Skip to content

माझी लाईफ perfect नाहीये, पण आज माझ्याकडे जे काही आहे त्याबद्दल मी आभारी आहे.

माझी लाईफ perfect नाहीये, पण आज माझ्याकडे जे काही आहे त्याबद्दल मी आभारी आहे.


मेराज बागवान


कोणाची लाईफ perfect असते? ते म्हणतात ना,सुख हे मानण्यावर असते. अगदी खरे म्हटले आहे ते.प्रत्येकाला आयुष्यात सर्व काही मिळत गेले असते तर त्या आयुष्याला काही अर्थच उरला नसता.म्हणूनच ‘अपूर्णतेमध्येच सर्व काही असते’.जे नाही त्याचा विचार करण्याऐवजी जे आहे त्या बद्दल ‘ग्र्याटीट्युड’ बाळगणे फार गरजेचे असते.’माझी लाईफ perfect नाहीये, पण आज माझ्याकडे जे काही आहे त्याबद्दल मी आभारी आहे.’ हा दृष्टिकोन जर प्रत्येकाने ठेवला तर आयुष्य सुकर होऊन जाईल.

दुःखे कोणाला नसतात.प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतेच. मग ते कोणतेही असो.प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते.तुम्ही तुमच्या आयुष्याची तुलना इतर कोणाशीच कधीच करू शकत नाही. प्रत्येकाचे आपले एक नशीब असते. आणि तस तसे त्यांचे आयुष्य घडत जाते.सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात.पण काही गोष्टी आपण घडवत जात असतो.आणि त्याच गोष्टींसाठी नेहमी आयुष्याचे आभार मानले पाहिजेत.आयुष्य सगळं काही देत नाही पण खूप काही देत असतं. गरज असते ती तसा दृष्टिकोन ठेवण्याची आणि त्याबद्दल आभारी असण्याची.

आयुष्य एक गोष्ट हिरावून घेते पण त्याऐवजी कित्येक नवीन गोष्टी आपल्या पुढ्यात आणून ठेवते.ज्यातून आपण कणखर,बळकट बनत जातो.आणि ह्या सर्व गोष्टींची कृतन्यता बाळगणे खूप महत्वाचे असते. जेव्हा आपण आभारी असतो तेव्हा एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यात प्रवेश करते आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडवून आणते.

आयुष्यात नेहमी ‘Affirmations’ वापरले पाहिजेत. म्हणजे काय? ‘देवाने माझ्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहेत,मी त्या बद्दल आभारी आहे.कोणाकडे तर तेही नसते’ अशी काही वाक्ये मनात म्हणली पाहीजेत.जेणेकरून आपल्याकडे तक्रारीला जागाच उरणार नाही.

अपेक्षा आणि तक्रारी कधीच संपत नाहीत.म्हणून त्यांच्याशी सांगड घालता यायला हवी.उगाच,’माझ्याकडे हे नाही ,ते नाही,माझं नशीबच फुटकं, माझ्याच बाबतीत हे असं होतं,त्यांचं बघा किती सर्व छान आहे वगैरे वगैरे…’ अशा तक्रारी आयुष्यात काहीच उपयोगाच्या नसतात.याने त्रास फक्त आपल्यालाच होतो.म्हणून आहे ते सुख मानले पाहिजे.

वास्तव माणूस खूपदा स्वीकारत नाही.’कळतंय पण वळत नाही’ अशी तऱ्हा अनेकांची असते.”त्यांचं घर किती मोठं आहे आणि आपलं बघा.., तिच्याकडे बघा किती मस्त नोकरी आहे ,अगदी पाची बोटे तुपात…तुमचं काय बाई बर आहे..” अशी उपहासात्मक वाक्ये अनेकजण म्हणत असतात.ह्याऐवजी ,”मला विधात्याने घर दिले आहे,नाहीतर काहीजण रस्त्यावर झोपतात” हे समाधान प्रत्येकाने बाळगले पाहिजे.

जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत ते ‘Perfect’ कधीच होणार नाही.अगदी मृत्यूच्या क्षणी देखील माणसाला काही ना काही समस्या असणारच.मग का हा खटाटोप.प्रत्येक बाबतीत आभार मानायला शिकले पाहिजे. आयुष्याचे आभार माना.जे तुमच्या गरजेला उपयोगी येतात त्यांचे नेहमी आभारी राहा.आई-वडील ज्यांच्यामुळे तुम्ही आज जगात आहात त्यांचे तर रोज आभार मानले पाहिजेत.ज्या विधात्याने इतके सुंदर जग निर्माण केले त्याला रोज आठवा,त्याला ‘thank you’ म्हणा.आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी आभारी राहा.

आयुष्य जगत असताना,प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अनेकजण आपली मदत करीत असतात. त्यांच्यामुळे आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी मिळत असतात.नेहमी त्याबद्दल कृतन्यता हवी.ती ‘जाण’ हवी.इतरांना खूप काही मौल्यवान वस्तू दिल्या नाहीत तरी चालेल पण त्यांच्याबद्दल ‘Gratitude’ बाळगणे मात्र विसरू नका.

जेव्हा तुम्ही आयुष्यात नेहमी ‘आभारी’ राहाल तेव्हा बऱ्याच तक्रारी ,वेदना कमी होतील.तुम्ही मग आपोआप आनंदी राहू लागाल आणि मग आयुष्य देखील तुमची ओंजळ भरभरून टाकेल.आयुष्य तुमच्या ओंजळीत हास्य फुलवेल….


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!