Skip to content

आपण ज्यांना मनापासून आपलं मानतो, त्यांच्याशी आपण गरजेपेक्षा भावनिक होतोय, हे असं ओळखा.

आपण ज्यांना मनापासून आपलं मानतो, त्यांच्याशी आपण गरजेपेक्षा भावनिक होतोय, हे असं ओळखा.


हर्षदा पिंपळे


आयुष्यात जन्माला आल्यापासूनच आपण वेगवेगळ्या नात्यांशी जोडले जातो.कधी ती रक्ताची नाती असतात तर कधी माणूसकीची नाती असतात.यातील कितीतरी जणांशी आपलं सहज जमतं.कित्येकांशी आपली सहज मैत्री होते.अर्थात आपण त्यांना आपल्या खूप जवळचे, आपले मानत असतो.आपल्याला त्यांची काळजी वाटते.त्यांचा अभिमान वाटतो.त्यांच्याविषयी प्रेम आपुलकी सगळं काही वाटत असतं.इतकच नाही तर त्यांच्या आयुष्यातील दुःखातही आपण तितक्याच मनापासून सहभागी असतो.

अडीअडचणीला त्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो.थोडक्यात सांगायचं झालं तर आपली त्यात भावनिक गुंतवणूक ही असते.पण कधी कधी हीच भावनिक गुंतवणूक गरजेपेक्षा जास्त होत जाते.आपण आपल्या मर्यादा ओलांडून त्या माणसांमध्ये जास्त अडकत जातो.इतके गुंतत जातो की तो गुंता सोडवणं नंतर कठीण जातं.आणि अनेकदा आपल्याला कळतही नाही की आपण या सगळ्यामध्ये इमोशनली ईतके गुंतले गेलोय.आपण अलर्ट नसतो.किंवा मग कधी कधी नेमकं काय चाललय तेच कळत नाही.

काही ओळखताच येत नाही. तर असचं

आपण ज्यांना मनापासून आपलं मानतो, त्यांच्याशी आपण गरजेपेक्षा भावनिक होतोय, हे कसं ओळखायचं ते आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून जाणून घेऊयात.

◆अतिकाळजी : आपण आपल्या माणसांची काळजी करतो.आणि काळजी करणं काही वाईट नाही. परंतु अतिकाळजी मात्र केव्हाही घातक ठरू शकते.असचं एखाद्या विषयी जर प्रत्येक गोष्टीत अतिकाळजी करत असाल,तुम्ही तुमच्या काळजीचं लिमीट क्रॉस केलं असेल तर समजून जा आपण गरजेपेक्षा जास्त भावनिक गुंतवणूक करतोय.

◆प्रत्येक गोष्टीतील वाढता इंटरफेअर :

आपण आपल्या माणसांसोबत एकत्र राहतो,बोलतो,वावरतो सगळं ठीक आहे. परंतु कधी कधी काय होतं की आपण आपल्या या माणसांच्या एकूण एका गोष्टीत इंटरफेअर करायला लागतो.एकही गोष्ट आपण त्याची त्याला करू देत नाही.सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये आपण इंटरफेअर करत असतो.

◆आवडी-निवडी

आपण आपल्याला काय आवडतय याचा विचार करत बसत नाही. आपण आपल्या व्यक्तीला काय आवडतं आणि काय आवडत नाही याचाच जास्त विचार करतो.स्वतःपेक्षा इतरांच्या आवडीनिवडींना जास्त प्राधान्य देतो.”तुला आवडलं नं,मग मलाही हेच आवडलय.” असा विचार करून मोकळे होतो.

◆अधिक इमोशनली विचार :

आपण बोलतो की प्रॅक्टिकली विचार करणं मस्ट असतं.सतत भावनिक विचार करून चालत नाही. पण अनेकदा आपण आपल्या माणसांमध्ये इतके गुंतत जातो की आपण त्यांच्या बाबतीत प्रत्येक वेळी अधिक भावनिक विचार करायला लागतो.जिथे प्रॅक्टिकली विचार करण्याची गरज आहे तिथेही आपण इमोशनली विचार करतो.

◆वाढता पझेसिवनेस :

आपल्या माणसांच्या बाबतीत किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या बाबतीत आपण थोडेफार पझेसिव असतो.आपल्याला सहसा आपली व्यक्ती फार काळ दुसऱ्यांसोबत असलेली चालत नाही.पण थोडं फार ठीक आहे. मात्र कधी कधी हाच पझेसिवनेस वाढत जातो.आणि हा वाढता पझेसिवनेस आपण भावनिक रित्या किती गुंतले आहोत हे जाणवून देतो.

◆सहवास:

आपल्या एखाद्या व्यक्तीच्या सहवासात राहण्याची इतकी सवय झालेली असते की त्याच्याशिवाय कोणत्या गोष्टी करायच्या म्हंटलं की आपल्याला ते जमत नाही.आपण अक्षरशः त्या व्यक्तीसाठी हट्टाला पेटलेले असतो.

तर मित्रांनो अशा काही गोष्टीतून आपण एखाद्याशी अधिक भावनिक होत आहोत हे ओळखू शकतो.तुम्हाला जर काही गोष्टी माहीत असतील तर त्या आवर्जून सांगा.

मित्रांनो, पण एखाद्या व्यक्तीशी किती भावनिक व्हावं आणि किती नाही हे आपण समजून घ्यायला हवं. भावनिक गुंतवणूक वाईट असते असं मुळीच नाही. परंतु भावनिक गुंतवणूकीलाही मर्यादा हवी.अर्थात फ्लोमध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात येत नाही. परंतु ज्या क्षणाला अशा गोष्टी लक्षात येतील त्याच क्षणाला आपण स्वतःला सांभाळणं आवश्यक आहे.

तर , भावनिक गुंतवणूक करा परंतु समजून उमजूनही घ्यायला शिका.गरजेपेक्षा एखादी गोष्ट जेव्हा अती होते तेव्हा ती अनेकदा नुकसानकारक ठरते.त्यामुळे गरजेपेक्षा एखाद्यामध्ये जास्त भावनिक गुंतवणूक करू नका.

काय येतयं नं लक्षात?


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपण ज्यांना मनापासून आपलं मानतो, त्यांच्याशी आपण गरजेपेक्षा भावनिक होतोय, हे असं ओळखा.”

  1. माधवी शांडिल्य

    खुपच छान, पण practical thinking सोपं असतं का?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!