आयुष्यभर एकटे राहण्याचा विचार करणारे मुलं मुली हे ३० कारणे स्वतःजवळ बाळगून असतात.
मेराज बागवान
आजकाल लग्न न करणाऱ्या मुला-मुलींची संख्या वाढत आहेत.लग्न न करता एकटे राहणं ही पिढी का पसंत करते? आपल्या देशात कुटुंब व्यवस्था लग्न संस्थेवर आधारलेली आहे.मग तरी देखील आजकाल एकटे राहण्याचे प्रमाण का बरे वाढलेले दिसते? अशी काही एकटे राहण्याची कारणे आहेत जी आजची मुले-मुली स्वतःजवळ बाळगून आहेत.
१) करिअर : काही जणांना बाकी सर्व गोष्टींपेक्षा स्वतःचे करिअर,नोकरी,व्यवसाय महत्वाचा वाटतो.आणि त्यामध्ये त्यांना कोणताच व्यत्यय नको असतो.त्यांना फक्त करिअर हीच जबाबदारी घ्यायची असते.मग ते लग्नासारख्या गोष्टीत अडकून पडत नाहीत आणि करिअर साठी एकटे राहणे पसंत करतात.
२) जबाबदारी घेण्यासाठी तयार नसणे – काही मुला-मुलींना लग्न ही खूप मोठी जबाबदारी वाटते आणि म्हणून त्यांना त्याऐवजी आयुष्यभर एकटे राहणे सोयीस्कर वाटते.
३) स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी – काहींना आयुष्य स्वतःच्या मर्जीवर जगायचे असते. आणि त्यासाठी त्यांना स्वातंत्र्य हवे असते आणि मग ते त्यासाठी एकटेच राहणे पसंत करतात.
४) जुळवून घेण्याची तयारी नसणे – काही मुला-मुलींची दुसऱ्याशी जुळवून घेण्याची तयारी नसते.म्हणून मला लग्नच करायचे नाही असे त्यांना वाटत असते.
५) मी आत्मकेंद्रित आहे – मला माझ्या जगातच राहायला आवडते.कोणाच्यात मिसळायला आवडत नाही.शेअर करायला आवडत नाही.म्हणून मी एकटाच राहणार,हे कारण मुले-मुली देतात.
६) भीती- काहींना मी लग्न केले तर सहजीवन योग्यरित्या जगू शकेल ना? संसार करू शकेल ना हा न्यूनगंड असतो आणि म्हणून ते एकटे राहणे पसंत करतात.
७) कोणाबद्दलच विश्वास न वाटणे – काही जणांना कोणावरच विश्वास बसत नाही,अगदी कोणत्याच बाबतीत.ती त्यांची मानसिक समस्या असते. आणि म्हणून ते एकटे राहणे पसंत करतात.
८) प्रेमभंग – कधी तरी आयुष्यात प्रेम-भंग झालेला असतो. मग त्यातून काही नकारात्मतकता आलेली असते. मग पुन्हा ते नकोच म्हणून काही जण आयुष्यभर एकटे राहतात.
९) आवडीचा जोडीदार न मिळणे – मुलं-मुलींना त्यांना जो मुलगा/ मुलगी आवडत होती त्यांच्याशी काही कारणास्तव विवाह होऊ शकत नाही.पण त्यांना त्याच व्यक्तीशी आयुष्य घालवायचे असते. पण तसे शक्य होत नाही,म्हणून ते एकटे राहण्याचा पर्याय निवडतात.
१०) आर्थिक परिस्थिती – काहींची आर्थिक परिस्थिती बिकट असते. मग ह्या परिस्थितीत ते आणखीन जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत.आणि हे कारण पुढे करून ते एकटेच राहतात.
११) कौटुंबिक जबाबदारी – काहींचे मोठे कुटुंब असते, पण कमावणारा एकच असतो.मग हे कारण एकटे राहण्यासाठी त्यांच्यासाठी पुरेसे ठरते.
१२) आयुष्य स्थिर नाही – अजून मी ‘सेटल’ नाही हे कारण देखील असू शकते.
