दिवसांनी ती सावरेल अस जे तिच्या आई बाबांना वाटलं होत तस झालच नाही. हॉस्टेल वर गेल्यावर पण चिन्मयी तशीच राहिली. ना अभ्यासात लक्ष, काही खात नव्हती, झोपत नव्हती, रूम मध्येच बसून राही. परीक्षेला जाण्याचा काही प्रश्नच नव्हता कारण तिची तब्येत पूर्ण बिघडली होती. म्हणून आई बाबा तिला परत घरी घेऊन आले.
आता या घटनेला महिने होऊन गेले तरी चिन्मयी ही घटनेतून नीट बाहेर पाडू शकली नाही. भावनिकदृष्ट्या कोसळून जाण्याची ही एक घटना झाली. पण असे अनेक वेगवेगळे प्रसंग माणसाच्या आयुष्यात घडतात जे बरेचदा अनपेक्षित असतात ज्यातून माणूस पूर्णपणे तुटतो, कोसळून जातो. आपल्या हातात आता काही उरल नाही, सर्व संपल अस वाटू लागत. शरीरावर मनावर परिणाम होतो. एकंदरीत आयुष्य विस्कटून जात. कशातच मन लागत नाही, स्वतःकडे लक्ष दिलं जातं नाही. आयुष्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो नकारात्मक होतो. यात आपण नकळत होऊन गेलेल्या गोष्टींमध्ये अडकून पुढचं आयुष्य पण जगायच थांबवतो.
हे कुठेतरी बदलायच असेल तर आपल्याला योग्य वेळी मदत घेणं खूप गरजेचं आहे. अश्या माणसांना त्यांच्या घरातल्या व्यक्तींनी इतर जवळच्या माणसांनी पण आधार देण गरजेचं असत. एखादी गोष्ट घडली की त्याचं पडसाद हे उमटणारच आहेत. आपल्यावर त्याचा प्रभाव पडणार. पण तो किती पाडून घ्यायचा हे आपल्या हातात आहे. झाल गोष्टींचं दुःख जरी मनात असल तरी त्यातून ना कधी आपल्याला बाहेर पडावं लागणार. आपण तिथेच अडकून आपल्या आयुष्यावर अन्याय करत नाही ना हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. अस करून आपण आपलं पुढचं आयुष्य पण खराब करतोय. आपल्याला कितीही वाटलं की आता काही होऊ शकत नाही तरी अस नसत. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण काही ना काही प्रयत्न करू शकतो. आयुष्य नव्याने सुरू करू शकतो. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे होऊन गेलेल्या गोष्टीतून हळू हळू बाहेर पाडून स्वतःकडे स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष देणं. आपली काळजी घेणं. स्वतःवर प्रेम करण.
आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदला. आपल्याल कितीही वाटलं की आपण असहाय्य आहोत पण अस नाही. आपण एकटे नसतो. आपल्याला मदत मिळू शकते. जवळच्या व्यक्तींची मदत घ्या, यातील तज्ञ व्यक्ती, उपचारक यांची मदत घ्या आणि आपल्या आयुष्याला एक नवीन स्टार्ट द्या. आठवणी विसरता येत नाही आपण तो अट्टाहास पण करू नये. पण त्या आहेत म्हणून आपलं आयुष्य थांबवायचं नाही. एक नवीन routine सुरू करा. आपल्याला आवडतात त्या गोष्टी करा, आयुष्य जगण्याच काहीतरी एक कारण शोधा. प्रत्येकाच्या आयुष्यात ते असत. आपल्याला फक्त ते शोधून काढायच आहे. एकदा ते मिळालं की आपली दुःख हळू हळू कमी होत जातात आणि आपण आयुष्य जगू लागतो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

