Skip to content

तुमचा पार्टनर तुमच्याशिवाय वेगळे राहण्याच्या विचारात आहे, हे या १० मार्गाने ओळखा.

तुमचा पार्टनर तुमच्याशिवाय वेगळे राहण्याच्या विचारात आहे, हे या १० मार्गाने ओळखा.


हर्षदा पिंपळे


लाईफ पार्टनर म्हणजे हवीहवीशी वाटणारी गोष्ट.आता कित्येकांची जोडी ही कायमस्वरूपी टिकून राहते.अगदी शेवटपर्यंत त्यामध्ये गोडवा चांगलाच मुरलेला असतो.परंतु एखादं नातं हे काही शेवटपर्यंत टिकत नाही.किंवा कधी कधी काही कारणास्तव ते एकमेकांपासून वेगळं राहणच पसंद करतात.तर आता आपल्या पार्टनर ला कोणत्या गोष्टीवरून राग येतो,आनंद वाटतो या गोष्टींविषयी आपल्याला कल्पना असतेच.आपण त्यामध्ये खरतरं चांगलेच अनुभवी झालेले असतो.एकत्र राहण्यासाठी अनेक कारणं असतात.तशीच वेगळं राहण्यासाठी सुद्धा काही कारणं असू शकतात. पण ते कसं ओळखायचं किंवा मग नेमकी काय कारणं असू शकतात हे आपण थोडं जाणून घेऊयात.

तर ,

१)संवाद कमी करणे.

२)टाळाटाळ करणे.

३)सतत शंका घेणे.

४)वादविवाद घालणे.

५)पारदर्शकता न ठेवणे.

६)सतत चुका काढणे.

७)अविश्वास दाखवणे.

८)काळजी नाही असं दाखवणे.

९)समजून न घेणे.

१०)नकारघंटा वाजवणे.

१)संवाद कमी होणे :

[संवादावर कित्येक नाती आजही तग धरून उभी आहेत.नात्यांमध्ये संवाद संपत चालला की नात्यांचे धागे हळुहळू विरायला लागतात.नात्यात थोडाफार संवाद असणं गरजेचं आहे.]

हाच संवाद कमी होतोय का ? कोणत्याही गोष्टीवर मोकळी चर्चा, मोकळा संवाद होतोय का ? का संवाद कमी होत चाललाय?निरर्थक होत चाललाय? संवादात आपुलकी वाटत नाहीये ?

या सगळ्या गोष्टी विचारात घेणे.जर खरचं असं काही होत असेल तर जोडीदार वेगळं राहण्याचा विचार करतोय अशी शंका नाकारता येत नाही.

२)टाळाटाळ करणे :

एकत्र राहूनही जर जोडीदार बोलणं टाळत असेल.आपल्या बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करत असेल.वेळ घालवणं टाळत असेल.तर जोडीदार वेगळं राहण्याच्या विचारात असण्याची शक्यता असू शकते.

३) सतत संशय घेणे :

[अनेकदा संशय घेणं महागात पडतं.एका संशयामुळे नाती किती विकोपाला जाऊ शकतात याचं वेगळं उदाहरण सांगायची तशी गरज नाही.]

त्यामुळे जर नात्यात सतत संशयाचा वणवा पेटत असेल तर सगळ्या शक्यता तपासून पाहणं बेटर ठरेल.

४)पारदर्शकता न ठेवणे :

गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करणे.चुकीच्या असो वा बरोबर गोष्टी असो.त्या लपवण्याचा जर प्रयत्न होत असेल.कशातच पारदर्शकता नसेल तर समजून जावं आपला पार्टनर वेगळं राहण्याचा विचार करतोय.

५)सतत चुका काढणे:

सातत्याने प्रत्येक गोष्टीत चुका काढत राहणे.हे चुकलं ते चुकलं करत राहणे.चांगल्या गोष्टीतही सतत काहीतरी खोट काढत राहणे.

६)अविश्वास दाखवणे:

“माझा तुझ्यावर थोडाही विश्वास नाही.तु ते करू नकोस.तु मला सांगू नकोस.

” असं बोलत राहणे.थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक गोष्टीत अविश्वास दाखवणे.थोडाही विश्वास न ठेवणे.

७)वादविवाद घालणे :

क्षुल्लक गोष्टींवरून सातत्याने वाद घालणे.भांडण करणे.उठता बसता केवळ काही ना काही जुन्या गोष्टी उगाळत बसणे.

८)काळजी नाही असं दाखवणे :

नात्यात काळजी, प्रेम नसेल तर टिकणं अशक्य असतं.तुमच्या बाबतीत थोडीफार काळजी नसेल किंवा अगदीच जोडीदार केअरलेस सारखं वागत असेल तर त्याला वेगळं रहायचय असा विचार मनात येऊ शकतो.

९)समजून न घेणे :

कुठल्याच गोष्टीत जर समजूतदारपणा नसेल.प्रत्येक गोष्टीला सातत्याने दुषणं देत बसणे.

१०)नकारघंटा वाजवणे :

सतत नकारघंटा वाजवणे.कुठल्याही निर्णयाला सतत नाही नाही करणे.”तु हे करू नको,ते करू नको.”असा सातत्याने पाठपुरावा करणे.

तर अशाप्रकारच्या काही गोष्टी जोडीदारामध्ये आढळत असतील तर साधारणपणे तुमचा पार्टनर तुमच्याशिवाय वेगळे राहण्याच्या विचारात आहे ही शक्यता नाकारता येत नाही.

पण तरीही, या सगळ्या शक्यतांवरून पूर्णपणे अंदाज बांधू नये.अशा गोष्टी थेट स्पष्टपणे जोडीदाराला विचारल्या तर बरेच प्रश्न सहज सुटतात.

आपल्याला जाणवतय म्हणून केवळ अंदाज बांधून निर्णय घेण्यात काहीच अर्थ नाही.त्यामुळेच जे काही असेल ते स्पष्टपणे विचारून मोकळे व्हा.

तेच जास्त बेटर आहे.”तुला वेगळं रहायचय का ? काय कारण आहे यामागे ? तुला माझा कंटाळा आला आहे का ?” अशा काही शंका असतील तर त्या थेट स्पष्टपणे विचारून घ्याव्यात. जे जे असेल ते एकदा क्लीअर करून घ्यावं.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!