१३) अयशस्वी होणे – कोणत्यातरी जागी अपयश मिळते आणि मग म्हणून आयुष्यभर एकटे जीवन जगले जाते.
१४) इतरांचा अनुभव – इतरांच्या आयुष्यात सहजीवनातून वाईट अनुभव आले म्हणून.
१५) समाजातील अयशस्वी लग्ने – समाजातील किंवा जवळच्या व्यक्तींचे घटस्फोट/ वैवाहिक कलह पाहून एकटे च राहणे पसंत करणे.
१६) आजारपण – काहीतरी आजार असतो किंवा काही आरोग्याच्या समस्या असतात म्हणून.
१७) लैंगिक समस्या – लैंगिक समस्या किंवा आजार यामुळे देखील काही मुले-मुली एकटेच राहणे पसंत करतात.
१८) अपेक्षा पूर्ण न होणे – काहींना त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच जोडीदार हवा असतो आणि मग तो मिळाला नाही म्हणून ते एकटे राहतात.
१९) आई-वडिलांशी न पटणे – काहींचे आई-वडिलांशी पडत नसते. विचार जुळत नाहीत.म्हणून ते लग्न ही करत नाहीत आणि एकटे राहतात.
२०) हट्टी स्वभाव – काहींचा हट्टी स्वभाव असतो,”मी एकदा ठरवले आहे,लग्न कारायचे नाही म्हणजे नाही, मी माझा शब्द,स्वतःला दिलेली कमिटमेंट आयुष्यभर पाळणार.”
२१) समाजकार्य – काही मुलं-मुलींना समाजसेवा करायची असते.सनजकार्याला वाहून घ्यायचे असते म्हणून देखील.
२२) अहंकार – “मी इतकी शिकलेली आहे”,”मला एवढा पगार आहे” मग मी का कोणाशीही लग्न करू? काहीही झाले,अगदी लग्न नाही झाले तरी चालेल पण मी झुकणार नाही.
२३) ब्रह्मचर्य किंवा काही धार्मिक कारणे – काही जण आजही ह्या काही गोष्टी पाळतात आणि आयुष्यभर एकटे राहतात.
२४) कौटुंबिक समस्या – घरातील कोणाचे तरी मोठे आजारपण,वाद विवाद ,सततचे कलह यामुळे देखील काही जण आयुष्यभर एकटे राहण्याचा निर्णय घेतात.
२५) एकाकीपण – सर्वांमध्ये असून देखील एकटे वाटणे.सगळेजण असूनही कोणी नाही असे वाटणे,ही मानसिकता आयुष्यात एकटे राहणे निवडते.
२६) लाजरा-बुजरा स्वभाव – काहीजण लाजरे-बुजरे असतात म्हणून देखील.
२७) स्वतः बदलायचे नाही म्हणून – सहजीवन आले तर दुसऱ्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील ह्या विचाराने काही जण आयुष्यभर एकटे राहतात.
२८) मुलांची जबाबदारी नको म्हणून – लग्न झाले तर बाळंतपण आलेच,मग बाळ,मग त्याचे संगोपन,मग ह्यात माझी फिगर खराब होईल ही मानसिकता, जबाबदारी..हे सगळं नको म्हणून काही मुली हे कारण देऊन एकटे राहणे निवडतात.
२९) आई-वडिलांना सोडून नाही जायचे म्हणून – काही मुली असा विचार देखील करतात.”मी माझे घर,आई-वडील सोडून कुठेच जाणार नाही.मला माझं घर आणि गावच आवडत”.
३०) लग्नसंस्थेवर विश्वास नसणे – ‘सहजीवन /लग्न हा निव्वळ फालतुपणा आहे’ असा काहींचा दृष्टिकोन असतो आणि म्हणून ते आयुष्यभर एकटे राहतात.
अशी काही कारणे आहेत जी आजच्या मुलामुलींकडे आहेत आयुष्यभर एकटे राहाण्यामागे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


लेख वाचून आवडला
हा लेख अगदि बरोबर आहे.